Breaking News
Home / मनोरंजन / स्वतःच्या वरातीत नाचणाऱ्या ह्या नवरदेवाचा अजब डान्सप्रकार पाहून तुम्ही हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

स्वतःच्या वरातीत नाचणाऱ्या ह्या नवरदेवाचा अजब डान्सप्रकार पाहून तुम्ही हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपल्या देशात लग्न म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो. ज्यात आपल्या कुटुंबातील सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी होत असतात. लग्नात एन्जॉय करणं प्रत्येकालाच आवडतं. हेच कारण असतं कि लोकं स्वतःच्याच नाहीतर दुसऱ्यांच्या लग्नाबद्दल सुद्धा उत्सुक असतात. भारतातल्या लग्नात प्रत्येक गोष्टीत एक वेगळा आनंद आहे. लग्न म्हटलं कि पाहुण्यांसमोर चेष्ठा मस्करी, चविष्ट जेवण, विधी पद्धती, नाचगाणे आणि मौजमस्ती ह्या सगळ्या गोष्टी आल्याच.

आपल्या देशात लग्न हे डान्स शिवाय जणू अपूर्णच असल्यासारखं आहे. जोपर्यंत लग्नामध्ये डीजे नाही वाजत, ढोल ताश्या नाही वाजत, लोकं त्यावर ठेका नाही धरत तोपर्यंत लग्न अपूर्णच वाटू लागते. डान्सशिवाय लग्नाचा रंगदेखील फिका वाटू लागतो. खासकरून वरातीच्या वेळी नाचण्याची मजाच काही और आहे. ह्यादरम्यान प्रत्येकजण आपल्या आतमध्ये असलेली डान्सची इच्छा ह्यावेळी पूर्ण करतो. वरातीत नाचणारे लोकं आणि त्यांचा डान्सप्रकार देखील वेगवेगळा असतो.

कधी कधी वरातीतला डान्स पाहून आश्चर्य वाटू लागते, तर कधी हसू सुद्धा येते. प्रत्येक वरातीत बायका आपल्या काळातील डान्स करतात. तर काही लहान मुले असतात ते मध्ये मध्ये उद्या मारत नाचतात. त्यानंतर तरुण तरुणी असतात जे आरडाओरड करत डान्स करतात. त्यानंतर नागीण डान्स करणारे सुद्धा असतात. ह्याशिवाय प्रत्येक वरातीत एक असा व्यक्ती असतोच ज्याची डान्स स्टाईल सर्वांपेक्षा वेगळी आणि अनोखी असते. जेव्हा ती व्यक्ती नाचते तेव्हा लोकांचे हसू आवरता आवरत नाही. आज आम्ही तुम्हाला असा डान्स व्हिडीओ दाखवणार आहोत, तो सुद्धा अश्या अनोखे आणि मजेशीर नाचणाऱ्या व्यक्तीचा आहे. परंतु मनोरंजक गोष्ट अशी कि वरातीत अजब प्रकारचा डान्स करणारी हि व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः नवरदेव आहे. अनेकदा नवरदेव स्वतःच्या लग्नामध्ये खूपच कमी नाचतो. आणि जर नाचायचे असले तर तो अगोदर त्याची प्रॅक्टिस करतो, कारण लग्नाच्या दिवशी त्याचा डान्स पाहून प्रत्येकजण इंप्रेस होईल, कारण लग्न म्हटले कि सर्व लक्ष नवरदेव आणि नववधू कडेच जाणार. परंतु ह्या वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव इतक्या विचित्र आणि मजेशीररित्या डान्स करत आहे कि पाहणाऱ्यांचे हसू आवरणे कठीण होऊन जातं.

नवरदेवाचा हा विचित्र डान्स सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि, लग्नाची वरात जात असते. वरातीत बायका त्यांच्या पारंपरिक स्टाईलमध्ये नाचत असतात. अचानक नवऱ्याचा जो विचित्र डान्स सुरु होतो ते पाहून तुम्ही देखील हसू लागाल. नवरदेव कंबर हलवत विचित्र हातवारे करत आपला नाच करू लागतो. अचानक त्याला काय सुचते काय ठाऊक, तो त्याच्या पुढे नाचत असणाऱ्या बायकांना बाजूला व्हायला सांगतो आणि वारातीच्या पुढे जाऊन नाचू लागतो. त्यानंतर नाचत नाचत बायकांच्या घोळक्यात जाऊन ठेका धरतो. त्याच्या डान्स स्टेप्स सुद्धा मजेशीर असतात. तो ज्या प्रकारे ठेका धरत आहे ते पाहून त्याच्या मागे उभ्या असलेल्या बायका सुद्धा हसू लागतात. एक नवरदेव आपल्या लग्नामध्ये इतक्या मोकळ्या प्रकारे नाचतो, हे पाहून देखील आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते. परंतु ज्यांनीसुद्धा हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांना हसू आवरणं मुश्किल झालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोणत्याही चिंतेत असाल तरी थोडा वेळ का होईना हा मजेशीर व्हिडीओ तुम्हांला टेंशन पासून दूर ठेवतो. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत तुम्ही नक्की पहा. तुम्हांला व्हिडीओ कसा वाटला हे देखील कळवा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *