Breaking News
Home / जरा हटके / सायकलवरून झोमॅटो ऑर्डर डिलिव्हर करणाऱ्या मुलाला पाहिल्यावर गाडीत बसलेल्या ह्या माणसाने बघा पुढे काय केले ते

सायकलवरून झोमॅटो ऑर्डर डिलिव्हर करणाऱ्या मुलाला पाहिल्यावर गाडीत बसलेल्या ह्या माणसाने बघा पुढे काय केले ते

गेल्या वर्षभरात आपल्याला अनेक खऱ्या आयुष्यातले लाईफ सुपरहिरो बघायला मिळाले. यातील अनेक अनामिक हिरोज असेही आहेत जे आपल्या दैनंदिन आयुष्याच्या भाग आहेत पण आपल्याला त्यांचं महत्व पटकन जाणवत नाही. यातील एक घटक म्हणजे आपल्या घरी जेवण, खाद्यपदार्थ यांची डिलिव्हरी करणारी माणसं.लॉक डाऊन आणि त्यानंतरच्या काळातही अनेक बाबी मिळणं जेव्हा मुश्किल झालं, तेव्हा ही सगळी माणसं अगदी देवदूत वाटली. एरवी त्यांचं काम आपल्याला सोप्पं वाटतं. पण जेव्हा आपल्या ओळखीतील कोणी एखादा माणूस हे काम करतो तेव्हा कळतं. ग्राहकांना वेळच्या वेळी आणि गरमा गरम जेवण मिळावं म्हणून करावी लागणारी धडपड हीच माणसं जाणोत. यांच्यातील अनेक जण हे आपल्याला बाईक्स किंवा सायकल घेऊन डिलिव्हरी करताना दिसतात. बाईक मुळे चट्कन पोहोचता येतं तर सायकल मुळे पैशांची बचत होते. त्यामुळे दोन्ही पर्याय आपापल्या जागी योग्य ठरतात. अनेक वेळेस ही मंडळी मग सायकल चा पर्याय निवडताना दिसतात.

आपण एरवी त्यांना टिप्स देत असतो. आपल्या परीने ते करत असलेल्या कामाची पोचपावती देत असतो. पण काही वेळेस अशी दिलदार माणसं ही भेटतात की जी अपेक्षेपलिकडे जाऊन मदत करतात. असाच एक किस्सा घडला एका डिलिव्हरी बॉय सोबत. काही कारणाने तो आणि एक गृहस्थ यांची गाठभेट झाली. या भेटीचा आणि पुढील भेटीचा व्हिडियो वायरल झाला आहे. या भेटीत या गृहस्थांनी या तरुणाला मदत करण्याचा विचार केलेला दिसतो. त्यांनी हा विचारच ते बोलूनही दाखवतात असं दिसून येतं. हा व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला आणि त्यावर थोडक्यात का होईना पण लिहावं असं वाटलं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे दादा आपल्या गाडीतून जाताना आपल्याला दिसतात. थोड्या वेळाने ते एका कंपनीच्या डिलिव्हरी बॉय शी बोलताना दिसून येतात. काही दिवसांनी त्याने या दादांना भेटावं असं ते त्याला सुचवतात. या भेटीत ते त्याला एखादी बाईक किंवा काही पैसे देऊ करू असं सांगतात. आपण नीट बघितलं तर तो सायकल चालवत असतो असं दिसून येतं. त्यांच्या या आश्वासनामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान झळकलेलं आपण पाहतो.

पुढच्या काही सेकंदात आपल्याला काही काळाने हे दोघेही भेटल्याचं दिसून येतं. त्यात हे दादा त्या तरुणाला एक बाईक भेट म्हणून देताना दिसतात. यातून हे दादा आपलं वचन पाळतात असं दिसून येतं. तरुणाचा आणि त्याच्या सोबत असलेल्या ताईंचा आनंद आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. हा व्हिडियो किती जुना आहे माहीत नाही पण या दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आजही आपल्याला प्रसन्न करून जातो.

या व्हिडियो वरील आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी खात्री आहे. आपल्या वाचकांसाठी आपली टीम नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करत असते. आपणही मोठ्या प्रमाणावर हे लेख शेअर करत आम्हाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देत असता. त्याबद्दल धन्यवाद. येत्या काळातही आपला हा पाठिंबा आणि प्रोत्साहन आपल्या टीमला कायम मिळत राहील हे नक्की. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *