Breaking News
Home / मनोरंजन / स्वतःच्याच लग्नात ड्रमसेट वाजवणाऱ्या नवरा नवरींचा हा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा

स्वतःच्याच लग्नात ड्रमसेट वाजवणाऱ्या नवरा नवरींचा हा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा

वायरल व्हिडियोज वरील खुसखुशीत लेख वाचायचे आपले हक्काचे ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. यातील लग्न समारंभातील मनोरंजक प्रसंग वाचायला तर वाचकांची मोठी संख्या असते. त्यामुळे लग्नातील मजेशीर प्रसंगावर आधारित व्हिडियोज वर आमची टीम सातत्याने लिहीत असते. शेवटी काय, तर आमचे वाचक आनंदी राहावेत हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आजचा लेखही तुमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणारा असणार आहे. हा लेख आहे एका अशा लग्नातला, ज्यातील नवरदेव आहे अगदी हौशी आणि त्याच्या जोडीला आहे काहीशी लाजाळू पण तिच्या नवऱ्याला साथ देणारी पत्नी. बरं यातील नवरदेव आधी सांगितल्याप्रमाणे आहेत हौशी. त्यांना बेंजो, ड्रम सेट वर वादन करायला आवडतं. कसं कळतं? अहो अख्खा व्हिडियोच त्याच्यावर आधारलेला आहे.

या लग्नाच्या वरातीत नेहमीप्रमाणे आपली वादक मंडळी आलेली असतात. पण आपला आवडता ड्रम सेट बघून ह्या आपल्या भावाला काही राहवत नाही. तो थेट या या वादकांमध्ये जाऊन सामील होतो. पण तोपर्यंत आधीच एक गाणं वाजत असतं म्हणून मग हा भाऊ थांबतो. जसं हे गाणं थांबतं तसा हा आपला भाऊ सगळी सूत्र हातात घेतो आणि एका दणक्यात जे काही वादन सुरू करतो की ज्याचं नाव ते. पाठी उभी असलेली वादक मंडळी सुद्धा अगदी उत्साहित होतात. या सगळ्या उत्साहाच्या माहौलात भर पडते जेव्हा काही क्षणांत नवपरिणीत ताई दाखल होते. किंबहुना तिला नवरदेवाच्या सोबत उभं केलं जातं. पण तिला काय करावं सुचत नसतं. तेव्हा आजूबाजूची मंडळी तिला वादन कसं करायचं हे थोडक्यात सांगतात. ताई आपली लाजत लाजत वादन सुरू करते तर आपले भाऊ अगदी जोरात असतात. त्यांचं वादन अगदी दणक्यात चालू असतं. पण ही तर केवळ अर्धी मजा असते. या व्हिडियोत अजून मजा भरते जेव्हा सगळे जण जोगवा चित्रपटातलं ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं वाजवायला सुरुवात करतात.

माहौल काय होऊन जातो हो. शब्दांत वर्णन करता येत नाही. धमाल येते अगदी. त्यात आपला दादा जोशात असल्याने पाठीमागचे वादक मध्ये मध्ये तो वाजवत असलेली वाद्य जरा सरळ करत असतात. पण गडी रंगात आल्यामुळे त्या वाद्यांची मात्र काही खैर नसते. अर्थात गंमतीचा भाग सोडला तर हा व्हिडीयो पाहून एकच प्रतिक्रिया येते ते म्हणजे एकूण व्हिडियो अगदी अप्रतिम आणि आनंद देणारा आहे. यातले दादा आणि आपली ताई एकमेकांना अगदी अनुरूप आहेत. या व्हिडियो च्या निमित्ताने या दोघांमधलं ट्युनिंग बघता आलं. हे ट्युनिंग यापुढील आयुष्यात बहरत जाऊ दे या मनापासून शुभेच्छा. ही जोडी सदैव आनंदी आणि एकत्र राहो हीच आमच्या टीमची सदिच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर कराल ही आता खात्री आहे. कारण तुम्ही हा लेख शेअर केला नसतात तर आम्हाला एवढे नवनवीन वाचक लाभले नसते. त्यामुळे मराठी गप्पाच्या टीमला असलेल्या आपल्या खंबीर पाठींब्यासाठी, मनःपूर्वक धन्यवाद !!! आपल्या टीमने लिहिलेले नवनवीन लेखही वाचल्याशिवाय जाऊ नका बरं का. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *