Breaking News
Home / मराठी तडका / सैराटमधला प्रदीप आठवतोय का, बघा आता काय करतो ते

सैराटमधला प्रदीप आठवतोय का, बघा आता काय करतो ते

काही सिनेमे येतात आणि मनात कायमचे घर करून राहतात. मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला ‘सैराट’ हा असाच आजही आपलासा वाटणारा सिनेमा. मराठी सिनेमा प्रादेशिक विषय घेऊनही, जागतिक स्तरावर नाव करू शकतो हे दाखवून देणारा सिनेमा. यातील काम करणारी मंडळी किती गाजली हे काही सांगायला नकोच. याचं श्रेय जातं ते सामान्य माणसांना भूमिकांसाठी निवडून, त्यांच्याकडून योग्य व्यक्तिरेखा साकारून घेणाऱ्या नागराज मंजुळे यांचं. आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या कलाकारांचही कौतुकच. अशाच कौतुकास पात्र ठरलेल्या आणि नागराज मंजुळे यांनी निवडलेल्या अशाच एका गुणी कलाकाराविषयी आज थोडंसं.

आकाश ठोसर च्या परश्याला जिवाभावाची साथ देणारा, झिंगाट गाण्यावर मनसोक्त नाचणारा प्रदीप आठवतो का. विनोदी स्वभावाचा आणि परश्याला सतत मदत करणारा. आज त्याच्याच प्रवासाविषयी थोडसं. आपल्याला त्याचं खऱ्या आयुष्यातलं नाव माहिती आहेच. तानाजी गळगुंडे असं त्याचं नाव. सैराटच्या इतर कलाकारांसारखीच त्याची निवड झाली. कॉलेजमध्ये शिकत असताना तानाजीचं नाव त्याच्या सरांनी नागराज मंजुळे यांना सुचवलं. त्याने मग ऑडीशन्स दिल्या आणि त्याची निवड केली गेली. त्यानेही ती सार्थ ठरवली. अभिनयाचं कुठचही शिक्षण न घेता, स्वयंस्फूर्तीने जसं नागराजजी सांगत गेले, तसं तो काम करत गेला. त्याचं पात्र मुख्य पात्रांसारखं खूप गाजलं. ध्यानीमनी नसतानाही एखादं काम मिळालं आणि ते मनापासून केलं कि कौतुक होतंच, याचं तानाजी म्हणजे उत्तम उदाहरण.

सैराट प्रदर्शित झाला, आणि तानाजी प्रकाश झोतात आला. पुढे त्याने सैराट च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार काम केलं. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला. कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. पण केवळ टी.व्ही. पुरत तो मर्यादित राहिला नाही. त्याने “माझा अगडबम” या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबतही काम केलं आहे. तसचं, गेल्या डिसेंबरमध्ये “मनी मनी” या सुमित म्युजिकच्या एका गाण्यावर थिरकताना तानाजी आपल्याला दिसला होता.

पण हे तर झालं तानाजी एक अभिनेता म्हणून. तानाजी हा शेतकरी सुद्धा आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे. तानाजीला शेतीची आवड आधीपासूनच होती. किंबहुना, त्याच्या अकाउंटवर Farmer and actor असं त्याच्या bio मध्ये लिहिलेलं पहायला मिळतं. तसेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरसुद्धा याचे फोटोज पहायला मिळतात. तानाजीला त्याच्या अभिनयासाठी अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. अशा या गुणी अभिनेत्याला येत्या काळातही आपण विविध भूमिकांमधून पाहू, अशी आशा करत टीम मराठी गप्पाकडून येत्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा !(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *