Breaking News
Home / बॉलीवुड / सोनू सूदवरचे ट्विट झाले वायरल, एकाने लिहिले शास्त्रज्ञ लवकर लस काढा नाहीतर सोनू सूदच

सोनू सूदवरचे ट्विट झाले वायरल, एकाने लिहिले शास्त्रज्ञ लवकर लस काढा नाहीतर सोनू सूदच

सध्या दोनच विषयांवर जोरदार चर्चा चालू आहे. एक म्हणजे कोसळणारा पाउस आणि दुसरा म्हणजे पडेल ती मदत करणारा म्हणजे सोनू सूद. या महामारीच्या काळात असंख्य जणांचे हाल झाले. इतरही संकटं आली. पण अशा असंख्य संकटांना तोंड द्यायला, अनेक जण पुढे पण आले. पहिलं नाव तर सन्माननीय रतन टाटा याचं येतं. सुमारे १५०० करोड रुपयांची मदत त्यांनी टाटा कंपन्यांमार्फत देऊ केली. इतर अनेक उद्योजकांनी आणि सेलिब्रिटीज नि सुद्धा हाथभार लावला. यात सगळ्यात जास्त कौतुक करावसं वाटतं ते श्री. धनंजय दातार याचं. दुबईस्थित मराठी उद्योजक. त्यांनीही अनेक भारतीयांना मायदेशी पाठवण्यात मदत केली आहे. त्यासाठी मिडिया मधूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

पण या सगळ्यांपेक्षा जास्त काळ चर्चेत राहिला तो सोनू सूद. याने मदत करायला सुरुवात केली. आणि म्हणता म्हणता पडद्यावर विलनचा रोल करणाऱ्या या माणसाचा एक वेगळाच माणुसकीचा चेहरा सगळ्यांनी पाहिला. जो पडद्यावर खचितच दिसला असेल. आज सगळेच जण त्याच्या याच कामासाठी त्याला दुआ देत आहेत. त्याचं कौतुक करत आहेत. त्यांचं ट्विटर अकाउंट तर मदत करणाऱ्यांच्या ट्वीटने भरलेलं असतं. पण यातही बॉलीवूडचा हा दमदार सेलेब्रिटी इतरांनाही ट्वीट करतो. काही हसण्याचे काही क्षण घालवताना दिसतो. आता ६ ऑगस्टलाच बघा ना. एका व्यक्तीने त्याच्या या औदार्यापायी त्याला घरी चहाच निमंत्रण दिलं. आल्याच्या चहासकट गरमा गरम भजींचं निमंत्रण. कितीही फिट माणूस असू दे, कसा काय तो हे टाळू शकतो. मग त्याने हि गमती मधे गरम गरम भजीसोबत हिरव्या चटणीची फर्मायीश केली.

तसाच अजून एक किस्सा. त्याच दिवशी एवढा पाउस पडत होता. तर एका मुलीने गंमत म्हणून त्याला म्हंटल, “बाबारे तू या पावसाचं काही करू शकतो का ?” तर त्यावर त्याने हसत हसत, ‘हो जरूर. विचारून तर बघ’ अशी कमेंट केली. अजून एका ट्वीट वर तर त्याला हसणं आवरलं नाही. त्या ट्वीट मध्ये एका माणसाने एक व्यंगचित्र टॅग केलं. त्यात दाखवलं होतं, कि एक माणूस वैज्ञानिकांना सांगतोय, करोना वर वॅक्सीन बनवा नाही तर ते काम पण सोनू सूद करेल. हे फारच गमतीशीर आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी सोनू सूद ने दिली. खरं तर एवढा व्याप सांभाळताना माणूस थोडा कटू होऊ शकतो. पण तस वागणं सोनू सूदच दिसलं नाहीये. किंबहुना, काम मदतीचं काम चालू असताना जीवनातला हलके फुलके पणा पण तो जपतोय. लोकांना भारतात आणि भारता बाहेर मदत करत असताना खूप प्रसिद्धी त्याला मिळते आहे. पण त्याच तत्परतेने मदतही चालू आहेच. त्याच्या या कामामागचं रहस्य त्याच्याच भाषेत सांगायचं तर, “अगर आप किसी कि मदत करने में सक्षम है, और अपने किसी कि मदत नही कि, तो समझे आपने जीवन मै कूछ नही किया.” त्याच्या कामाला आणि जिंदादिलीला मनापासून सलाम.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *