Breaking News
Home / मनोरंजन / स्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ

स्वतःच्या हळदीत नवरी मुलीने ग्रुपमध्ये केला धमाल डान्स, बघा हा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की विविध विधी, परंपरा या आल्याच. यातील सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे हळदीचा समारंभ होय. या समारंभात नवरा नवरी सकट सगळ्यांनाच धमाल मजा मस्ती करता येते. म्हणजे तशी ती एरव्ही ही करता येते आणि करतातच. पण एरव्ही काही बंधनं असतातच. पण हळद म्हंटलं की धमाल ठरलेली. आणि जर ही हळद कोळीवाड्यात होणार असेल तर मग आनंद अजून वाढतो. अशाच एका हळदीच्या वेळेचा व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. त्याची एक न्यारी गंमत आहे जी तुम्हाला लेख वाचून कळेल. तेव्हा चला, या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो एका नवरीच्या आणि तिच्या ग्रुपच्या धमाल डान्सचा आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हाच आपल्याला समोर एक ग्रुप रिंगण घालून डान्स करताना दिसतो. मध्यभागी उभी राहून डान्स करत असते ती दस्तुरखुद्द नवरी मुलगी. छान पोशाख केलेली ही नववधू आपल्या ग्रुपसोबत डान्स करत असताना तिचा हा ग्रुप मस्त मस्त स्टेप्स करत असतो. त्यांच्या स्टेप्स बघून आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप हटकून आठवतोच.

आपणही कोणाच्या तरी लग्नात, हळदीत किंवा इतर केव्हा तरी असा डान्स केला असेल तर त्याच्या आठवणी ताज्या होतात. या आठवणी ताज्या होत असताना एव्हाना नवरी मुलगी आता त्या रिंगणाचा भाग झालेली असते. आता नवरी सकट सगळे जण गोलाकार आकारात नाचत असतात. सुरुवातीला जागेवर उभं राहून त्यांचा डान्स चालू असतो. त्यातही मस्त मस्त स्टेप्स करणं चालूच असतं. पण सगळ्यात जास्त मजा येते जेव्हा हा ग्रुप गोल गोल फिरत डान्स करतो तेव्हा. त्यात एक हात उंचावून डान्स करण्याची स्टेप तर आपल्याला पण आवडते. आपल्याला तर हा डान्स भारी वाटतो. पण एव्हाना पूर्ण व्हिडियो संपलेला नसतो. मग अजून हे लोक काय काय मजा करणार अस वाटत असताना व्हिडियो कॅमेरा फिरतो. आता तो स्थिरावलेला असतो ते समोरच्या अजिंक्य म्युझिकल ग्रुपवर. या ग्रुपने आतापर्यंत आपण जो डान्स पाहिलेला असतो त्यांच्यासाठी वादन केलेलं असतं. त्यात ड्रम सेट वाजवणारी दोन्ही मुलं पुढे, आणि बाकीची पाठीमागे असा सेटअप असतो. त्यात कॅसीओ वाजवणारे पण आघाडीवर असतात.

कोणत्याही समारंभाची जान असणारे म्युझिकवाले आपल्या सगळ्यांनाच नेहमी भारी वाटत असतात. सतत काही तास वाजंत्री वाजवत आपलं मनोरंजन करण्याचं काम ते करतात. त्यात पूर्ण ग्रुप एकदिलाने वाजवत असेल तर मग अजून धमाल येते. या व्हिडियोत हीच धमाल अनुभवता येते. खरं तर, हळदीचे व्हिडियोज आपण जेव्हा जेव्हा बघत असतो तेव्हा तेव्हा सहसा त्यात डान्स प्रामुख्याने असलेला आपण बघतो. पण या व्हिडियोचं वेगळेपण अस की यात आपल्याला या म्युझिकल ग्रुपचा परफॉर्मन्स ही बघायला मिळतो. त्यांची ऊर्जा लाजवाब असते आणि एक वेळ तर अशी येते की त्यातील एक ड्रमवादक असा काही जोशात येऊन वाजवतो की ज्याचं नाव ते ! त्याच्या या वादनावर खुश होऊन मग एक व्यक्ती त्याच्या ड्रम वर पैसे देऊन जातात. पण एका हाताने तो ते पैसे बाजूला काढून ठेवतो. वादन मात्र थांबू देत नाही.एक खरं की त्याच वादन खरच मस्त वाटतं. कोणतीही कला सादर करणारे जेव्हा अगदी मनापासून कला सादर करतात त्याचाही आनंद येथे घेता येतो.

त्यामुळे हा व्हिडियो म्हणजे एका अर्थाने डबल धमाका ठरतो. ज्यात मस्त डान्स ही बघायला मिळतो आणि धमाल वादन ही अनुभवता येते. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपणही ही डबल मजा अनुभवली असणार हे नक्की. आम्ही तर बाबा दोनदा तीनदा हा व्हिडियो बघून मस्त मजा लुटली. हा व्हिडियो ज्यांनी शूट केला आहे त्यांनी या व्हिडियोसाठी खूप मेहनत तर घेतली आहेच आणि कलात्मकता ही दाखवली आहे. त्यांच्या ही कामाचे कौतुक आहेच. आपल्याला संधी मिळाल्यास हा व्हिडियो नक्की बघा. तसेच हा लेख कसा वाटला हे आमच्या टीमला नक्की कळवा. आपली टीम नेहमीच सातत्याने लिखाण करत असते. आपणही त्यावर नेहमीच प्रोत्साहनपर कमेंट्स आणि सकारात्मक सूचना देत असता. यातून आम्ही नवनव्या गोष्टी शिकतो आणि उत्तमोत्तम लेखन करत जातो. तेव्हा आपल्या सूचना आणि प्रोत्साहन दोन्हीही यापुढेही मिळत राहो हीच सदिच्छा. लेख शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *