गेल्या काही काळात अनेक कलाकारांची लग्नं झाली. अजूनही होत आहेत. यातील एका जोडीचं लग्न प्रचंड गाजलं. हे लग्न जसं भव्यदिव्य होतं, तसंच बराच काळ या लग्नाविषयीची उत्सुकता लोकांच्या आणि खासकरून या जोडीच्या चाहत्यांच्या मनात होती. ही जोडी म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. यातील मिताली हिची एक मालिका सुरू आहेच. सोबत सिद्धार्थ चीही नवीन मालिका दाखल झाली आहे. ‘सांग तू आहेस का’ असं या मालिकेचं नाव. थ’रारपट असलेल्या या मालिकेत सिद्धार्थ सोबत शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या नायिका आहेत. या दोघींविषयी आपण मराठी गप्पावरच्या लेखातून आपण वाचलं आहेच. आजच्या लेखातून आपण ह्या मालिकेत स्वराजची मुख्य भूमिका निभावणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेणार आहोत.
सिद्धार्थ हा पुण्याचा. त्याची आई सीमा चांदेकर या अनेक वर्षे अभिनेत्री म्हणून रंगमंचावर कार्यरत होत्या. अभिनयाचा हा गुण सिद्धार्थ याच्याकडेही आला आहेच. शाळेपासूनच सिद्धार्थ एकांकिका मधून अभिनय करत होता. त्याच्यातील अभिनेत्याला पैलू पडत होते. त्यामुळे तरुण असला तरीही गंभीर व्यक्तीरेखा साकारणं त्याला जमत होतं. शाळेतून महाविद्यालयात गेल्यानंतर ही एकांकिका स्पर्धांमधून अभिनय करणं सुरू होतं. सोबत त्याने अग्निहोत्र या मालिकेत एका महत्वपूर्ण भूमिकेतून मालिका क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. पुढेही त्याने टीव्हीच्या पडद्यावरून काम करणं सुरूच ठेवलं. कशाला उद्याची बात, मधू इथे चंद्र तिथे, प्रेम हे जिवलगा या त्याच्या गाजलेल्या मालिका. ढोलकीच्या तालावर या नृत्य कार्यक्रमाचा तो सूत्रसंचालक होता. त्याची खुसखुशीत संवाद साधण्याची मैत्रीपूर्ण शैली प्रेक्षकपसंतीस उतरली. मालिका, टीव्ही कार्यक्रम यांच्यासोबतच त्याला चित्रपटातून अभिनय करण्याची इच्छा होती. अग्निहोत्र साकार होण्याच्या काळातच त्याने अवधूत गुप्ते यांच्या ‘झेंडा’ या चित्रपटातुन त्याने मराठी सिने सृष्टीत पदार्पण केलं होतं.
‘झेंडा’तील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. पुढे त्याने अनेक चित्रपट केले. क्लासमेट,गुलाबजाम, पिंडदान, वजनदार, ऑनलाईन बिनलाईन हे त्यातील लोकप्रिय ठरलेले चित्रपट. रंगमंच, मालिका, चित्रपट ही मनोरंजन माध्यमं गाजवत असताना वेबसिरीज हे नंवमाध्यम ही त्याने आपल्या अभिनयाने गाजवलं आहे. मायानगरी- सिटी ऑफ ड्रीम्स ही त्याची वेबसिरीज. सिद्धार्थ याच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक यानिमित्ताने झालं. सिद्धार्थ हा स्वतः जसा एक उत्तम अभिनेता आहे, तसाच तो उत्तम प्रेक्षक ही आहे. त्याला विविध कलाकृती पाहायला आवडतात. त्यातही अँनिमेशन चित्रपट पाहणं त्याला खूप आवडतं आणि मिनियन्स या त्याच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत. सिद्धार्थ हा सध्या ‘ सांग तू आहेस का’ या मालिकेत व्यस्त आहे. तसेच येत्या काळात त्याच्या झिम्मा नावाचा चित्रपट प्रदर्शित होईल असं कळतं आहे.
तसेच वेब सिरीज ही येत्या काळात येतीलच. त्यामुळे या वर्षी सिद्धार्थ याच्या चाहत्यांना एक प्रकारे पर्वणीच आहे असं म्हणू शकतो. सिद्धार्थ याच्या या नवीन प्रोजेक्ट्स साठी आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून शुभेच्छा. तसेच सिद्धार्थ आणि मिताली यांचं नुकतंच लग्न झालं. या दोघांनाही त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! या दोघांच्या प्रेम कथेविषयी आणि त्यांच्या लग्नाविषयी आमच्या टीमने वेळोवेळी लेखन केलेलं आहे. तुम्हाला या विषयी जाणून घ्यायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन सिद्धार्थ किंवा मिताली असं लिहुन सर्च करा. आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख वाचण्यास मिळतील.