Breaking News
Home / मनोरंजन / सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अतरंगी डान्स, मास्तरांची एनर्जी पाहून तर तरुणही लाजतील

सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अतरंगी डान्स, मास्तरांची एनर्जी पाहून तर तरुणही लाजतील

आपल्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी सातत्याने अनेक लेख लिहिले आहेत. त्यात लहान मुलांच्या डान्स, गायन आणि अन्य कला सादरीकरणावर असलेल्या अनेक व्हिडियोज विषयी आपण लिहीत आलो आहोत. यात अनेक वेळेस असं दिसून येतं, की शाळेतील शिक्षक किंवा शिक्षिका यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांविषयी कल्पना असते. मग ही शिक्षक मंडळी आपला मोबाईल वापरत त्यांच्या कला सादरीकरणांचे व्हिडियोज बनवतात आणि मग ही छोटी मंडळी वायरल होतात. ‘बचपन का प्यार’ हे कदाचित नजीकच्या काळातलं त्याचं ताजं उदाहरण. पण मुलामुलींना लोकप्रिय बनवणारे गुरुजी कधी स्वतः ला व्यक्त करू पाहतात का? आणि तसं असेल, तर मग त्यांची कोणी दखल घेतं का? दोघांचं उत्तर हो असं आहे. चला याविषयी जाणून घेऊयात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो आहे कारण ही दखल आपली टीम घेते. भारतातील आणि भारताबाहेरील उत्तमोत्तम व्हिडियोजबद्दल आपली टीम लिहीत असते. तसेच पहिल्या प्रशांचं उत्तर सुद्धा हो आहे कारण आजच आपल्या टीमने एक असा व्हिडियो पाहिला ज्यात एक गुरुजी अगदी दिलखुलास नाचताना दिसतात.

मुळात हा व्हिडियो आहे उत्तर भारतातील एका शाळेच्या शिक्षकांचा. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला हे गुरुजी समोर उभे असलेले दिसून येतात. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अनेक मुलं बसलेली दिसून येतात. हा या मुलांचा मोकळा तास (ऑफ लेक्चर) असावा. कारण ही मुलं अगदी आरामात असतात. ही मुलं आरामात असण्याचं कारण त्यांचे गुरुजी अगदी इन ऍक्शन असतात. एव्हाना आपल्याला गाणं ऐकायला येत असतं. पण गाण्याचे बोल नक्की काय आहेत हे कळत नाहीत. पण गाण्याचं संगीत बदललेलं जाणवतं. म्हणजे त्या संगीताचा आवाजही येत असतो आणि वरून प्रत्येक बदलासोबत गुरुजींच्या स्टेप्स बदलत असतात. खरं तर रूढार्थाने त्या स्टेप्स नसतात. कारण गुरुजी अगदी मनमुराद फ्री स्टाईल नाचत असतात. हा ! एक मात्र खरं, की त्यांच्या डान्सचं वैशिष्ठय म्हणजे त्यांचे हातवारे. सुरुवातीला ठीक असतं, पण नंतर त्यांचा डावा हात जो गरगर फिरवतात ना की धमाल. एखाद्या छोट्या विमानापुढचा पंखाच जणू. हा पंखा असा काही फिरतो की गुरुजींच्या डान्सचं विमान थेट हवेत असतं.

वर उल्लेख केल्याप्रमाणे संगीत बदललं की स्टेप्स बदलतात. डावा हात जबरदस्त फिरवल्यावर हे गुरुजी उडी मारून स्वतःच्या उजवीकडे जातात आणि अंग असं काही घुसळतात की जणू काही रवीने दही ताक घुसळाव. ये धूम नाचत असतात हे गुरुजी. जवळपास चाळीस सेकंद त्यांचा हा डान्स सुरू राहतो. खरं तर ही वेळ कमी वाटावी, पण एवढ हसायला येतं की हा व्हिडियो आपण पुन्हा पुन्हा पाहतो. आपणच काय पण त्या गुरुजींसमोर असलेली मुलं पण हसून हसून बेजार झालेली असतात. त्यांनी त्यांच्या या गुरुजींचे हे रूप पहिल्यांदाच पाहिले असावे. आपणही या व्हिडियोचा खूप आनंद घेतो. हे गुरुजी कोण आणि कुठले हे माहीत नाही. पण त्यांच्या मुळे आपले काही क्षण आनंदात जातात हे खरं. अर्थात या डान्सचा आनंद त्यांनीही मनमुरादपणे घेतल्याने हे शक्य होतं हे खरं. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला आवडला असेल.

सोबतच आपल्या टीमने खास आपल्यासाठी लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार यात शंका नाही. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. यापुढेही करत राहील. या सगळ्यांत आपल्या सकारात्मक सूचना आणि प्रोत्साहन यांचा रतीब नेहमीसारखा ठेवा. त्यातून आम्हाला शिकता येतं, बदल करता येतात आणि उत्तम लेख लिहिता येतात. येत्या काळात ही आपला वाचक म्हणून आपल्या टीमशी असलेला स्नेह सदैव वाढता असू दे ही सदिच्छा. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.