Breaking News
Home / बॉलीवुड / सलमान, विवेकनंतर कसे झाले ऐश्वर्याला अभिषेकवर प्रेम, खूप मनोरंजक आहे दोघांची प्रेमकहाणी

सलमान, विवेकनंतर कसे झाले ऐश्वर्याला अभिषेकवर प्रेम, खूप मनोरंजक आहे दोघांची प्रेमकहाणी

जवळजवळ दोन दशकाअगोदर ऐश्वर्या राय बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होती. तरुणांच्या गळयातील जणू टाईतच होती. त्यावेळी प्रत्येक तरुणाच्या मनात एकच प्रश्न होता, कि ऐश्वर्या राय लग्न कोणासोबत करणार ? कोण असणार जो तिच्या हृदयावर राज करेल. ‘हम दिल दे चुके सनम’ च्या यशानंतर असं मानलं जात होते कि सलमान आणि ऐश्वर्या लग्नाच्या नात्यात बांधले जाऊ शकतात. परंतु सलमान आणि ऐश्वर्या मध्ये हळूहळू खटके उडू लागले. त्यानंतर एकेकाळी लोकप्रिय असणारे हे कपल काही काळाने वेगळे झाले. दोघांचे प्रेमप्रकरण तर गाजलेच. परंतु दोघांमधील वाद देखील मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला. आजही ह्या दोघांनी कोणत्या चित्रपटांत एकमेकांसोबत काम केले नाही किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नाही. सलमाननंतर ऐश्वर्याचे नाव विवेक सोबत जोडले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात दोघेही कपल म्हणून इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले. परंतु ते कधी वेगळे झाले कळलेच नाही. त्यानंतर मात्र ऐश्वर्याचे सूत जुळले ते मात्र अभिषेक बच्चन सोबत. आणि त्यानंतर दोघांचे लग्न सुद्धा झाले. अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेम कहाणी खूपच मनोरंजक अशी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यच्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा अनेक चाहते त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यात रस घेत आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्या पहिल्यांदा १९९७ साली एका चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल काम करत होते. बॉबी देओल हा अभिषेक बच्चन ह्याचा जवळचा मित्र असल्यामुळे तो सेटवर आला होता. त्यावेळी दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर मग २००० साली दोघांनी पहिल्यांदा एका चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘ढाई अक्षर प्रेम के’. त्यानंतर २००३ साली ‘कुछ ना कहो’ ह्या चित्रपटांत एकत्र काम केले होते. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. परंतु त्यावेळी दोघेही कोण्या वेगळ्यांना डेट करत होते. तेव्हा ऐश्वर्या सलमानला तर अभिषेक करिष्मा कपूरला डेट करत होता. २००५ साली ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे’ रे गाण्याच्या शूटिंग दरम्यान दोघेही एकमेकांना ओळखू लागले. त्यावेळी दोघेही सिंगल होते. २००६-२००७ मध्ये त्यांनी ‘उमराव जान’, ‘गुरु’ आणि ‘धूम २’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांनीही एकत्र क्वालिटी टाइम घालवला. दोघांमध्ये बोलणं वाढलं होतं. दोघांची बॉण्डिंग वाढली होती. दोघेही एकमेकांची काळजी घेऊ लागले होते. चित्रपट ‘धूम २’ च्या शूटिंग दरम्यान दोघांनाही एकमेकांशी केव्हा प्रेम झाले, हे दोघांनाही समजले नाही.

शेवटी अभिषेकने न्यूयॉर्कमधील हॉटेलमधील एका खोलीच्या बाल्कनी मध्ये हिऱ्याच्या अंगठी सोबत ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रीमिअर नंतर ऐश्वर्याला प्रपोज केले. हि जागा अभिषेकसाठी खूप खास आहे. कारण तिथेच उभे राहून तो विचार करत असायचा कि एके दिवशी मी ऐश्वर्यासोबत इथे येईल, जेव्हा आमचे लग्न होईल. ऐश्वर्याने अभिषेकच्या प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याचा २००७ साली बच्चन हाऊस ‘जलसा’ मध्ये साखरपुडा झाला. त्यानंतर ह्या नात्याबद्दल जवळजवळ सर्वांना माहिती पडू लागले आणि ते दोघेही अनेकदा एकत्र चित्रपट पाहू लागले. नाईट क्लब्स मध्ये एकत्र फिरू लागले. ऐश्वर्या सुद्धा बच्चन परिवारातील घरात सतत जाऊ लागली. ऐश्वर्याला मंगळ होते त्यामुळे तिला लग्नाअगोदर एका पिंपळाच्या झाडासोबत लग्न करावे लागले. त्यानंतर, २० एप्रिल २००७ साली दोघांनी लग्न केले. लग्नाची वरात बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’ घरापासून ऐश्वर्याच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यापर्यंत गेली.

त्यांचे लग्न खूप काळापर्यंत चर्चेत राहिले. आणि पाहुण्यांमध्ये अनेक लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी, राजनीती व्यक्ती आणि उद्योगपती हजर होते. अभिषेक बच्चनने ह्या अगोदर मीडियासमोर नेहमी हेच सांगितले कि, आमच्या दोघांमध्ये अगोदर ऐश्वर्याच माझ्या प्रेमात पडली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनाही आराध्या नावाची सुंदर मुलगी आहे. ह्या पावर कपलच्या चित्रपटाविषयी गोष्ट कराल, तर दोघेही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे डायरेक्टर सर्वेश मेवारा ह्याच्या आगामी चित्रपट ‘गुलाब जामुन’ मध्ये दिसतील. काही दिवसांअगोदर अभिषेक बच्चनचा रिलीज झालेला ‘मनमर्जिया’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. ह्या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्की कौशल मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अभिषेकने तापसीच्या पतीची भूमिका निभावली होती. ‘मनमर्जिया’ चित्रपटाद्वारे अभिषेकने जवळजवळ दोन वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.