भाई आपल्याला जर एखादी गोष्ट येत नाही ना, तर त्यांच्या भानगडीत पडू नये. त्याचा काय परिणाम होतो ना ती गोष्ट या व्हीडिओतून स्पष्ट दिसू लागते. व्हीडिओत दिसत असलेल्या तात्यानं आयुष्यात लवंगी फोडली नसेल आणि चालला सुतळी बॉम्ब फोडायला. तात्याच्या जो काही सालटं निघालाया ना त्याच्यावर पोरांनी असलं कोललं आहे कि विचारुन सोय नाही. तात्याच्या या सगळ्या प्रकारात एक गोष्ट लक्षात आली असेल की परत दिवाळीत असली करामत करायला जाऊ नये. तात्यानं फटाके फोडायची ट्रेनिंग काय घेतली नाहीये. ट्रेनिंग कुठंतरी कमी पडलीया नायतर पोरं बॉ’म्ब बघायला आणि बॉ’म्ब फोडायला कुठबी कमी नसतात बघा.
तात्या शेठनं केलं काय ते बघा. पोरांंनी हट्टानं मागवलं बॉ’म्ब. बरं तात्याला सांगितलं की, फोडून दे. पोराकडं एवढा मोठा सुतळी बॉ’म्ब का द्यायचा म्हणून त्यानं केलं काय की, स्वतःच लावायचं ठरवलं. बरं संध्याकाळी मस्तपैकी जेवून वैगरे लावू म्हटलं तर पोरगं ऐकेना. म्हणालं आत्ताच लावायचा. ऐकायलाच तयार नाही. रडून रडून सापशिडीवर जसं साप लोळतायतं.
या बॉक्समधनं त्या आकड्यावर तसंच काय ते करायला लागल्यात. त्यामुळे पोरांनं गळ घातली म्हणून आता आई काय शांत बसणार नव्हती. आईनं पण तात्याला लाडानं पाठवलं. बरं तात्या मार्केटला जाऊन आलते, पार घामानं भिजून बिजून.. काही केल्या घाम पाघळायचा थांबना. म्हणून अंघोळ करायला जायला निघाले. हाातत एका बोटावर तंबाखुची मशिरी घेतली. ती मशिरी काय असते ते सांगतो. तं’बाखू असा भाजायचा आणि त्याला भाजलेल्या तं’बाखूला एका बाटलीत भरून ठेवायची. हीच आपली दंजमंजन.
ही पद्धत लई वाईट. तात्याला बी माहितीयं एवढं लावलं की भोवळ येते. तरी बी प्रेशर येत नाय म्हणून तात्या या गोष्टी लावत सुटतो. तात्याच्या याच सगळ्या गोष्टीमुळं सालटं जाणार हे त्याला माहिती असतं तर कदाचित त्यानं ही मशेरी लावायची सोडून दिली असती. असो पोरगं काय रडायचं थांबना. पोरानं हट्टच केला. तात्याला थाराच करीना. पोराला फटकावायचं तर तो आयशीचा लाडका म्हणून काय बोलायची सोय नाही. ज्या दिवशी पोराला तुडवायचं त्या दिवशी रात्री पोरगं आईपाशीच झोपायचं म्हणून तात्यानं काय याला हात लावयाचा नाही, असलंंचं ठरवलं होतं. पण तात्याला याची शिक्षा अशी मिळलं, असं वाटलं नव्हतं.
तात्या शेवटी निघाला. हातात बॉ’म्बची पिशवी घेतल्यावर काय गल्लीतली पोरं थारावणार थोडीच आहेत. त्यांनीही घोळका केला. कसा बॉ’म्ब लावायचा त्याची अक्कल तात्याला शिकवू लागले होते. बॉ’म्ब लावायबद्दल तात्याची जराशीबी इच्छा नव्हती. त्यामुळे तात्याला बी कसा इंटरेस्ट नव्हता. पण काय करणार पोराच्या आणि बायकोच्या हट्टापुढं देवाचं चाललं नाही तर तात्यांचं काय चालणार. पोरं बी लई वंगाळ गड्या. आता तात्याला डिरेक्शन द्यायला लागली. तात्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण तात्याला ऐकावं लागलं. बॉ’म्बचे पैसे काय तात्यानं दिलं नव्हतं. त्यामुळे वात पेटेना. शेवटी वात कशी बशी लागली. पण तात्याला कळंना की काय करावं कुठं पळावं. शेवटी बॉ’म्ब अचानक फुटला आणि तात्यानं जी धूम ठोकली जी अशी धूम ठोकली की जसा स्केटींग करता करता माणूस बर्फावरुन घसरत जातोयं ना तसं तात्या घसरत घसरत घरंगळत गेले. त्याच्याची पार सालटं गेली. त्यामुळं असल्या पोरांच्या हट्टाला बळी पडायचं नायं आणि गल्लीतल्या पोरांच्या म्हणण्यानुसार काही करायचंही नायं.
बघा व्हिडीओ :