Breaking News
Home / मनोरंजन / “सोचेंगे तुम्हे प्यार करें के नहीं”… आजींनी गायलेलं गाणं ऐकून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

“सोचेंगे तुम्हे प्यार करें के नहीं”… आजींनी गायलेलं गाणं ऐकून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे हल्ली घडाळ्याच्या काट्यावर चालत असतं. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत या जीवाला काही विश्रांती म्हणून नसते. आपलं राहणीमान सतत बदलत गेलं की हे होतंच. त्यामळे अनेक वेळा होतं हे की आपण फक्त काम एके काम करत राहतो. आपल्या आरोग्याकडे, आवडीनिवडी जोपासण्याकडे आपला कल राहत नाही.

मग आयुष्यात कधी तरी स्थिरता आली की आपली आवड निवड जोपासण्याकडे आपला कल जातो. अर्थात काही जण मात्र थोड्या फार प्रमाणात का होईना आपल्या आवडीनिवडी जपून ठेवत असतात. म्हणूनच आपल्या आजूबाजूला असे ही काही जण असतात जे आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून कलाक्षेत्रात ही कार्यरत असतात. त्यामुळे त्यांचा इतर पेशा काहीही असला तरी त्यांची ही कला आपल्याला अनुभवायला मिळते. पण जे कलाकार प्रसिद्ध नाहीत, त्यांच्या बाबतीत कसं काय? त्यांची ही कला आपल्या सारख्या दर्दी प्रेक्षकांपर्यंत पर्यंत पोहोचायला हवी. अर्थात गेल्या काही काळांत ही उणीव ही सोशल मीडियाने भरून निघाली आहे. अगदी एखाद्या शहरापासून दूर गावातील कलाकार ही यांमुळे पुढे यायला लागले आहेत. त्यातही दोन प्रकार असलेले पाहतो.

एक म्हणजे स्वतःहून कला सादर करणारे आणि दुसरे म्हणजे स्वतः कलाकार असो नसो पण दुसऱ्यांना प्रोत्साहन देणारे. यातील फायदा असा की ज्यांना नवीन तंत्रज्ञान हाताळता येत नाही अशा कलाकारांची कला ही आपल्याला अनुभवायला मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो कोणी चित्रित केला, कधी चित्रित केला याविषयी कल्पना नाही. पण त्यांनी तो का चित्रित केला असावा याची मात्र खात्री आहे आणि हे कारण आहे या व्हिडियोतुन ऐकायला येणारा एक गोड स्वर. हा गोड स्वर आहे एका आजींचा ! अगदी नऊवारी नसणाऱ्या, डोईवरून पदर घेणाऱ्या या आजी एकदा गायला लागल्या की त्यांचा आवाज छान अनुभव देऊन जातो. खरं तर आजींचं वय बघता त्या केवळ भक्तिगीते गात असावीत अस वाटू शकतं. आजींनी ती गीतं ही गायली असणारच यात शंका नाही. पण सोबतच इतर गीतं ही गाण्याची आवड त्यांना असावी. त्यामुळे या वयातही त्या प्रयोगशील असल्याचं दिसून येतं. आजचा हा व्हिडियो हे याचं प्रातिनिधिक उदाहरण मानायला हरकत नाही. तसेच आजींचा आवाज या वयातही उत्तम आहे. त्यातील हरकती घेणं वगैरे तर आवडूनच जातं.

गाण्यातील अगदी तांत्रिक बाजू समजत नसली तरी गायन कलेचे चाहते म्हणून हा व्हिडियो बघितला की नक्किच आवडून जातो. आमच्या टीमला या आजींचा हा प्रयत्न खूप आवडून गेला. आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडून जाईलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. या व्हिडियोत आपल्याला केवळ आजी गात आहेत हे दिसून येतं. त्यामुळे आपण काम करता करता ही व्हिडियो न बघता हेडफोनवरून त्यांचं गाणं केवळ ऐकलं तरी आपल्याला आनंद मिळून जाईल.

आमच्या टीमने हा उत्तम व्हिडियो पाहिला आणि याविषयी लिहावं अस लागलीच ठरलं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.