भारतात चहाप्रेमींची काही कमी नाही. अमृततुल्य चहा पासून तर येवले चहापर्यंत, अगदी सकाळ सकाळ पासून रात्री जेवणानंतर चहा पिणारेही अनेक लोक भारतात आहेत. चहाला वेळ नसते, हे भारतीय लोकांच्या एकूण चहा प्रेमातून दिसून येते. या चहाप्रेमींना चहासाठी ना निमित्त लागत ना वेळ. अगदी कोणत्याही वेळी चहाचा आस्वाद घेतला जावू शकतो. चहाची ही लोकप्रियता लक्षात घेऊनच अनेक चहा टपऱ्या, चहाचे विविध प्रकार मिळणारे हॉटेल्स सुरु झाले. आता तर एखाद्या चौकात गेले तरी कमीत कमी 5 वेगवेगळ्या ब्रँडचे चहा स्टोल लागलेले दिसतात. एवढंच नाही तर त्यात वेगवेगळे फ्लेवरही आलेले आहेत. साखरेचा, गुळाचा, शुगर फ्री, लेमन, आवळा, आयुर्वेदिक… असे अनेक प्रकारही आहेत.
पण काहीही म्हणा चहा हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कित्येकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते. सकाळचा चहा जर तुम्हाला कोणी मस्तपैकी हातात आणून दिला तर ‘सोने पे सुहागा’ होईल ना? पण असं आपल्या आयुष्यात होत नाही.
सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या पदार्थांचे फ्यूजन फूड बनवतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेक वेळा या विचित्र पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होतात. तर अनेक वेळा हे पदार्थ लोकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर अनेक वेळा अशा विचित्र अन्नपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर प्रत्येकाच्या आवडते पेय असलेल्या चहाचे व्हिडीओ पण व्हायरल होत असतात. ते कधी चहाच्या टेस्टमुळे तर कधी चहा बनवणाऱ्या व्यक्तिच्या स्टाईलमुळे व्हायरल होतात.
अशाच एका चहावाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बहुतेक महाराष्ट्राच्याच चहावाल्याचा आहे. व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे या चहावाल्याची चहा बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही या चहावाल्याच्या कौशल्याला दाद द्याल.
तर या व्हिडीओत दिसणारा चहावाला अंगात आलेल्या व्यक्तीसारखे करत आहेत. अचानक गोल फिरून बरोबर योग्य जागेवर येत आहे. तो एक सेकंदही शांत थांबत नाही. विशेष म्हणजे तो दूध ओतणे, चहा हलवणे आणि कप धुणे या सगळ्यांमध्ये आपली हटके स्टाईल दाखवत आहे. खरं पाहिलं तर यात विशेष काहीच नाहीये पण लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याने ही स्टाईल कमी वेडेपणा केला आहे आणि तीच स्टाईल आता व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक खाद्य विक्रेता आपापली एक विशिष्ट स्टाईल डेव्हलप करत आहे. जसे की, नागपूरचा डॉली चहावाला, समनापुरचे अन्सारचाचा… नाशिकचे पाणीपुरीवाले… असाच हा आजचा व्हायरल चहावालाही आहे. याचीही स्टाईल फेमस झाली आहे. या व्हायरल व्हिडीओत अजून एक हसवणारी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं, या चहावालाने स्टाईल मारायच्या नादात स्वतःला लागून घेतलं नाही म्हणजे बरं होईल. याच्या स्टाईलच्या नादात एखाद्याचं डोकं फुटलं नाही म्हणजे मिळवली. नाहींतर आहेच चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :