Breaking News
Home / मनोरंजन / साखरपुड्याच्या दिवशी नवऱ्याने केलं नवरीला हटके स्वरूपात प्रपोज, नवरीला ह्याची कल्पनाही नव्हती

साखरपुड्याच्या दिवशी नवऱ्याने केलं नवरीला हटके स्वरूपात प्रपोज, नवरीला ह्याची कल्पनाही नव्हती

लग्नाचे वायरल व्हिडियोज वरील लेख वाचणं आपल्या सगळ्यांना आवडतं. त्यासाठी आपली टीम सातत्याने विविध व्हिडियोज बघून त्यावर लिखाण करत असते. पण आज आम्ही ज्या व्हिडियो वर लेख लिहिला आहे तो व्हिडियो आधारलेला आहे एका साखरपुड्याच्या समारंभावर. पण यातील मजा मस्ती अगदी थेट लग्न समारंभासारखी आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी अजून जास्त जाणून घेऊयात. हा वायरल व्हिडियो आहे तदाशा मिश्रा हिच्या युट्यु’ब चॅनेलवरचा. एक फॅशन ब्लॉ’गर म्हणून कार्यरत असणारी तदाशा विविध ब्युटी टिप्स आणि फॅशन क्षेत्राशी निगडित व्हिडियोज पोस्ट करत असते. दोन महिन्यापूर्वी तिचा साखरपुडा पार पडला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रेय असं आहे. या दोघांचा हा साखरपुडा पार पडला आणि त्या समारंभात तदाशा हिला एक उत्तम सरप्राईज मिळालं. ते होतं श्रेय कडून आलेलं प्रपोजल. पण ते ही हटके पद्धतीने. त्याने आणि कुटुंबाने मस्त मस्त डान्स परफॉर्मन्स सादर करायचं ठरवलं पण त्याची कल्पना तदाशा हिला नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी हा एक सुखद धक्काच होता.

त्यातही गंमतीचा भाग असा की पहिले काही परफॉर्मन्स हे या जोडीच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांनी केले. त्यावेळी श्रेयने आपल्याला काही माहीती नाही असा अभिनय केला. पण जेव्हा त्याच्या बहिणी त्याला डान्स करण्यासाठी डान्स फ्लोअर वर घेऊन गेल्या तेव्हा मात्र हा पठ्ठा मस्तपैकी नाचला.हा तदाशा हिच्यासाठी अजून एक सुखद धक्का होता. या आनंदात भर पडत जाते ती श्रेय याच्या एकसो एक परफॉर्मन्स मुळे. काय नाचतो बंदा. अगदी कडक. एक लडकी को देखा तो ऐसा लगा, तू तू मेरी मैं तेरा होने लगा या दोन गाण्यांवर त्याचा डान्स भन्नाट होतो. हा बॉलिवूड मध्ये वगैरे काम करतो का असं वाटावं इतक्या आत्मविश्वासाने त्याचं नृत्य सुरू असतं. आपणही मस्त आनंद घेत असतो. एव्हाना बाकीची मंडळीही येऊन जाऊन परफॉर्मन्स देत असतात. पण पुढील परफॉर्मन्स साठी मात्र खऱ्या अर्थाने पूर्ण ग्रुप एकत्र येतो. यात काही तरी विशेष आहे हे कळून येतं. कारण प्रत्येकाचं लक्ष पाठी उभ्या असलेल्या श्रेय कडे असतं. तो अगदी दिमाखात पुढे येतो. आता गाणं वाजत नसतं, वाजत असते तो फक्त धून.

त्याच्या देहबोली वरून आता तो धमाकेदार काही तरी करणार हे नक्की असतं. तेवढ्यात एक इंग्रजी गाणं वाजू लागतं. ब्रुनो मार्स याचं गाजलेलं ‘हे बेबी, आय थिंक आय वॉन्ना मॅरी यु’ हे ते गाणं असतं. मग काय श्रेय अगदी थाटात पुढे जातो आणि तदाशा हिला आपल्या समवेत डान्स फ्लोरच्या मध्यभागी घेऊन येतो. आजूबाजूला मित्रमंडळी आणि भाऊ बहिणी रिंगण करून उभे असतातच. त्या सगळ्यांना कल्पना असते पुढे काय होणार आहे त्याची. आपल्यालाही कल्पना येते. तदाशा मात्र अगदी भावुक झालेली असते. सुखद धक्क्यांवर धक्के मिळाल्यामुळे ती अतिशय आनंदी दिसून येते..आणि तो क्षण येतो. श्रेय गुडघ्यावर बसून तदाशा हिला प्रपोज करतो. अर्थातच नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तिच्या होकारासोबत श्रेय त्याच्या हातातील अंगठी तिच्या बोटांत सरकवतो. तेवढ्यात एक मुलगी पुढे होत दुसरी अंगठी तदाशा हिला देते. तदाशा ही अंगठी श्रेयच्या बोटांत सरकवते आणि साखरपुडा संपन्न होतो.

व्हिडियो संपला तरी आपल्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्न असं स्मित असतं. या तरुण जोडीच्या जीवनातील आनंदी प्रसंगाचा आपण या व्हिडियो मार्फत भाग होऊ शकलो याचा आनंद असतो. सोबतच जे मस्त मस्त डान्स बघायला मिळाले त्याचाही आनंद असतो. आम्हाला तर हा व्हिडीयो प्रचंड आवडला. हे दोघे एकमेकांना अनुरूप तर आहेतच सोबतच एकमेकांच्या आवडीनिवडीचा विचार ते अगदी मनापासून करतात हे बघून आनंद झाला. नुकत्याच साखरपुडा झालेल्या या जोडीला मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. पण केवळ एवढ्यावरंच थांबू नका. खास तुमच्यासाठी आपली टीम सातत्याने नवनवीन विषयांवर लेखन करत असते. दररोज हे लेख प्रकाशित ही होत असतात. तेव्हा त्यांचा आनंद घ्या. मराठी गप्पाविषयी लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.