Breaking News
Home / मराठी तडका / सोनपरीची फ्रुटी आता दिसते खूपच सुंदर, केले आहे मराठी चित्रपटात काम

सोनपरीची फ्रुटी आता दिसते खूपच सुंदर, केले आहे मराठी चित्रपटात काम

लहानपणी प्रत्येकाचा कोणता ना कोणता आवडता सिरीयल असतोच. बहुतेक मुलांना जादूचे सीरिअल जास्त आवडतात. तुम्हा सर्वांना टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय सीरिअल ‘सोनपरी’ तर आठवत असेलच. हा सीरिअल लहान मुलांचा सर्वात आवडता सीरिअल होता. हा सीरिअल पाहण्यासाठी सर्व मुले वेडी होती. आताच्या वेळी सुद्धा अनेक अशी लोकं असतील ज्यांना ह्या सीरिअल विषयीच्या आठवणी मनात असतील. ह्या सीरिअल मधील सोना आंटी असो किंवा फ्रुटी नाहीतर अल्तु अंकल, सर्वांनी आपआपल्या भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावल्या. सोनपरी सीरिअल केवळ लहान मुलांचाच आवडता शो नव्हता, तर मोठे सुद्धा खूप आवडीने हा सीरिअल पाहत असे. परंतु २६८ एपिसोड नंतर २००४ मध्ये हा सीरिअल बंद करण्यात आला. ह्या सीरिअलमधील जवळजवळ सर्वच कलाकार लोकप्रिय झाले होते. त्या काळी सोनपरी सीरिअलमध्ये ‘फ्रुटी’ खूप क्युट दिसत होती. परंतु आता फ्रुटी खूप मोठी झालेली आहे आणि तिचा लूक सुद्धा खूप बदलला आहे. अशामध्ये सर्वांना फ्रुटी कशी दिसते हे जाणून घेण्याची इच्छा असेल.

सोनपरीमध्ये ज्या मुलीने फ्रुटीची भूमिका निभावली होती तिचे नाव ‘तन्वी हेगडे’ आहे. परंतु आता ती खूप मोठी झाली आहे. मोठी झाल्यानंतर फ्रुटी म्हणजेच तन्वी खूपच सुंदर आणि क्युट दिसते. तिने आपल्या करिअरची सुरवात केवळ ३ वर्षाची असताना केली होती. ती ‘रसना बेबी कॉन्टेस्ट’ मध्ये सिलेक्ट झाली होती. इतकंच नाही तर ह्यानंतर तिने अनेक जाहिरातीत काम केले होते. सोनपरी सीरिअल व्यतिरिक्त तन्वी हेगडेने ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘खिचडी’ सारखे लोकप्रिय शोज केलेले आहेत. तिने ‘शाका लाका बूम बूम’ शो साठी काही एपिसोडसाठीच काम केले होते. तिला सोनपरी सीरिअल नंतर बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम मिळू लागले होते. ९ वर्षाची असताना तन्वीला चित्रपटात पहिली संधी मिळाली होती. एमएफ हुसेन ह्यांच्या ‘गज गामिनी’ मध्ये तिने बेबी शकुंतलाची भूमिका निभावली.

तन्वीने ‘चॅम्पियन’, ‘विरुद्ध’, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. २०१६ मध्ये तन्वीने मुख्य अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘अथांग’ ह्या मराठी चित्रपटात अश्या मुलीची भूमिका निभावली होती, जिला एका डॉक्टर सोबत एकतर्फी प्रेम होते आणि ह्या मुलीला असे वाटते कि तो डॉक्टर सुद्धा तिच्यावर प्रेम करतो, परंतु सत्य काही वेगळेच असते. सध्या तन्वी मराठी चित्रपटांत काम करते. तिच्या ‘शिवा’ ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तन्वी एक सामान्य जीवन जगते आणि ती सोशिअल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते. सोशिअल मीडियावर ती नेहमी आपले फोटोज फॅन्ससोबत शेअर करत असते. तुम्ही तिचे हे फोटोज पाहून अंदाज लावू शकता कि ती किती सामान्य जीवन जगत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *