आपण मराठी गप्पाच्या टीमचे लेख नियमित वाचता आणि मोठ्या संख्येने शे’अर ही करता याबद्दल धन्यवाद ! आजचा हा लेख असणार आहे एका वायरल व्हिडियो विषयी. काही वर्षांपूर्वीचा हा वायरल व्हिडियो आपल्या चेहऱ्यावर जसं हसू उमटवतो तसंच जुन्या आठवणीत आपल्याला रमवतो सुद्धा. यास कारणीभूत दोन गोष्टी. एक म्हणजे यात सहभागी मुलांनी मजा म्हणून केलेला पण मनोरंजक व्हिडियो आणि व्हिडियोत वाजणारं आपल्या सगळ्यांचं सैराट चित्रपटातील गाणं – ‘सैराट झालं जी’. या गाण्याने आपलं मन प्रसन्न झालं नाही असं होत नाही. एवढी या गाण्याची मोहिनी आपल्या मनावर आहे. या गाण्याच्या यशात जसा गीतांच्या बोलांचं महत्व आहे तसंच त्यात वापरल्या गेलेल्या संगीत साधनांचं सुद्धा. वैविध्यपूर्ण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरणं हा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांचा हातखंडा. या वायरल व्हिडियोत ही म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स असण्याऐवजी असतात ती गावातील मुलांनी गोळा केलेल्या वस्तू. मग अगदी एखाद्या झाडाचं लाकूड असो, एखादं फळकूट असो वा एखादा जुना बॉक्स.
या सगळ्या टाकाऊ वस्तूंचा वापर या व्हिडियोत दिसून येतो. सहसा आपण इन्स्टाग्राम रील करतो किंवा पूर्वी टि’क टॉ’क बनवत असू त्यात केवळ एक किंवा काहीच व्यक्ती दिसतात. तसेच यात जवळपास आठ मुलं दिसून येतात. त्यात दोघं ही गायक तर बाकीचे वादकांच्या स्वरूपात असतात. यातील गायिका दाखवण्यासाठी मुलाने अंगावर कांबळ ओढून घेतलेली असते. बाकीचेही त्यांच्या ‘व्यक्तिरेखां’मध्ये असतात. गंमतीचा भाग असा की आपण जी मजा करतो आहे याचंच त्यांना स्वतःला खूप हसू येत असतं. पाऊणे तीन मिनिटांच्या व्हिडियोत अनेक वेळा हे दिसून येतं. पण काही क्षण असेही येतात की ही मंडळी खरंच त्या व्यक्तिरेखांमध्ये घुसून अभिनय करताना दिसतात. तसेच यांना साथ द्यायला असतो तो नववा माणूस म्हणजे कॅमेरामन. त्याचंही विशेष कौतुक करावं असं. कारण व्हिडियोच्या सुरुवातीस तो बासरी वादक आहे असं दाखवणाऱ्या मुलावर लक्ष केंद्रित करतो, मग कीबोर्ड आणि बाकीचे. त्यामुळे गाणं पुढे सरकत जातं आणि एकेक इन्स्ट्रुमेंट्स वाजवण्याचा अभिनय करणाऱ्यांची ओळखही होते.
तसेच ज्या सहजतेने गायकांच्या मागून कॅमेरा फिरवत तो पुढे आणतो तो क्षणही भारी वाटतो. तेव्हा एखाद्या प्रो’फेशनल कॅमेरामन चा फील येतो. संपूर्ण व्हिडियो भर ही मंडळी अगदी धमाल करतात. सोबत कोणतंही साधन नसताना पण उपलब्ध गोष्टींचा वापर करत ही मुलं त्या क्षणांचा आनंद घेतात याचं कौतुक वाटतं. आणि आनंदी राहण्यासाठी पैशांची गरज असतेच असं नाही याची ही खात्री पटते. आपल्या या सगळ्या मित्रांचं त्यांच्या कल्पकतेसाठी आपल्या मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक कौतुक.
आपल्याला हा वायरल व्हिडियो आठवणींच्या सानिध्यात घेऊन गेला असेलच. पण केवळ यात ह’रवून जाऊ नका. आमच्या टीमने असे अनेक लेख लिहिले आहेत जे वायरल व्हिडियोज विषयी आहेत. त्यामुळे आपण ते लेखही वाचा आणि आठवणींचा आनंद घ्या. तसेच आमच्या टीमने लिहिलेले आणि तुम्हाला आवडलेले प्रत्येक लेख अगदी आठवणीने शे’अर करत रहा.
बघा व्हिडीओ :