Breaking News
Home / मराठी तडका / सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी आणि पश्या खऱ्या आयुष्यात कसे आहेत बघा

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी आणि पश्या खऱ्या आयुष्यात कसे आहेत बघा

गेल्या आठवड्यात, लोकप्रिय अभिनेत्री ‘नंदिता पाटकर’ यांच्या अभिनयप्रवासावरील एक लेख मराठी गप्पावर आपण वाचलात आणि त्यास उत्तम प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद. नंदिता यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा सगळ्या माध्यमांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्यांची एक मालिका सुरु आहे, ‘सहकुटुंब सहपरिवार’ नावाची. यातील त्यांची ‘सुरु वहिनी’ हि भूमिका घराघरात लोकप्रिय होते आहे. एका कुटुंबातील मोठ्या भावाची बायको हि त्यांची भूमिका. या मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नवऱ्याची, म्हणजे घरातील वडील भावाची भूमिका सुनील बर्वे यांनी निभावली आहे. या जोडीच्या अभिनयाची जशी प्रशंसा होते आहे, तशीच या मालिकेतील दुसरी एक जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हि आहे, अंजी आणि पश्याची जोडी. या व्यक्तिरेखांमध्ये अंजीची भूमिका, ‘कोमल कुंभार’ हिने आणि पश्या ची भूमिका, ‘आकाश नलावडे’ याने केलेली आहे. नवोदित कलाकार असूनही, व्यक्तिरेखा साकारताना दोघांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि दोन्ही पात्रांचे चुरचुरीत संवाद यांमुळे हि जोडी प्रेक्षकांच्या आवडीची होते आहे. आजच्या लेखात याच गुणी कलाकारांच्या अभिनय प्रवासाविषयी थोडंसं.

सुनीलजी आणि नंदिताजी यांच्या व्यक्तिरेखा जेवढ्या समजूतदार आणि शांत दाखवल्या आहेत. तेवढीच अंजी आणि पश्या हि जोडी तारुण्याचा उत्साह दर्शवणारी, चुका करणारी पण त्यातून शिकत जाणारी अशी दाखवली आहे. तसेच मालिकेतील त्यांच्या जोडीच्या प्रवासाला दोन्ही व्यक्तिरेखांच्या चुरचुरीत बोलण्याची जोड मिळते. त्यामुळे, त्यांची केमिस्ट्री अजूनच खुलून येते. हे दोन्ही कलाकार मालिका क्षेत्रात नवोदित असले तरीही, एकांकिका आणि नाटकांच्या माध्यमातून रंगमंचावर काम करण्याचा अनुभव असलेले आहेत. कोमल कुंभार हिची हि पहिलीच मालिका असली तरीही तिच्या गाठीशी, अनेक एकांकिका आणि नाटकांत काम करण्याचा अनुभव आहे.

कोमल हि नाटकांसोबतच शॉर्ट फिल्म्सशी सुद्धा निगडीत आहे. तिने एका शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे. ‘अड्डा’ असं त्या शॉर्ट फिल्मचं नाव. हि शॉर्ट फिल्म, ‘पंचमदेव रंगमंच’ या संस्थेची होती. तसेच, याच संस्थेच्या ‘सिग्नेचर’ या शॉर्ट फिल्मच्या असिस्टंट डीरेक्टर पदाची सूत्र सांभाळली होती. तिला अभिनयासोबतच, गाण्याचीही आवड आहे. तिचे गाण्याचे काही विडीयोज तिच्या सोशल मिडिया वर शेअर केले होते खरे. पण काही दिवसांपूर्वी तिचं इंस्टाग्राम अकाउंट हॅ क झाल्याने ते सगळे निघून गेले आहेत. पण तिच्या नवीन अकाउंटवरून तिच्या आवाजाची जादू पुन्हा तिच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार हे नक्की.

तिच्याचप्रमाणे आकाश नलावडे, ज्याने प्रशांत म्हणजे पश्या हि भूमिका केलेली आहे, हा सुद्धा, मराठी मनोरंजन विश्वातला उगवता तारा. त्याने सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र मधून नाट्यप्रशिक्षण पूर्ण केलंय. ललित कला केंद्रात असताना प्रायोगिक नाट्यकृतींतून त्याने अभिनयाचे बारकावे समजावून घेतले होते. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, नंदिता पाटकर यांनी त्याच्या ‘पश्या’च्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं होतं. ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट’, ‘द सिगल’ या त्याच्या काही प्रसिद्ध नाट्यकृती. ‘काही वेड्या काही शहाण्या, काही जिवंत काही मे लेल्या काही नुसत्याच’ असं लांब लचक नाव असलेल्या एकांकिकेतहि तो होता. हि एकांकिका, खुल्या अंगणमंचावर केली गेली होती. नाव जसं लक्ष वेधून घेणारं होतं, तसच, यातील कलाकारांचा अभिनयहि. एका प्रथितयश वृत्तपत्राने या प्रयोगाची दखल घेतली होती.

एकीकडे एकांकिकाचा अनुभव गाठीशी आला होता, मग आकाश ने मालिका आणि सिनेमा क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं. त्याच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावरील मालिका. तसेच, ‘स्पेशल फोर्स’ या ‘फक्त मराठी’ चॅनेलवरील मालिकेत त्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. मालिकांसोबतच त्याने, मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला आहे. फ्लिपकार्ट, लोकसत्ता यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी कधी त्याने अनुक्रमे मॉडेलिंग आणि अभिनय केलेला आहे.

तर अशी हि नवोदित आणि प्रतिभावंत कलाकारांची जोडी आपल्याला ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून रोज भेटते. त्यांच्यातल्या उत्साहामुळे, चुरचुरीत संवादांमुळे, मालिकेतील व्यक्तिरेखा आणि प्रसंगांची रंगत वाढते आहे. येत्या काळात अंजी आणि पश्या या व्यक्तिरेखा, खूप लोकप्रियत मिळवतील हे नक्की. या दोन्ही गुणी कलाकारांना या मालिकेसाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. वर उल्लेख झाला तो ‘गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट’ या नाटकाचा. या नाटकात मणिराज पवार यानेही काम केलंय. मणिराज याला आपण ओळखतो ते ‘राजा राणीची गं जोडी’ या सुप्रसिद्ध मालिकेमुळे. मणिराज याच्या या मालिका आणि नाट्य प्रवासाचा आढावा आपण काही दिवसांपूर्वी मराठी गप्पाच्या एका लेखात घेतला होता. आपण तो लेख वाचला नसल्यास, जरूर वाचवा हि विनंती. आपल्या मराठी गप्पाला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *