बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या जमान्यात एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. परंतु आताच्या घडीला ते चित्रपटसृष्टीपासून चार हात लांबच आहेत. इतकंच काय तर ते सोशिअल मीडियावर सुद्धा खूप कमी दिसून येतात. त्यापैकी एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. सुनील शेट्टी सोशिअल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसेल परंतु त्याचे फोटोज आणि व्हिडीओ नेहमी वायरल होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये सुनील शेट्टीचा एक व्हिडीओ सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहे, ज्यात सुनील शेट्टी एअरपोर्टवरून येताना दिसत आहे. एअरपोर्टवरून येत असताना त्याच्याभोवती चाहत्यांनी गर्दी केली. त्यापैकी काही चाहते त्याच्यासोबत पटापट सेल्फी काढू लागले. त्या सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांपैकी एका चाहत्याचा मोबाईल सुनील शेट्टी हिसकावून घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी मजेशीर आणि मस्तीच्या अंदाजात त्याचे फॅन्स सुद्धा ह्या व्हिडीओची मजा घेत आहेत.
खरंतर, व्हिडीओ मध्ये सुनील शेट्टीच्या अवतीभवती फॅन्सने गर्दी केली होती. त्यापैकी चाहत्यांपैकी त्याचा एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतो. जसा तो चाहता सुनील शेट्टीसोबत सेल्फी घ्येण्यासाठी क्लिक करण्यासाठी पुढे जातो तेव्हाच सुनील शेट्टी सेल्फी क्लिक करायच्या ऐवजी चाहत्याचा मोबाईल हिसकावून आपल्या खिशात ठेवतो. जसे काही घडलेच नाही असे दाखवून सुनील शेट्टी पुढे चालू लागतो. त्याच्या मागे जो सेल्फी घेत असतो तो फॅन सुद्धा हसत हसत चालू लागतो. जे पाहून आजूबाजूचे चाहते सुद्धा हसू लागतात. जरी त्याच्या काही सेकंदानंतरच सुनील शेट्टी तो मोबाईल त्या चाहत्याला परत करतो. सुनील शेट्टीचा हा मजेशीर अंदाज अनेकांना आवडला. सुनील शेट्टीचा हा व्हिडीओ djmitreal नावाच्या इंस्टाग्राम हॅण्डलने आपल्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिथे सुनील शेट्टीचा ह्या व्हिडीओ त्याच्या फॅन्सना खूप आवडत आहे. सुनील शेट्टीचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. आम्ही तो व्हिडीओ खाली दिलेला आहे. सध्या सुनील शेट्टी आपल्या बायकोसोबत मसुरी मध्ये आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोज सुद्धा शेअर केले आहे.
जर चित्रपटांतील त्याच्या सध्याच्या कामाबद्दल बोलत असाल तर, सुनील शेट्टी आपल्या सुपरहिट ‘हेरा फेरी’ च्या तिसरा भाग ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटांत पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल, आणि सुनील शेट्टी हि तिकडी धम्माल उडवताना दिसून येणार आहे. त्याने काही दिवसाअगोदरच साऊथ चित्रपटांत ‘पहलवान’ चित्रपटातून पर्दापण केले आहे. ह्या चित्रपटात त्याच्या सोबत किच्चा सुदीप आणि आकांक्षा सिंह सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर दुसरीकडे सुनील शेट्टी निर्देशक संजय गुप्ताच्या येणाऱ्या ‘मुंबई सागा’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून ह्यात इम्रान हाश्मी, अनिल कपूर, जॉन अब्राहम, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, पंकज त्रिपाठी, समीर सोनी आणि अमोल गुप्ते ह्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असणार. ह्या कलाकारांसोबतच महेश मांजेरकर ह्यांची सुद्धा ह्या चित्रपटांत महत्वाची भूमिका आहे.