बॉलिवूडच्या मायानगरीत रोज नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. बॉलिवूडची हि झगमगती दुनिया सामान्य जगापेक्षा फारच वेगळी आहे. बॉलिवूड मध्ये प्रत्येक प्रकारचे कलाकार आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांच्या आई वडिलांनी सुद्धा बॉलिवूड मध्ये काम केलेले आहे. तर काही कलाकार असेही आहेत, जे एका सामान्य कुटुंबातून स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या कुटुंबाचे बॉलिवूडशी दूरदूरचे नाते सुद्धा नाही आहे. तरी सुद्धा त्यांनी आज बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ह्यापैकीच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
एक सामान्य कुटुंब ते बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असा प्रवास ह्या अभिनेत्रीने केला आहे. आज हि अभिनेत्री करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. आज आम्ही बॉलिवूडच्या अश्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी बालपणी डॉक्टर बनण्याची स्वप्न पाहत असे. परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिला कॉल सेंटर मध्ये काम करावे लागले होते, परंतु आज तिची गणना बॉलिवूडच्या बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. चला तर जाणून घेऊया कोण आहे हि अभिनेत्री. तुमच्या माहिती साठी सांगू इच्छतो कि, आम्ही चर्चा करत आहोत बॉलिवूडची सर्वात मादक आणि बोल्ड अभिनेत्री जरीन खान बद्दल. होय, झरीन खान ला ह्या झगमगत्या दुनियेत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. १५ मे १९८४ ला एका पठाणी परिवारात जन्मलेली जरीन खानने आपल्या बालपणीचे शिक्षण कक़स्बे मधल्या शाळेतच पूर्ण केले. नंतर तिने आपले उच्च शिक्षण रिजवी कॉलेज ऑफ सायन्स येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच झरीनचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिला कॉलेजचे शिक्षण थांबवावे लागले. शिक्षण पूर्ण होताच झरीन एका कॉल सेंटर मध्ये काम करायची.
तुम्ही हे वाचून अवाक व्हाल कि जरीन खान आता जशी दिसते तशी ती अगोदर दिसत नव्हती. सुरुवातीच्या काळात जरीन खान खूप लठ्ठ होती. त्याकाळी तिला पाहून कोणालाही वाटले नसेल कि, येणाऱ्या काळात ती बॉलिवूडमध्ये राज्य करणार आहे, परंतु आज सत्य सर्वांच्या समोर आहे. जरीनने लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम जॉईन केली. आणि हळूहळू आपले वजन कमी केले. वजन कमी केल्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याअगोदर जरीनने २०१३ मध्ये एका तामिळ चित्रपटात आयटम डान्स सुद्दा केला होता. लोकांना हा डान्स खूप आवडला सुद्धा होता. आयटम डान्स मधून लोकप्रियता मिळवल्यानंतर सलमान खानची तिच्यावर नजर पडली. सलमान खान ने जरीन खानला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. जरीन खान ने सलमानच्या ‘वीर’ ह्या बॉलिवूड चित्रपटातून पर्दापण केले. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी ह्या चित्रपटातील जरीनचे काम लोकांना खूप आवडले. आज जरीन खान चे नाव बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. बॉलिवूडमध्ये तिचे करियरचे श्रेय सलमानला दिले जाते. सलमाननेच तिला बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली होती आणि मोठ्या चित्रपटांत काम करून जरीन आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.