सध्या अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. पण तरीही पूर्ण पणे कामाला सुरुवात झालेली नाही. अजून प्रत्येक आस्थापने, कार्यालय यांना परवानगी नाही. ४ ऑगस्टला पडलेल्या पावसाने तर कार्यालये बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला द्यावे लागले होते. पण जे घरातूनच काम करताहेत त्यांना मात्र कामाशिवाय पर्याय नाही. पाऊस असो व लॉकडाऊन. काम चालूच राहिलंय. तुम्ही पण कामासाठी जुंपले गेले असलाच. पण तुम्हाला जेवढा टेन्शन आहे कामाचं, तेवढं कोणालाच नाही असही वाटत असेल. पण थांबा राव. पुढचा किस्सा वाचा. एका व्यक्तीने एका लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हणता म्हणता वायरल झाला हो. होणारच ना. आता तुम्ही म्हणाल, कि लग्नाला ५० ऐवजी ५०० माणसं आलेली का? तर नाही. या लग्नात वधू वर कामाचा किती ताण आहे असा दाखवलं गेलय.
चक्क लॅपटॉप घेऊन थेट मंडपात काम करताना दिसत होती. त्यात तिच्या हातात एक फोन होता. विश्वास बसत नाही ना? लोकं, लग्न म्हंटल्यावर किती तरी दिवसांची सुट्टी घेतात. हनिमुनची वेगळी. पण इथे वधूला कामापासून फुरसत न्हवती. होणारा नवरा पण बाजूला बसून हैराण परेशान. अर्थात एवढ्या गोंधळाच्या वातावरणात खरंच काम चालू होतं कि मस्करी ते माहित नाही. पण, मंडळी वीडीओ वायरल झाल्यावर लोकांची जी करमणूक झालीय. लोकांनी मजा घ्यायला सुरुवात केली. एकेक कमेंट वाचल्यावर हसायलाच येतं.
एका मुलीने कमेंट मध्ये लिहिलं, नातेवाईकांच्या खोट्या खोट्या प्रेमापासून वाचायला चांगली आयडिया आहे. पण एकानं लिहिलं, एवढ्या गोंधळात तिच्या हातात फोन दिसतोय. ज्यावरून कोणी तिला काम सांगतय असं दिसतंय. पण तिला ऐकायला येत तरी असेल का? तर तिसऱ्याने लिहिलंय, होणार्या सासू सासर्यांवर इम्प्रेशन पाडायचे उद्योग आहेत. तर अजून कोणी लिहिलंय, नक्कीच गम्मत करतेय हि मुलगी. वर्क फ्रोम होम च्या ऐवजी वर्क फ्रोम स्टेज. आणि खरंच, सध्या वर्क फ्रॉम स्टेज अगदीच वायरल झालंय. काहीही म्हणा त्या मुलीवर कामाचा ताण असेल किंवा नसेल हि, पण वीडीओ बघून असंख्य लोकांच्या मनावरचा ताण मात्र कमी झाला. लॉकडाऊनच्या काळात तेवढंच आपलं मनोरंजन.
(Author : Vighnesh Khale )