काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या चुलतभावाने आत्मह’त्या केल्याची बातमी समोर आली होती. महत्वाचे म्हणजे या मुलाच्या घरी सगळे व्यवस्थित होते. आई-वडील शिकलेले आणि व्यवस्थित पैसे टिकवून होते. हा मुलगाही इंजिनिअरिंग झाला होता. फक्त चांगली नोकरी लागेल की नाही, या भयाने या मुलाने नको ते पाऊल उचललं. त्यानंतर यावर अनेक चर्चा झाल्या, बातम्या झाल्या. पण मुलांना असलेले पालकांचे दडपण, सामाजिक दडपण या विषयांकडे कुणी लक्ष दिले नाही. त्यांची मनस्थिती काय होती, हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. असो… आपला आजच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओचा विषयही असाच आहे. हा विषय मनोरंजन करणारा असला किंवा आपल्याला भरपूर हसवणारा असला तरी त्याची दुसरी बाजू समजून घेतलीच पाहिजे, असा आहे. तर आजच्या या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, काही शाळांच्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत. प्रत्येक शाळेची एक टीम आलेली आहे. यासोबतच त्या शाळेतील शिक्षक आणि त्या विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित आहेत.
स्पर्धेत खो खो खेळणाऱ्या मुलांची धर पकड सुरू आहे. इकडे शिक्षक व पालकांचाही जीव खाली-वर होत आहे. प्रत्येक डावाला कोण जिंकणार, याकडे लक्ष लागले आहे. अशातच प्रत्येक पालक आपला मुलगा ज्या टीममध्ये आहे, त्यांना ओरडून ओरडून प्रेरणा म्हणजेच चिअरअप करत आहे. अशातच एन्ट्री होते एका काकूंची… या काकू काय करतात तर आपली बॅग वगैरे मागे ठेऊन थेट आंपायरपाशी जाऊन आपल्या मुलांना चिअर अप करू पाहतात. आणि खरी गम्मत तर पुढेच आहे.
तुम्ही अनेकदा मालिका कींवा फिल्म पाहताना आपल्याला असं वाटत असते की, आपण त्या जागी आहोत आणि आपण तसे रिऍक्ट करायला लागतो. अगदी सेम गोष्ट या काकूंसोबत झाली आहे. या काकू विद्यार्थ्यांना एवढा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि इतक्या उत्साहात आहेत की, त्यांना वाटत आहे आपणच खो खो खेळत आहोत. खरं पाहिलं तर काकू हे सगळं मनापासून करत असल्या तरी अति उत्साहात त्यांचे हसे झाले आहे. पण तरीही लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करत काकूंनी आपल्या पोरांना प्रेरणा देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. खरं पाहिलं ते पालकांनी असंच असायला हवं.
विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी म्हणजे वेळ वाया जात नाही. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही. पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. दोघांत मित्रत्वाचे नाते असावे.
वरील सगळ्या गोष्टी या काकूंमध्ये ठासून भरलेल्या आहेत. म्हणूनच हा व्हिडीओ आपण मनोरंजन म्हणू बघावाच पण त्यातून गांभीर्यही घ्यावं. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :