रानू मंडल ह्यांचा रेल्वे फ्लॅटफॉर्मवर गातानाचा व्हिडीओ कुणीतरी काढला. आणि तो सोशिअल मीडियावर बघता बघता वायरल सुद्धा झाला. त्या व्हिडीओमुळे लोकांना रानू मंडल ह्यांचा आवाज ऐकता आला. त्यामुळे मग हि व्यक्ती कोण आहे ह्याचा शोध सुरु झाला. आणि मग रानू मंडल हिची माहिती मीडियाला लागली. एकदा मीडियाला अशी बातमी लागली म्हणजे तिला सेलिब्रेटी करूनच सोडले. त्यानंतर हिमेश रेशमियाने सुद्धा तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. तिला हिमेश रेशमियाच्या चित्रपटात एक-दोन नाही तर तब्बल तीन गाणी गायची संधी मिळाली. त्यातली जी गाणी रिलीज झाली आहे ती लोकप्रिय सुद्धा होत आहेत. त्यामुळे रानू मंडल यांना आता ऑफर्स येणे सुरु झालेले आहे. अगदी न्यूज चॅनेल पासून ते सोशिअल मीडियापर्यंत त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि स्टेटमेंट पर्यंत चर्चा होताना दिसत आहे.
जसजश्या रानू मंडल लोकप्रिय होत गेल्या तश्या त्यांच्या बद्दलच्या बातम्यासुद्धा वाढत गेल्या. मग ते मुलीसोबत भेट असू द्या कि लतामंगेशकर ह्यांनी दिलेले स्टेटमेंट असू द्या. अनेकांनी त्यात रानू मंडल कश्या चुकीच्या किंवा बरोबर आहेत हे दाखवायचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्याबद्दल खोट्या बातम्यासुद्धा पसरवल्या. तसेही एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली कि त्या व्यक्तीबद्दल काही अफवा सुद्धा पसरतातच ना. अगदी तसेच रानू मंडल ह्यांच्या बाबतीत सुद्धा झालं. त्यांच्याबाबत बोललं गेलं कि त्यांना सलमान खानने ५५ लाखांचं घर दिलं आहे. हि बातमी सोशिअल मीडियावर वाऱ्यासारखी वायरल सुद्धा झाली. त्यानंतर काही दिवसानंतर रानू मंडल ह्यांच्या मॅनेजरने ह्या गोष्टीचे खंडन केले. त्यानंतर काही आठवड्याने स्वतः रानू मंडल ह्यांनी मीडियासमोर येऊन हि गोष्ट एक अफवा असल्याचे सांगितले.
एक अफवा थांबते न थांबते लगेच बातमी आली कि रानू मंडल ह्यांना सलमानने ‘दबंग ३’ चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनेकांना वाटलं होतं कि ‘दबंग ३’ चित्रपटातील गाण्यांना रानू मंडल ह्यांच्या मधुर आवाजाची साथ लाभणार आहे. परंतु स्वतः सलमान खानने बॉंबे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ह्या गोष्टींचे खंडन केले आहे. ह्या दोन्ही गोष्टी अफवा असल्याचे त्याने सांगितले. ह्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, “मी रानू मंडल यांना घर घेऊन देत असल्याची बातमी साफ खोटी आहे. माझ्या कानावर हि बातमी आली आहे. पण मी त्यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीचे श्रेय घेऊ शकत नाही.” त्याने ‘दबंग ३’ चित्रपटात रानू मंडल ह्यांना संधी दिल्याच्या बातमीला सुद्धा फेटाळले. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘दबंग ३’ मध्ये व्यस्त आहे. ह्या चित्रपटात त्याच्या सोबत महेश मांजरेकर ह्यांची कन्या सई मांजरेकर मुख्य भूमिकेत असून तिचा हा बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात महेश मांजरेकर ह्यांची सुद्धा भूमिका आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होणार आहे.