Breaking News
Home / जरा हटके / सोशिअल मीडियावर लॉकडाऊनमुळे वायरल होतोय हा अजब ट्रेंड, सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत

सोशिअल मीडियावर लॉकडाऊनमुळे वायरल होतोय हा अजब ट्रेंड, सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत

२०२० या वर्षा विषयीची आपल्या सगळ्यांची भावना सारखीच आहे. एकदा जाऊ दे हे वर्ष निघून असंच वाटतंय आपल्याला. आणि आपापल्या सोशल मिडिया वरून आपण तसे व्यक्त पण होतोय. पण नुकताच एक ट्रेंड सोशल मिडिया वर जगभर वायरल होताना दिसतोय. आणि त्या एका ट्रेंड मधून आपल्या सगळ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून मिळतेय. काय आहे तर हा ट्रेंड ?

 

ट्रेंड च नाव आहे #2020challenge. हाच ट्रेंड #2020mood आणि #monthlygrid या हॅशटॅग सकट पण वायरल होतोय. यात एक फोटो कोलाज केलेलं असतं आणि त्यात असतात नऊ फोटो. प्रत्येक फोटो म्हणजे एक एक महिन्याचं प्रतिक. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत. वेगवेगळे भाव दाखवून हे नऊ महिने आपले भाव कसे बदलले हे दाखवायचं. आता पहिले तीन महिने म्हणजे कसे आनंदी आणि मग सुरु होतात एक एक करून गयावया करणारे चेहरे. आपले क्रिएटीव नेटकरी म्हणजे धमाल. मग त्यात सेलेब्रिटी पण कसे मागे राहतील.


विद्या बालन याचंच पहा ना. सध्या शकुंतला देवी या आगामी सिनेमाच्या प्रमोशन साठी त्यांनी हा ट्रेंड किती खुबीने वापरलाय. पहिले तीन फोटो बघा आणि बाकीचे. पहिले तीन महिने एकदम झकास. मग मार्च मधे मूड खराब व्हायला सुरुवात होते. आणि मग मूड एवढा खराब कि समोर आलेल्या संकटाला जणू बंदूक के नोक पे ठेवलंय. नकळत हसायलाच येतं. इंस्टाग्राम वर तर २५००० पेक्षा जास्त लोकांचे लाईक्स मिळाले आहेत.

माधुरी दीक्षित नेने यांनी पण आपल्या नऊ नटखट अदा या ट्रेंड मधे शेयर केल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर त्या का उत्तम अभिनेत्री आहेत हे पण यातून कळत. प्रत्येक महिन्यात त्यांनी आपल्या वेगवेगळ्या रोल मधील फोटो त्यात खुबीने टाकले आहेत. या फोटो ला २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

आणि मग ब्रँड पण कसे मागे राहतील. सगळ्या वायरल ट्रेंड्सना फॉलो करणारं नेटफ्लिक्स इंडिया पण कसं पाठी राहील. त्यांनी पण त्यांच्या सेक्रेड गेम्स वर आधारित असाच फोटो शेयर केलाय. सेक्रेड गेम्स मधलं नवाजुद्दिन सिद्दिकी याचं पात्र यासाठी वापरलंय. आणि त्याला बघता बघता दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलंय. पब्लिकचा मूड परफेक्ट पकडण्यात नेटफ्लिक्स वाले अगदी आघाडीवर असतातच. त्याचं हे ताजं उदाहरण.

झूम कार ने पण आपल्या इंस्टाग्रामवर असाच फोटो शेयर केलाय. ज्यात झूम कार ची गाडी नऊ महिने तशीच आहे. पण पहिले आणि शेवटचे तीन महिने ती बाहेर आहे. ते पण वेगवेगळ्या लोकेशन्स वर. एकंदर हे दाखवण्याचा प्रयत्न आहे कि झूम कार लॉकडाऊन नंतर आता पुन्हा सेवेत हजर व्हायला तयार आहे.

आणि आपल्या सगळ्यांना खायला आवडतात ते बालाजी वेफर्स. त्यांनी पण, कोणतीही वेळ असो आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत अस दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि आपल्या नऊ ब्रँड ची प्रसिद्धी पण मस्त केलीय.

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पार्ले जी ने पण या ट्रेंड ची दखल घेतलीये. अगदी एखाद्या गुणी बाळासारखं पार्ले जी बेबी ने मार्च पासून आता पर्यंत मास्क घातला आहे. आता पर्यंत अनेक ट्रेंड्स आले आणि येतील. पण सगळ्या नऊ महिन्यांच्या भावनांचं प्रतिक मात्र हाच ट्रेंड ठरणार एवढं नक्की.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *