Breaking News
Home / ठळक बातम्या / स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या पोलीस भाऊंनी जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या पोलीस भाऊंनी जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

अस्मानी संकट असो अथवा को’रोनाचे संकट असेल महाराष्ट्र पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडत असतात. मागच्या वर्षी बरोबर पावसाळ्याच्या काळातच एक मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेट वे ऑफ इंडिया हा परिसर फिरताना एक महिला समुद्रात गेली ही थरारक घटना हजारो लोकांसमोर घडली आणि सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिली. त्यावेळी पाण्यात बुडणाऱ्या महिला पर्यटकाला तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पथकाने वेळीच वाचवले, तेव्हा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

आता यावेळी असाच एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो 2 जिगरबाज पोलिसांचा आहे. या 2 पोलिसांनी आपल्या जीवावर खेळून एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचवले आहेत. विशेष बाब म्हणजे हा व्हिडीओ चक्क एका बड्या खासदारांनी शेअर केला आहे. राष्ट्रवा’दी काँ’ग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा सदस्य सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, त्या भागात पूर परिस्थिती आहे..पाण्याचा लोंढा भल्यामोठ्या वस्तू आपल्या सोबत नेत आहे. अशा या मोठ्या प्रवाहात एक व्यक्ती अडकला आहे. जास्त वय असल्याने त्याला या प्रवाहाचा आणि त्याच्या ताकदीचा अंदाज न आल्याने तो फसला आहे. कितीही ताकदीचा माणूस असला तरी अशा परिस्थितीत सामना करणे, अशक्य असते. मात्र पूर असूनही कालव्यातील जोरदार प्रवाहात एका माणसाला वाचवण्यासाठी दोन पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करतात प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडीओत दिसून येईल.

या व्हिडीओचे गांभीर्य शब्दात मांडणे, शक्य नाही म्हणून तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच पहा. आपला जीव धोक्यात घालून त्या नागरिकाला वाचवण्यासाठी पुढे सरसावरले होते, त्या पोलिसांची नावे सद्दाम शेख आणि अजित पोकरे अशी आहेत. त्यांनी पुण्यातील दत्तवाडीच्या शिवणे गावातील बागुल उद्यानात एका ओढ्यामध्ये वाहुन जात असलेल्या नागरिकासाठी आपले प्राण धोक्यात टाकले आणि त्याची सुटका केली.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे मात्र पोलिसांची प्रतिमा 100% उंचावली आहे, हे नक्कीच. पोलिसांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. जगात जिथे समस्या असते, तिथेच समाधान असते. जिथे काही कठोर नियम पाळणारे पोलीस असतात तसेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही कनवाळू, दया आणि करुणाने ओतप्रोत भरलेले अधिकारीही असतात. खाकीला काळीमा फासणाऱ्या घटना अजूनही पोलीस प्रशासनात घडत असतात. वर्तमानपत्रातही ‘रक्षकच झाले भक्षक’ अशा हेडिंग असतात. मात्र यासगळ्या पलीकडे जाऊन कित्येक अधिकारी जनतेच्या हितासाठी कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात. लोकांना मदत करतात. अगदी स्वतःच्या जीवाची काळजी न करताही लोकांना वाचवतात.

अगदी असाच अनुभव या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला येतो. को’रोनाच्या काळात तर पोलिसांनी आपल्या जीवाची आहुती दिली. ‘पीड पराये जाने रे’ अशीच भूमिका पोलिसांची होती. आजच्या या व्हिडीओतील पुणे पोलिसांना आमचा सलाम… जय हिंद!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.