Breaking News
Home / मनोरंजन / सुनेच्या गृहप्रवेशावेळी सासूबाईंनी दिलेली एक सुंदर भेट, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

सुनेच्या गृहप्रवेशावेळी सासूबाईंनी दिलेली एक सुंदर भेट, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

झी मराठी वाहिनीवर नुकतीच ‘अग्ग बाई सासूबाई’ ही मालिका संपून ‘अग्ग बाई सुनबाई’ ही मालिका सूरु झाली. मालिकेतील पात्र तशीच असली तरीही त्यांच्या स्वभावात काहीसे बदल झालेले दिसतात. पण सोबतच काही गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. जसे की शुभ्रा या व्यक्तिरेखेला मिळणारा तिच्या सासू सासऱ्यांचा पाठिंबा. या मालिकेच्या निमित्ताने समाजात सासू सुनांचे बदलते नाते ही अधोरेखित होताना दिसते. पूर्वीच्या मालिकांमध्ये कजाग सासू आणि सोशिक सून हे समीकरण अगदी हमखास असे. मग मालिकांमध्ये त्या कजाग सासू ला धडा शिकवणाऱ्या सुनांचा काळ आला. आणि आता सासू सुनांचे सख्य दाखवणाऱ्या मालिकाही येत आहेत. समाजातील होत जाणारे बदल यानिमित्ताने टिपले।जातात. हे बदल आपल्याला अन्यत्रही दिसतातच. आपल्या कुटुंबामध्ये किंवा ओळखिच्यांकडे. असाच एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस आला.

या व्हिडियोत नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याचं स्वागत करताना घरातील मंडळी दिसतात. नवपरिणीत जोडपं जवळच्याच काऊच वर विराजमान झालेलं असतं. विराजमान हा शब्दच योग्य ठरावा असा त्यांचा पेशवाई पेहराव असतो. जोडी अगदी खुलून दिसत असते. त्यांच्यासकट सगळेच जण अगदी आनंदात असतात. या आनंदात भर पडते ती सासूबाईंच्या कवितेमुळे. नव्या नवरीचं कौतुक करावं म्हणून सासूबाईंनी स्वतः एक कविता केलेली असते. आपल्या सुनेसमोर आणि मुलासमोर ही कविता अगदी उत्साहाने म्हणून दाखवतात. नव्याने लग्न करून आलेल्या सूनबाईला सासर परकं वाटू नये, इथेही तिचे तिच्या माहेराप्रमाणे लाड केले।जाणार आहेत, तिच्या प्रत्येक उपक्रमाला सगळ्यांचा पाठिंबा असणार आहे आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे सासूबाई ह्या तिच्या आईप्रमाणे असणार आहेत याची शाश्वती देणारी ही कविता. सगळेच जणं ही कविता अगदी मन लावून ऐकत असतात.

त्यात नवऱ्याचा छोटा भाऊ यात अगदी उत्साहाने प्रतिक्रिया देताना दिसत असतो. त्याचा खेळकर स्वभाव आपल्या नजरेतून सुटत नाही. पण सगळ्यात जास्त लक्षात राहते ती काकूंनी स्वतःच्या सुनेसाठी केलेली कविता. सासू सुनांचे बदलते नाते अधोरेखित करणारी ही कविता. काकूंनी केलेल्या या उत्तम कवितेबद्दल मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांचे खूप कौतुक. तसेच या नवपरिणीत जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्याला हा लेख आवडला असल्यास, नक्की शेअर करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही अगदी आवर्जून वाचा बरं का. तुमच्या कमेंट्स मधून आम्हाला प्रोत्साहन मिळतं हे नक्की ध्यानात असू द्या. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *