Breaking News
Home / मनोरंजन / सिंहिणीच्या तावडीत सापडलं होते झेब्राचं पिलल्लू, बघा पिल्लाला वाचवण्यासाठी आईने काय केलं ते

सिंहिणीच्या तावडीत सापडलं होते झेब्राचं पिलल्लू, बघा पिल्लाला वाचवण्यासाठी आईने काय केलं ते

जंगलात मानवच नाही तर प्राणीही सुरक्षित नाहीत. त्याच्या मृ त्यूचा धोका नेहमीच असतो. जंगलात एखादा प्राणी नेहमी दुसऱ्या प्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. शिकारीदेखील कधीतरी स्वतःच बळी ठरतो. अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी अशक्त प्राणी शिकारी प्राण्यांशी भिडतात. यात त्यांना जीव गमवावा लागतो पण पर्याय नसतो. कधी कधी शिकारी प्राण्याला हार मानावी लागते तो एकदम शांत आणि भित्र्या असलेल्या प्राण्यांसमोर… असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फॉटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात, जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंहीण झेब्रावर हल्ला करताना दिसत आहे. या हल्ल्यानंतर झेब्राला इतका राग आला की जंगलाचा राजाही अस्वस्थ झाला. सोशल मीडियावरील या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नेहमीच सगळ्यात शांत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेब्राने आपल्याला पिलाला वाचवण्यासाठी चक्क एका दुसऱ्या प्राण्याला मा रण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नसून सिंहीण आहे. जे खरोखरच सगळ्यांना आश्चर्य करणारे आहे.

झेब्रा तसा शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे तो पालापाचोळा खातो. आपण बऱ्याचदा त्याला शांतपणे खाताना किंवा फिरताना पाहिले असेल. परंतु हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. यामध्ये हा शाकाहारी आणि शांत असणारा प्राणी चक्क सिंहिणीशी पंगा घेताना दिसत आहे. व्हिडीओत दिसून येते की, जंगलात शिकार शोधत सिंहीण एका झेब्राच्या कळपाजवळ येऊन पोहोचते. थोडा वेळ अंदाज घेण्यासाठी थांबलेली सिंहीण दबा धरून बसलेली असते. अशातच झेब्राच्या कळपाला अंदाज येतो, की सिंहीण ह ल्ला करणार आहे आणि मग क्षणात झेब्राच्या कळप पळत सुटला…

पण या झेब्राची काही पिले होती, जी जास्त वेगाने पळू शकत नव्हती. आणि असेच एक पिल्लू सिंहिणीच्या तावडीत सापडते. ती पिलावर ह ल्ला करते. मात्र, आता आपला जीव वाचणार नाही, हे पिलाला लक्षात आल्याने ते प्रतिकार करत नाही. पण या पिलाची वेगाने पुढे गेलेली झेब्रा आई आपल्या पिलाला पकडले हे बघते…. सिंहीण जेव्हा एखाद्या प्राण्यावर हल्ला करते, तेव्हा आपले दात तिच्या मानेत घुसवते. आपली नखं आणि दात यांचा वापर करून समोरच्या प्राण्याला गुडघ्यावर आणते आणि मग शिकार करते. एखाद्या प्राण्याच्या मानेवर वार केल्यानंतर तो प्राणी अर्धमे ला होतो आणि त्याची शिकार करणं सोपं जातं. त्यासाठी वाघ किंवा सिंह हे प्रत्येक प्राण्याच्या मानेला निशाणा बनवताना दिसून येतात. अगदी या व्हिडीओत पण सिंहीण या झेब्राच्या पिलाला एकदम ताकदीने मानेवर ह ल्ला करते.

पिल्लू लगेच घायाळ होते. त्याच्या मानेचा घोट घेऊन त्याला ठा र करण्याच्या बेतात ती असतानाच झेब्राच्या आईने जोरदार लाथ मारून मागे ढकलले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सिंहीणही काहीशी चपापली. आणि तिने या ह ल्ल्यात माघार घेतली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणू शकाल की, जेव्हा आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते तेव्हा दुर्बलही बलवान होतात.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.