Breaking News
Home / मराठी तडका / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कामिनीचा नवरा आहे मराठी अभिनेता, बघा खऱ्या जीवनात कामिनी क शी आहे

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कामिनीचा नवरा आहे मराठी अभिनेता, बघा खऱ्या जीवनात कामिनी क शी आहे

प्रत्येक गोष्टीमध्ये जसे नायक आणि नायिका हे महत्वाचे असतात तसेच त्यातील खलनायक आणि खलनायिका सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. किंबहुना जेवढी खल भूमिका ताकदीची तेवढीच नायक किंवा नायिकेच्या भूमिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. मालिकांमध्ये तर या भूमिकांचं खूप अप्रूप. कारण अनेक वेळेस या खलनायक आणि खलनायिका, नायकांच्या भूमिकांसोबत मालिकेत दाखल होतात. तर काही वेळेस मालिका सुरु झाल्यानंतर. अनेक वेळेस तर मुख्य भुमिकेइतकं महत्व या व्यक्तिरेखांना मिळतं. अशीच एक व्यक्तिरेखा, “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेतील आहे. यात कामिनी नावाच्या खलनायिकेचा प्रवेश झाला आहे. हि भूमिका केली आहे पूजा पुरंदरे हिने. या तिच्या खलभूमिकेनिमित्त तिच्या मालिकांतील वाटचालीचा घेतलेला आढावा.

पूजा हि मुळची पुण्याची. तिथे तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आहे. तिथे ती नाटकांमधून अभिनय क्षेत्रात सक्रीय झाली. फिरोदिया करंडक आणि इतर नाट्यस्पर्धांमधून ती अभिनय करत होती. पुढे संधी मिळाल्यावर तिने मालिकांमधून अभिनय करणं सुरु केलं. यात तिने नायिका आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे पूजाने रंगवलेली “कामिनी” हि भूमिका काही पहिली खलभूमिका नाही. याधीही तिने सुंदर माझं घर या मालिकेत गायत्री हे पात्र साकारलं होतं, जे खलनायिकेचं होतं. त्यात सचिन देशपांडे याची मुख्य भूमिका होती. यानंतर तिने “किती सांगायचं मला” या मालिकेतही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. देवयानी आणि नकुशी या गाजलेल्या मालिकांतही ती होती. एकंदर तिचा प्रवास पाहता, नेमकेच पण उत्तम प्रोजेक्ट्स करण्याकडे तिचा कल दिसतो. अभिनयासोबतच तिला नृत्याची आवड असून, तिने शास्त्रीय नृत्यात प्रशिक्षण घेतलं आहे.

अभिनया व्यतिरिक्त ती एक उत्तम खवय्यी आहे, असं म्हणता येईल. तसंच, तिला बाहेर फिरायलाही आवडतं. तिचं लग्न नुकतंच काही काळापूर्वी झालं आहे. तिच्या पतीचं नाव विजय आंदळकर असं आहे. विजय पेशाने वकील आहे आणि अभिनयही करतो. त्यानेही पूजा प्रमाणे गाजलेल्या कलाकृतींमध्ये अभिनय केला आहे. त्यातलं अगदी ताजं उदाहरण म्हणजे “स्वराज्य रक्षक संभाजी” हि मालिका. वर्तुळ, प्रेमा तुझा रंग कसा या मालिकांतही तो होता. तसेच मिस्टर अँड मिर्सेस सदाचारी, शिमगा यासारख्या मराठी सिनेमातही त्याने काम केलं आहे. बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमातही त्याची महत्वपूर्ण भूमिका होती.

पूजा सध्या कामिनी या नव्या भूमिकेत अगदी व्यस्त आहे. पण त्यातही एक सामाजिक संदेश देणाऱ्या म्युझिक विडीयोचा ती भाग होती. या विडीयोचं नाव नया इंडिया. यात अनेक नावाजलेले मराठी कलाकार सहभागी झाले होते. लॉकडाऊननंतरच्या परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं. गेल्या काही काळांत तिचा लुकही बराच बदलला आहे आणि जास्त ग्लॅमरस झाला आहे. बदलत्या काळासोबत तिने स्वतःच्या अभिनयात आणि व्यक्तिमत्वात अभिनेत्री म्हणून बदल केले आहेत. अशा या नाविन्याची कास धरणाऱ्या अभिनेत्रीकडून मालिका आणि इतर माध्यमांतून येत्या काळात नवनवीन भूमिका पहायला मिळतील यात शंका नाही. पूजाच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *