Breaking News
Home / मराठी तडका / सिद्धार्थ जाधवची प्रेमकहाणी आहे खूपच फिल्मी, मुलगी श्रीमंत असल्यामुळे घरचे होते लग्नाविरुद्ध

सिद्धार्थ जाधवची प्रेमकहाणी आहे खूपच फिल्मी, मुलगी श्रीमंत असल्यामुळे घरचे होते लग्नाविरुद्ध

सिद्धार्थ जाधव म्हटला कि डोळ्यासमोर येतो तो कुरळ्या केसांचा, डोळे मिचकावणारा, तोंडाने विचित्र हावभाव करून हसवणारा चेहरा. सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीला जत्रा, दे धक्का, येरे येरे पैसा ह्यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्याने अनेक नाटकांत, चित्रपटांत कामे केली. इतकंच नाही तर बॉलिवूड चित्रपटांत देखील त्याने आपल्या विनोदी अभिनयाची कमाल दाखवली. ‘गोलमाल’ ते ‘सिम्बा’ ह्यासारख्या हिंदी चित्रपटांत त्याने काम केले. त्याचबरोबर अनेक लोकप्रिय कॉमेडी रिऍलिटी शो मध्ये सुद्धा दिसून आला. मराठी चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता असलेल्या सिद्धार्थ जाधवची लव्हस्टोरी सुद्धा एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा सुद्धा कमी नाही आहे. तर चला जाणून घेऊया आजच्या लेखात सिद्धार्थची अनोखी प्रेमकहाणी. सिद्धार्थ जाधवची घरची परिस्थिती खूपच हलाकीची होती. बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे सिद्धार्थने नाटकात काम करायला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांत लहान मोठ्या भूमिका केल्या. त्याच बरोबर त्याने नाटकात असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करायला सुरुवात केली.

असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम बघत असतानाच त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी एक घटना घडली. साल २००० च्या आसपास सिद्धार्थ ‘रामभरोसे’ ह्या नाटकाचे असिस्टंट दिगदर्शक म्हणून काम पाहत होता. ह्या नाटकासाठी त्यावेळी ऑडिशन्स चालू होत्या. त्यावेळी ऑडिशनसाठी एक मुलगी आली. त्या मुलीने अगदी बिनधास्त, न विसरता आणि कुणाचीही पर्वा न करता अभिनय करून दाखवला. तिचे हे बिनधास्त वागणं आणि तिचा हा स्वभाव सिद्धार्थला खूप आवडला. त्या मुलीने सिद्धार्थच्या मनात घर केले होते. त्या मुलीचे नाव होते तृप्ती अक्कलवार. तृप्ती दिसायला एकदम साधी सुंदर आणि मनाने खूप सोज्वळ. तिला पाहताच क्षणी सिद्धार्थला आवडली होती. त्यामुळे सिद्धार्थने सुद्धा त्याच्या सरांना सांगितले कि ह्या मुलींमध्ये खूप क्षमता आहे, ती नक्कीच आपल्या नाटकाला पुढे घेऊन जाईल. आपल्या नाटकासाठी हि मुलगी एकदम योग्य आहे. त्यामुळे त्यांनी मग तृप्तीला नाटकात घ्यायचे ठरवलं. जेव्हा तृप्तीला नाटकासाठी फायनल केले गेले हे सांगण्यात आले तेव्हा तिने नाटकासाठी नकार दिला. कारण तृप्ती एक जर्नालिस्ट होती. तिने पत्रकारितेचा कोर्स केला होता. त्यामुळे ती तिच्या करिअरच्या दृष्टीने खूप फोकस होती. तिला जर्नालिस्ट मध्ये करिअर करायचे होते. त्यामुळे तिने नाटकाची ऑफर नाकारली. परंतु सिद्धार्थची खूप इच्छा होती कि तृप्तीने ह्या नाटकामध्ये काम करावे.

ह्याअगोदरसुद्धा तृप्तीने अनेक नाटकात काम केले होते. तिने वेगवेगळ्या कमर्शिअल आणि प्रायोगिक नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. जेव्हा सिद्धार्थला समजले कि तृप्ती ह्या नाटकामध्ये काम करत नाही आहे, तेव्हा त्याने ठरवले कि आता वेळ वाया घालवायचा नाही. त्याला माहिती होते कि १० ते १५ दिवसांमध्ये तृप्ती येथून निघून जाणार आहे. त्यामुळे तो चलबिचल झाला. त्याने ठरवले कि काहीही होवो तृप्तीला प्रपोज करायचाच. त्यामुळे तो प्रपोज करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तो तिचा वेगवेगळ्या ठिकाणी लपून पाठलाग करू लागला. तो सतत तृप्तीचा विचार करू लागला, त्यामुळे त्याचे तृप्तीबद्दलचे प्रेम अजून वाढत गेले. शेवटी तो दिवस आलाच, आणि त्याने प्रपोज केली ती जागा सुद्धा वेगळीच होती. त्याने १० जुलै २००२ रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन जे आताचे प्रभादेवी आहे त्या रेल्वे स्टेशनवर प्रपोज केले. सिद्धार्थ जाधव मनाने खूप साधा आणि भोळा स्वभावाचा होता, त्याच्या मनामध्ये जे असते ती गोष्ट तो पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्याने काही वर्षांपूर्वीच असे ठरवले होते कि, जर तो कोणत्या मुलीला प्रपोज करेल तर ते साधंसुधं प्रपोज नसणार, तर लग्न करशील का असंच विचारणार. सिद्धार्थने असंच केले. तो तृप्तीसोबत स्टेशनवर गेला. त्याने तिला विचारले कि, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. त्यावर तृप्तीने सांगितले काय सांगायचे आहे तुला. त्यावर सिद्धार्थ म्हणाला माझ्याशी लग्न करशील का. हे ऐकताच तृप्ती थोडीशी हादरली. सिद्धार्थ जरी खूप उत्साही आणि साधा सरळ मुलगा असला तरी तृप्ती खूप समंजस होती. आणि तिला सामाजिक भानही होते. त्यामुळे ती त्याला म्हणाली लग्न म्हणजे खेळ नव्हे. लग्न करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. एकमेकांना समजून घ्यावे लागते. त्यामुळेच ती थोडी बॅकफूटला गेली.

त्यावर सिद्धार्थ म्हणाला ठीक आहे, मग मैत्री तरी करशील का, मित्र व्हायला काय हरकत आहे. अश्यापद्धतीने दोघांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले, भेटू लागले. सिद्धार्थ तृप्तीबद्दल खूप पजेसिव्ह होता. तिने कोणा मित्रांसोबत बोललेलेसुद्धा सिद्धार्थला आवडत नसे. तृप्तीला कोणा मित्राचा फोन आला कि सिद्धार्थ लगेच नाराज व्हायचा. तृप्तीच्या हे लक्षात आल्यावर तिने सिद्धार्थला सांगितले कि, आपण बोलणं थांबवायला हवं. तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि मला सुद्धा माझे करिअर करायचे आहे. हे फक्त सिद्धार्थचे एकट्याचे ब्रेकअप होते. तृप्तीच्या मनात अजूनही त्याच्याबद्दल तितकी ओढ निर्माण झाली नव्हती. परंतु जेव्हा तृप्तीने सांगितले कि आपण बोलायचं थांबवूया. त्याच्यानंतर तृप्तीला सुद्धा वाटू लागलं कि एक चांगला मित्र आपल्यापासून दूर जातोय. आपण प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत शेअर करत होतो. तिला प्रत्येक क्षणामध्ये सिद्धार्थची आठवण येऊ लागली. तिला सुद्धा जाणीव झाली कि आपले सुद्धा सिद्धार्थ वर प्रेम आहे. बोरिवलीच्या बीचवर ती सिद्धार्थला पुन्हा एकदा भेटली. सिद्धार्थला भेटल्यावर सिद्धार्थने पुन्हा एकच प्रश्न विचारला कि आपण लग्न करूया का. त्यावेळी तृप्ती खूप शांत आणि विचारात मग्न होती. तिनेसुद्धा ठाम ठरवले होते कि कधी ना कधी लग्न करायचेच आहे. त्यामुळे तिनेसुद्धा लग्नाला होकार दिला आणि दोघेही खूप खुश झाले. सिद्धार्थने ज्या मुलीसोबत प्रेम केले होते त्याच मुलीसोबत तो लग्न करणार होता ह्यामुळे सिद्दार्थला खूप आनंद झाला.

तृप्तीच्या घरातील सगळे लोक सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीला होते. तृप्तीचे सुद्धा पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती सुद्धा नोकरी करत होती. ह्याउलट सिद्धार्थच्या घराची परिस्थिती खूपच हलाकीची होती. त्याचे करिअर सुद्धा काही नीट सेटल नव्हते. त्यामुळे तृप्तीचे घरचे लग्नाच्या विरोधात होते. परंतु दोघांनी मात्र लग्न करायचे तर एकमेकांशीच असे ठरवले होते. त्यामुळेच त्यांनी हे आव्हान स्वीकारले. दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. शेवटी १० मे २००७ रोजी दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघांच्या घरातून थोडाफार विरोध झाला. परंतु काही दिवसानंतर घरातल्यांनी हे लग्न मान्य केले. इतकंच नाही तर त्यांच्या घरच्यांनी हे लग्न यशस्वी होण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन सुद्धा केले. सिद्धार्थने नाटकाच्या पुरस्कारावेळी एक प्रसंग सांगितला, कि त्याचे कपडे साधेसुधे होते आणि तो स्टेज वर जात होता. तेव्हा चांगलं दिसण्यासाठी तृप्तीने स्वतःच्या गळ्यातील चैन सिद्धार्थच्या गळ्यात घातली. त्याचा हा सोहळा तिच्यामुळे अविस्मरणीय झाला. त्यावेळी तृप्ती घरी खोटे सांगून सिद्धार्थला भेटायला आली होती. अशाप्रकारचे अनेक प्रसंग सिद्धार्थ वेळोवेळी सांगत असतो. लग्नाच्या वाढदिवशी सिद्धार्थने एक पोस्ट टाकली होती, ‘माझ्यासारख्या वेड्या माणसासोबत लग्न करण्यासाठी आणि नेहमी साथ देण्यासाठी तृप्तीचे खूप खूप आभार.’ आपल्या यशाचे श्रेय सिद्धार्थ नेहमी तृप्तीलाच देतो. तो सांगत असतो कि तृप्ती हे सिद्धार्थच्या गाडीचे इंजिन ऑइल आहे. सिद्धार्थला दोन मुली असून मोठीचे नाव स्वरा आणि छोटीचे नाव इरा आहे. सिद्धार्थ आणि तृप्तीच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *