Breaking News
Home / माहिती / सातवी पा’स असलेला हा तरुण १२ वर्षांपासून मुलींना मो’फत केक वा’टतोय, ह्यामागचे का’रण पाहून तुम्हांलाही अ’भिमान वाटेल

सातवी पा’स असलेला हा तरुण १२ वर्षांपासून मुलींना मो’फत केक वा’टतोय, ह्यामागचे का’रण पाहून तुम्हांलाही अ’भिमान वाटेल

आपल्या देशात ‘मुलगी वाचवा’ मोहीम खूप जोरात चालू आहे आणि लोकांना मुलींच्या प्रति जागरूक केले जात आहे. मुली वाचवा मोहिमेला सुरत येथील संजय चोडवडिया ह्यांनी एका वेगळ्या प्रकारे पुढे नेले आहे. संजय प्रत्येक वर्षी मुलींना मो’फत केक वाटतो. होय, मोफत केक देत संजय चोडवडिया मुलींच्या जन्मासाठी प्रोत्सहन देत आहे. संजय चोडवडिया ह्याच्या म्हणण्यानुसार तो प्रत्येकवर्षी ७ हजार पेक्षा सुद्धा जास्त मुलींना केक वाटतो. ज्याची किं’मत ७ लाखांच्या जवळपास आहे.

खरंतर, संजय चोडवडिया ह्याचे एक केकचे दुकान आहे. ज्यात तो वेगवेगळ्या प्रकारच्या केकची वि’क्री करतो. संजयने आपल्या दुकानात एक विशेष योजना ठेवली आहे. ह्या योजनेअंतर्गत तो अश्या लोकांना मो’फत केक देतो ज्यांना मुली आहेत. संजय ने सांगितले कि, जर त्याच्या दुकानात कोणी आपल्या मुलीच्या जन्मदिवशी केक घेण्यासाठी येतो तेव्हा तो त्यांना मो’फत केक देतो. संजयने दिलेल्या माहितीनुसार तो ५ वर्षांच्या मुलींना मो’फत केक देत आहे आणि आतापर्यत ७ लाख रुपयांपर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त केक वाटले आहेत. त्याची हि मोहीम गेल्या १२ वर्षांपासून सुरु आहे.

संजय रोजगाराच्या शोधात सुरत मध्ये आला होत आणि सुरत आल्यानंतर त्याने ८ वर्षे हिऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये हिऱ्यांना पॉलिश करण्याचे काम केले. ह्यानंतर त्याने एम्ब्रॉयडरीच्या कारखान्यात काम केले. काही वर्षापर्यंत येथे काम केल्यानंतर त्याने आपली स्वतःची बेकरी सुरु केली. जी गेल्या १२ वर्षांपासून चालू आहे. हि बेकरी डभोली परिसरात ‘घनश्याम बेकरी अँड केक’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आता ह्याच नावाने १४ शाखा सुद्धा आहेत.

हे होते कारण :

संजयने सांगितले कि जवळपास १२ वर्षे जुनी गोष्ट आहे. कटारगाम परिसरात कथावाचक मोरारी बापू ह्यांचे प्रवचन होत होते. तेव्हा मी हे प्रवचन ऐकण्यास गेलो. प्रवचनादरम्यान बापूंनीं ‘मुलगी वाचवा’ मोहिमेबद्दल भाष्य केले. बापूंचे हेच प्रवचन ऐकल्यानंतर मी सुद्धा ह्या मोहिमेस हातभार लावण्याचा निर्णय घेतला. आणि आपला एक वेगळा मार्ग अवलंबला.

संजयने दिलेल्या माहितीनुसार त्याने गरीब वस्तीतील मुलींना त्यांच्या जन्मदिवशी मो’फत केक देण्यास सुरुवात केली. ह्यासाठी सरकारी रुग्णालयातून मुलींच्या जन्माबद्दल माहिती घेतली आणि त्यांच्या घरापर्यंत केक पोहोचवले. तेव्हा पासून हि योजना चालूच आहे. संजय म्हणतो कि, मुली पुढे गेल्या तरच देश पुढे जाईल. ह्यासाठी सर्व लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

संजय म्हणतो कि, अनेक लोकं त्याला हा प्रश्न विचारतात कि, शेवटी केक वाटल्याने काय होणार? ह्यावर संजय त्यांना उत्तर देतो कि, जन्मदिवसाच्या क्षणी त्या गोडी मुलीच्या चेहऱ्यावर हास्य येते, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे.

आपल्या ह्या अनोख्या योजनेअंतर्गत संजयने पहिल्या वर्षी १ हजार किलो केक वाटले होते. तर आज त्याच्या १४ शाखा आहेत. जे मिळून प्रत्येक वर्षी ७ हजार किलो केक मुलींच्या घरी पोहोचवत आहेत. संजयच्या कोणत्याही शाखेत संपर्क करून त्या मुलीचे कुटुंब मो’फत केक घेऊन जाऊ शकतात. ह्याशिवाय संजयच्या बेकरीतर्फे मुलींना १०० रु’पये किंमतीचे २५० ग्रॅम केक मो’फत दिले जाते. संजयच्या ह्या योजनेला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव देण्यासाठी तयारी सुद्धा चालू आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.