अल्लू अर्जुन हा साऊथ चित्रपटसृष्टीचा खूप मोठा सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि ऍक्शनसाठी ओळखले जाते. त्याच्या करिअरची सुरुवात ‘गंगोत्री’ चित्रपटापासून झाली होती. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत अनेक अवॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. काही चित्रपटांत तर त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर आणि टॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा नंदी अवार्ड सुद्धा मिळाले आहेत. अर्जुनच्या वडिलांचे नाव अल्लू अरविंद आहे. अल्लू अरविंद तेलुगू चित्रपटसृष्टीचे नावाजलेले डायरेक्टर आहेत. इतकंच नाही तर अल्लू अर्जुन तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी ह्यांचा भाचा देखील आहे.
अल्लू अर्जुनचे ६ मार्च २०१६ रोजी स्नेहा रेड्डी सोबत लग्न झाले होते. त्यांनी मोठ्या थाटामाटात हैद्राबादमध्ये लग्न केले. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा खूपच सुंदर आहे. दिसायला ती कोण्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ह्या सुंदर दाम्पत्यांना दोन मुले असून मुलाचे नाव अयान तर मुलीचे नाव अर्हा असे आहे. अल्लू अर्जुनचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे आणि अनेकदा त्याने ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. एका मुलाखतीत अल्लू अर्जुनने सांगितले होते कि, त्याची आणि स्नेहाची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती. लग्नात ओळख झाली आणि नंतर हळूहळू मैत्री झाली. हळूहळू दोघांना एकमेकांशी प्रेम झाले, ज्याच्या काही दिवसानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहा दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच ती बुद्धिमान सुद्धा आहे. स्नेहाने आपले शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले. तिने कॉम्पुटर सायन्स मध्ये डिग्री घेतली आहे. स्नेहाचे वडील हैद्राबाद येथील नावाजलेले व्यावसायिक आहेत.
लग्नाअगोदर स्नेहाला खूपच कमी लोकं ओळखत होते. गेल्या काही दिवसांअगोदरच स्नेहाचा ३५ जन्मदिवस होता. अल्लू अर्जुनने खूपच रोमँटिक पद्धतीने आपल्या पत्नीचा जन्मदिवस साजरा केला. त्याने आपल्या पत्नीसाठी शानदार पार्टी आयोजित केली होती, ज्याचे फोटोज सोशिअल मीडियावर खूप चर्चेत होते. आपल्या पत्नीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी अल्लू अर्जुनने आपल्या घरीच छोट्याश्या पार्टीचे आयोजन केले होते. दिव्यांच्या प्रकाशझोतात आणि काही मोजक्याच पाहुण्यांसोबत अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहाने आपला वाढदिवस साजरा केला होता. सोशिअल मिडीआयवर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी देखील जन्मदिवसाच्या स्नेहाला शुभेच्छा दिल्या. जर अल्लू अर्जुन बद्दल बोलाल तर अभिनयासोबत तो डान्स देखील उत्तम करतो. साऊथमध्ये त्याची खूप मोठी फॅन्स फॉलोईंग आहे. अल्लू अर्जुनने साऊथच्या अनेक हिट चित्रपटांत काम केलेले आहे. ‘बद्रीनाथ’, ‘बन्नी’, ‘जलाई’, ‘देसमुडुरु’, ‘वरुडु’, ‘परुगु’, ‘आर्या’ ह्यासारखे त्याचे अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत.
अल्लू अर्जुनची लाइफस्टाइल :
सूत्रांच्या माहितीनुसार,अल्लू अर्जुन त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास १४ तो १५ कोटी इतके मानधन घेतो. २०१६ मध्ये त्याने पार्टनरशिपमध्ये ‘800 ज्युबली’ नावाचे नाईट क्लब सुरु केले. चित्रपट, डान्स व्यतिरिक्त अल्लू अर्जुनचे त्याच्या लक्जरी गाड्यांवरील प्रेमसुद्धा सर्वश्रुत आहे. त्याच्या जवळ रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, ऑडी, जॅग्वार सारख्या लक्जरी गाड्यांचे कलेक्शन आहे. काही वर्षाअगोदर अल्लू अर्जुन रॉयल व्हॅनिटी वॅन फाल्कन विकत घेऊन खूप चर्चेत आला होता. त्याने मागील वर्षी जगातील सर्वात महागड्या गाड्यांमधील एक रेंजरोवर सुद्धा विकत घेतली आहे. रेन्जरोवरच्या ह्या गाडीची किंमत तब्बल २.३ कोटी रुपये इतकी आहे. इतकंच नाही तर अल्लू अर्जुनचे हैद्राबाद येथील आलिशान बंगल्याची किंमत तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा सुद्धा जास्त आहे. जुबली हिल्स येथील त्याच्या घराला लोकप्रिय इंटिरियर डिझाइनर आमिर आणि हामीदा ह्यांनी डेकोरेट केले आहे. २०१६ मध्ये अल्लू अर्जुन गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणारा टॉलिवूड सेलिब्रेटी होता.