मिशन मंगल चित्रपटाची १०० कोटीच्या क्लब मध्ये एंट्री झाल्याबरोबरच अक्षय कुमारच्या नावावर अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. फोर्ब्स द्वारा जुलैमध्ये जाहीर केलेल्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या १०० सेलिब्रेटींच्या यादीत आता अक्षय कुमार टॉप दहा मध्ये शामिल झाला आहे. अक्षय कुमार ६५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ ४६६ कोटी रुपये कमाई करून चौथ्या स्थानावर आहे. ह्या यादीत ८९.४ मिलियन डॉलर म्हणजेच जवळ जवळ ६४० कोटी रुपये कमाई करणारा ड्वेन जॉन्सन (लोकप्रिय डब्ल्यू डब्ल्यू स्टार दि रॉक) प्रथम स्थानावर आहे.
लोकप्रिय अभिनेता जॅकी चेन हा ५८ मिलियन डॉलर कमाई करून ह्या लिस्ट मध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. शाहरुख आणि सलमानचे ह्या लिस्ट मध्ये नाव सुद्धा नाही. सलमान खान ह्या वर्षी ह्या लिस्ट मधून बाहेर आहे. मागच्या वर्षी ३.७७ कोटी डॉलर (२५७ कोटी रुपये) कमाई करून ८२ व्या क्रमांकावर होता. शाहरुख खान मागील दोन वर्षांपासून ह्या लिस्ट मध्ये नाही आहे. २०१७ मध्ये त्याच्या ह्या लिस्ट मध्ये ६५ वा क्रमांक होता.
ड्वेन जॉन्सन ह्याने जुमानजी चित्रपटासाठी सर्वात जास्त फी घेतली होती. जगातील सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता ड्वेन जॉन्सन ह्याला त्याच्या येणाऱ्या ‘जुमानजी : द नेक्स्ट लेव्हल’ ह्या चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात जास्त २३.५ मिलियन डॉलर (जवळ जवळ १६८ कोटी रुपये) दिले जाणार आहेत. ड्वेन जॉन्सन ह्याचे ह्या लिस्ट मध्ये नाव येणे हे पहिल्यांदाच झाले असे नाही, ह्या अगोदर २०१६ मध्ये सुद्धा तो नंबर १ वर होता. २०१७ आणि २०१८ मध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. ड्वेन ‘द रॉक’ च्या नावाने लोकप्रिय आहे.