Breaking News
Home / बॉलीवुड / सलमान सोबत असलेली हि लहान मुलगी आहे ह्या मराठी सुपरस्टारची मुलगी, आता झाली आहे मोठी

सलमान सोबत असलेली हि लहान मुलगी आहे ह्या मराठी सुपरस्टारची मुलगी, आता झाली आहे मोठी

सध्याच्या दिवसांत बॉलिवूडचा सुलतान म्हणजे सलमान खान आपल्या येणाऱ्या ‘दबंग ३’ चित्रपटाचे प्रमोशन खूप जोरात करत आहे. ह्या चित्रपटांत तो पुन्हा एकदा ‘चुलबुल पांडे’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटांत एक नवीन अभिनेत्री पर्दापण करत आहे. ती अभिनेत्री म्हणजे सई मांजरेकर. सई मांजरेकर हि लोकप्रिय अभिनेता महेश मांजरेकर ह्यांची मुलगी असून, ती सलमान सोबत आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात करत आहे. चित्रपट रिलीज होण्या अगोदरच सई मांजरेकर चर्चेमध्ये आहे. आपल्या पहिल्या चित्रपटातच सई सलमानच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. हेच कारण आहे कि, सलमान खान आपली चित्रपटातली गर्लफ्रेंड सई सोबत प्रमोट करण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही आहे. मग ते कोणते अवॉर्ड फंक्शन मध्ये तिला सोबत घेऊन जाणे असो किंवा सोशिअल मीडियावर तिच्यासोबत फोटो शेअर करणे असो. सलमान अनेकदा सई सोबत दिसून येत आहे.

आता सोशिअल मीडियावर सईचा लहानपणाचा फोटो खूप वायरल होत आहे. ज्यात ती सलमान खान सोबत दिसत आहे. हा फोटो स्वतः सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अनेक वर्षाअगोदर घेतल्या गेलेल्या ह्या फोटोत सई मांजरेकर सलमान खान सोबत पोज देताना दिसत आहे आणि आता काही दिवसांत ती सलमान सोबत बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्या गेलेल्या सई मांजरेकरने स्वतः ह्या फोटोबद्दल सांगितले कि, “मी वडिलांसोबत सलमानच्या घरी गेली होती. तेव्हा तिथे हा फोटो काढला होता. त्यावेळी मला खूप भूक लागली होती, तेव्हा सलमान सरांनी मला एक चॉकलेटने भरलेले ट्रे दिले होते. त्या चॉकलेट्सच्या रॅपरला मी अनके वर्षांपर्यंत सांभाळून ठेवले होते.” तसं तर सई चर्चेत असण्यामागचे अजून एक कारण सुद्धा आहे, आणि ते कारण म्हणजे तिच्या आणि सलमानमध्ये असलेले वयाचे फरक. सई मांजरेकर सलमानपेक्षा जवळजवळ ३३ वर्षांनी लहान आहे आणि ह्या चित्रपटात ती सलमान सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

 

सोनाक्षी सिन्हाने ‘दबंग’ चित्रपटाच्या पहिल्या भागात सलमान खानच्या पत्नीची भूमिका निभावली होती आणि ह्या चित्रपटात तिच्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर ह्यांनी निभावली होती. दबंग ३ मध्ये सुद्धा महेश मांजरेकर पुन्हा एकदा दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महेश मांजरेकर हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येतील. सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पर्दापण करून जरी सईचे स्वप्न साकार होत असले तरी, ह्या पेक्षा सुद्धा तिच्यासाठी अजून एक खास गोष्ट आहे. ‘दबंग ३’ चित्रपटात ती आपल्या आई वडिल महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ह्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ह्या चित्रपटांत मेधा मांजरेकर महेश मांजरेकर ह्यांच्या पत्नीची भूमिका निभावत असून, जे एकप्रकारे मांजरेकर कुटुंबासाठी मोठ्या पडद्यावर रियुनियनच असणार आहे. ‘दबंग ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत असून हा चित्रपट ह्या महिन्यात म्हणजे येत्या २० डिसेंबरला ख्रिसमसच्या काळात प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटात प्रीती झिंटा सुद्धा एक महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *