आजकालचे युग म्हणजे सोशिअल मीडियाचे युग झाले आहे. एखादी अतरंगी गोष्ट घडली आणि त्याचा फोटो इंटरनेटवर टाकला तर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. अशीच एक व्हायरल झालेली घटना आहे. आज आपण एका अजब व्हायरल झालेल्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. समाजमाध्यमांवर गेल्या काही काळात सात महिलांचे छायाचित्रं मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. ही बातमी वाचुन काही काळासाठी तुम्हीसुध्दा अचंबित व्हाल. अमेरिकेतील कसांस येथील शाळेत सात महिला एकाच वेळी गर्भवती झाल्यामुळे अनोखी स्थिती निर्माण झाली. ऑक्टोबर महिन्यात या सातही महिला आपापल्या बाळांना ऑक्टोबर महिन्यात जन्म देणार आहेत.
या शाळेचं नाव ओक स्ट्रीट प्राथमिक स्कूल आहे. या शाळेत एकुण १४ शिक्षिका शिकवतात. यातल्या ७ जणी एकसाथ मातृत्व म्हणजे काय हे अनुभवणार आहे. त्या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार सात जणी एकसाथ आई होणार आहेत हा आमच्यासाठी रोमांचकारी अनुभव आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका एश्ले मिलर म्हणाल्या- याआधी मार्च आणि ऑक्टोबर मध्ये एकाच वेळी दोन शिक्षिकांनी आपल्या बाळांना जन्म दिला होता व आता तर एकाचवेळी सात जणींच्या गर्भवती होण्याचं वृत्त ऐकुन मी अचंबित झाले आहे. एका स्थानिक न्यूज चैनलशी बोलताना एश्ले मिलर म्हणाल्या- आता आमच्या शाळेला पॅम्पर्स, हगीज सारख्या प्रायोजकांची गरज आहे व विनोदी शैलीतच पुढे म्हणाल्या – आजकाल लोकं आमच्या शाळेतलं पाणी प्यायला सुध्दा घाबरत आहेत. मुख्याध्यापिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सातही शिक्षिका मातृत्वरूपी नव्या अवकाशात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या ऐवजी बदली शिक्षिकांना शाळेत शिकविण्यासाठी बोलावले जाईल. त्या पुढे म्हणाल्या- सात शिक्षिका एकूणआठ बाळांना जन्म देणार असून त्यापैकी एक शिक्षिका जुळ्या बाळांना जन्म देणार आहे.