मनोरंजन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सुदैवाने आपल्याला आज वैविध्यपूर्ण माध्यमातून आपलं मनोरंजन करणारे अनेक कलाकार लाभले आहेत. त्यात अगदी आजच्या काळात इन्फ्लुएन्सर्स म्हणून प्रसिद्ध झालेले ही अनेक जण आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात कलाकारांची आणि त्यांनी साकार केलेल्या कलाकृतींची गर्दी झाल्यासारखी वाटते कधी कधी. तोच तोच पणा वाटतो. पण यातून काही वेळ विरंगुळा म्हणून जुन्या काळातील कलाकृतींना बघावसं हमखास वाटतं. या कलाकृतींमधील संवाद, नृत्य, गाणं यांमुळे पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्याला घेता येतो. अशाच प्रकारचा आनंद आपल्याला नुकताच घेता आला तो एका रियालिटी शो मधून. या रियालिटी शो मध्ये एका प्रसिद्ध चित्रपटातील लोकप्रिय गाणं सादर केलं गेलं होतं. त्यात हा आनंद द्विगुणित झाला कारण यात सादर केलेलं गाणं ज्या चित्रपटातलं होतं, त्या चित्रपटातल्या एका जोडीने यात सहभाग घेतला होता.
आपण बरोबर ओळखलंत. सुपर डान्सर या लोकप्रिय रियालिटी शो बद्दल आपण जाणून घेता आहात. या शो चं सध्या चौथं पर्व सुरू आहे. त्यातही यंदाच्या एपिसोड मध्ये, बॉलिवूड मधील अनुभवी आणि लोकप्रिय अभिनेते सुनील शेट्टी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमातील एक परीक्षक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा या होय. शिल्पाजी आणि सुनीलजी यांचा धडकन हा चित्रपट सुमारे दोन दशकांपूर्वी आला होता. या चित्रपटाला त्याकाळी एवढी लोकप्रियता मिळाली होती की त्यातील सगळीच गाणी आजही प्रसिद्ध आहेत. पण त्यातही सगळ्यांत जास्त लक्षात राहिलेलं गाणं म्हणजे ‘दिल ने ये कहा हैं दिल से, मोहब्बत हो गयी हैं तुमसे’. तसेच यातील दोघांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या होत्या. सुनीलजींनी देव आणि शिल्पाजींनी अंजली ही भूमिका साकार केली होती. तर अशी ही जोडी एकत्र एका मंचावर असताना या चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या नसत्या तरच नवल. मग काय, सगळ्यांचे लाडके सुनीलजी आणि शिल्पाजी मंचावर आले. त्यानंतर वर उल्लेख केलेल्या गाण्यावर त्यांनी जो परफॉर्मन्स दिला तो जुन्या आठवणी ताजा करणारा होता.
अभिनयात मात्तब्बर असणारे हे दोन्ही कलाकार एवढी वर्षे लोकप्रिय का आहेत हे यानिमित्ताने पुन्हा अनुभवता आलं. यामूळे या लोकप्रिय गाण्यावर पुन्हा एकदा परफॉर्मन्स झाला म्हणून आनंद द्विगुणित होतोच. पण त्यात भर पडते जेव्हा सुनीलजी एक लोकप्रिय संवादही यानिमित्ताने बोलून दाखवतात. ‘अंजली, मैं तुम्हे भूल जाऊं ये हो नहीं हो सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दुगा’ हा तो लोकप्रिय संवाद. अनेक कार्यक्रमातून आपण हा संवाद ऐकला असेल. पण केवळ संवाद इथे वाचणं किंवा इतर कोणा इतरांकडून तरी हा संवाद ऐकणं यापेक्षा सूनिलजींच्या दमदार आवाजात हा संवाद ऐकण्याची मजाच काही और आहे. या दोन्ही परफॉर्मन्स मुळे या कार्यक्रमाच्या संध्येला चार चांद लागले हे नक्की. ज्यांनी हे याची देही याची डोळा पाहिलं त्यांचा आनंद तर आपण या व्हिडियोत बघू शकतोच. पण आपणही जेव्हा हा व्हिडियो बघतो तेव्हा आपलाही आनंद लपता लपत नाही.
हा व्हिडियो ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्यांना तो आवडतोच. सोबतच आपल्या टीमने त्यावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्यास जेव्हा आमचे लेख आवडतात तेव्हा तेव्हा आपण हे लेख शेअर करत असता. तेव्हा आजचा हा लेखही शेअर करायला विसरू नका. त्यामुळे आमच्या तरुण टीमला नवनवीन विषयांवर लेखन करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. तेव्हा आपला हा लोभ आमच्या टीमप्रति कायम राहू द्या ही नम्र विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :