Breaking News
Home / मनोरंजन / सिक्कीम मधील शाळेतल्या शिक्षकाने सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

सिक्कीम मधील शाळेतल्या शिक्षकाने सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम आणि आपले वाचक यांच्यात अनेक बाबी समान असाव्यात असा आमचा कयास आहे. एका बाबतीत तर मात्र खात्रीच आहे. ही बाब म्हणजे आपल्या टीमला आणि आपल्या वाचकांना वायरल व्हिडियोज विषयी जाणून घ्यायला आवडतं. याचा परिणाम असा की विविध वायरल व्हिडियो बघण्याचा आणि त्यावर लिहिण्याचा जणू आपल्या टीमला छंदच लागला आहे. तर हे लेख वाचण्याचा छंद आपल्या वाचकांना लागला आहे. याचा परिपाक म्हणजे आपली टीम सातत्याने विविध विषयांचा धांडोळा घेत असते. त्याचा फायदा असा की आपल्या वाचकांसाठी चोखंदळपणे लिखाण करता येतं. विविध पर्यायांतून निवड करून लिखाण करण्यासाठी मुबलक विषय उपलब्ध होतात. पण काही व्हिडियोज हे असे असतात की पाहताच क्षणी मनात भरतात. त्यांना दुसरा कोणताही व्हिडियो पर्याय असावा असं वाटत नाही. किंबहुना आपण स्वतः हा व्हिडियो अनेक वेळा बघतो. आजही तसच झालं. आपली टीम एक व्हिडियो बघत असताना एका व्हिडियो वर आपल्या टीमची नजर खिळली ती खिळलीच. लक्षच हटेना. आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल याविषयी एकमत झालं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो आहे एका शिक्षकाच. या शिक्षकाचं नाव आहे सोनम भूतीया. सिक्कीम मधील एका शाळेत शिकवणारे हे शिक्षक. मुलांना शिक्षण देता देता स्वतः सुद्धा विविध विषयांची रुची असणारे आणि ही आवड जपणारे हे शिक्षक. सोनम यांना डान्सची प्रचंड आवड आहे. या आवडीतूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आवारात भारतीय स्वातंत्रदिन समारंभानिमित्त डान्स केला होता. हे आवार म्हणजे फुटबॉल साठी उपयोगात आणलं जाणार मैदान आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा मैदानाच्या मध्यभागी सोनम उभे असतात. त्यांच्या समोर आणि मागील बाजूस बरीच जण उपस्थित असतात. तसेच गाणंही सुरू झालेलं असतं. रेस २ या गाजलेल्या चित्रपटातलं तेवढंच सुप्रसिद्ध गाणं – ‘तेरी लत लग गयी’ हे गाणं वाजत असतं. गाणं सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जवळपास चार मिनिटं सोनम हे डान्स करत असतात. या संपूर्ण डान्सचं विश्लेषण करायला गेलं तर बऱ्याच बाबी समोर येतात. पण त्यातील ठळक बाबी म्हणजे सोनम यांना डान्स करण्याची आवड आहेच सोबत त्यांची तशी तयारी आहे हे सुद्धा कळून येतं.

त्यांच्या एकदम सुरेख स्टेप्स वरून याचा अंदाज येतो. कारण डान्सची सतत तालीम केल्याशिवाय एवढ्या उत्तमरीत्या डान्स करणं अशक्य वाटतं. तसेच या संपूर्ण डान्स मध्ये त्यांनी जे पदलालित्य दाखवलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ते गिरक्या घेतात तेव्हा खासकरून हे जाणवतं. सोबतच डान्स करण्यासाठी लागणारा उत्साहही त्यांच्यात ठासून भरला आहे हे जाणवतं. याच उत्साहात ते एवढा वेळ नाचतात. तसेच अजून एक कौतुकाची बाब म्हणजे डान्स करणाऱ्याकडून मंचाच्या विस्तीर्ण भागाचा वापर व्हावा अशी सहसा अपेक्षा असते. सोनम डान्स करत असलेल्या बहुतांश भागाचा वापर आपल्या डान्स साठी अगदी यशस्वीपणे करून घेतात. कारण डान्स सुरू करून पुन्हा संपवतात एकाच जागेवर. पण या काळात जवळपास पूर्ण मैदान फिरून आलेले असतात. या संपूर्ण व्हिडियोत त्यांची स्टाईल भाव खाऊन जाते. त्यांचा हा परफॉर्मन्स उत्तरोत्तर रंगत जातो. सुरुवातीला केवळ त्यांचा डान्स बघण्यात गुंग असलेले प्रेक्षक हळूहळू त्यांच्या या उत्साहात सामील होतात. दोन मिनिटांच्या नंतर तर हा आनंद वाढत जातो आणि जेव्हा व्हिडियो संपतो तोपर्यंत प्रत्येक जण सोनम यांच्या साठी टाळ्या वाजवत असतो. व्हिडियो संपल्यावर आपल्यालाही सोनम यांच्या विषयी कौतुक वाटत असतं.

शिक्षक म्हणून कार्यरत असताना हे काम सांभाळत सोनम स्वतःतील आवड जोपासताना दिसून येतात. त्यांच्या युट्युब चॅनेल वरून त्यांना रुची असलेल्या विविध गोष्टी बघता येतात. यातून त्यांचा कलासक्त स्वभाव समोर येतो. त्यांचा विषयी असलेली माहिती ही त्यांच्या काही मुलाखतींतून कळून येते. वर उल्लेख केलेला व्हिडियो वायरल झाल्यावर त्यांच्यावर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्याचाच एक भाग म्हणजे या मुलाखती. आपल्या टीमनेही त्यांच्या विषयी आपल्या सगळ्यांना थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. तसेच वर उल्लेख केलेला व्हिडियो आपण बघितला असेल तर आपल्याला ही तो आवडला असणार. तेव्हा त्यावरील प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच आपण ज्या मोठ्या प्रमाणात आपले लेख शेअर करत असता, ते ही शेअर करत राहा. यामुळे आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची उर्मी मिळते. ही उर्मी आपल्या पाठिंब्याच्या जोरावर यापुढेही टिकून राहील हे नक्की. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *