Breaking News
Home / मनोरंजन / स्वतःच्या हळदीमध्ये ह्या नवरा नवरीने केला झिंगाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

स्वतःच्या हळदीमध्ये ह्या नवरा नवरीने केला झिंगाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

प्रत्येक कपलचं एक स्वप्न असतं. आपल्या लग्नात आपण एकदा तरी झिंगाटवर नाचलं पाहिजे. अखंड सिंगल सेनेने हा व्हीडिओ बघितल्यावर त्यांचे हावभाव कसे असतील ना हे वेगळं सांगायलां नको. आधीच उल्हास त्यात फाल्गून मास, अशी त्यांची गत झाली असेल हा व्हीडिओ पाहून. व्हीडिओ पाहिल्यावर एक लक्षात येईल. ही संपूर्ण झिंगाट गाण्यावर हे जोडपं पार झकास डान्स करतंयं अगदी आरची पर्शा सारखं एकदम करंट लावणारा हा डान्स. अनेकांची स्वप्न असतात लहानपणापासून. आपल्या लग्नात हे व्हावं, आपल्या लग्नात ते व्हावं. पण या वऱ्हाडी मंडळींना एकापेक्षा एक डान्सर जोडपं भेटल्यानं त्यांच्या लग्नात झिंगाट झालं. लग्नाला कितीबी खर्चं करा तुम्ही. किती फोकस, डिफोकस लायटींग शुटींग सजावट किती करायचं ते करा. तुम्हाला एक लक्षात येईल की जोपर्यंत वऱ्हाडी मंडळींच्या अंगात ती उर्जा पावर संचारत नाय ना तोपर्यंत लग्नात मज्जा नाय. ती सगळी मंडळी येतील तुम्हाला अक्षता टाकतील बाकीचे डान्स करतील तुम्हाला ओढून नेतील. पण असला डान्स होत नाही तोपर्यंत पैसा वसूल होत नाही.

व्हिडीओ मध्ये या नवराबाईने काय धमाला डान्स केलायं. नवरोबानं इथंही तिला पुरेपूर साथ दिलीय. हा आठवलं ते ‘कप्पल गोल’ असतं ना त्यापैकी एक विशलिस्ट बकेटलिस्टमध्ये असणारी ही गोष्ट आहे. नवरा नवरीचा डान्स. तुम्हाला असा डान्स कमीच पहायला मिळेल. हळदीला नवरा नवरी आपापल्या घरी. वरातीत शांत, काही अतरंगी मंडळी असतात ती ऐकत नाहीत. त्यांचं सुरूच असतं. त्यामुळे त्यांचा विषय वेगळा. वरात घरापर्यंत आली की उखाण्यावर सगळं भागवतात. कारण नवरी येणार असते, तिच्यावर दडपण असतंयं. नवराबाईच्या या सगळ्या वागण्याला एक वेगळी शिस्त येत असते आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी पोरींनं असा डान्स केला तर आपल्याकडे काही स्टीरिओटाईप्स तयार करणारे म्हातारे कोतारे मंडळी असतात जी स्वतःतर बिनधास्त होऊन डाननेस करतील. पण स्वतः मात्र, डान्स करायला बायका आल्या की त्यांना जज करतील. याच लोकांमुळे अनेक जोडप्याचं असं डान्स करायचं स्वप्न राहून जातं.

नंतर कुठे कोण डान्स करणार त्यांना एवढा भाव देणार तरी कोण नंतर. त्यांच्या डान्सला मान आणि दाद मिळणार ती लग्न् मंडपातच. या पोरांनी या संधीचं सोनं कसं करायचं याचं प्लानिंग जोरदार केलं होतं. डान्सच्या या सगळ्या स्टोरीत त्यांनी इन्स्टास्टोरी बनवली. झिंगाट गाणं निवडलं आणि नवरा नवरीनं जो धमाल डान्स सुरू केलायं, की सगळ्यांनी कॅमेरा फोन शोधून शुट सुरू केलंयं. डान्स आतून आला पाहिजे तो कुणी बाहेरून तुमच्यावर लादू शकत नाही. तसाच डान्स या दोघांनीही केला. धम्माल केली. जगणं इतकं सोप्प ठेवलं ना की कसली चिंता राहत नाही. प्रत्येक गोष्ट आवर्जून आनंदानं घेण्याच्या या सगळ्यात यांना ते जमलं. झिंगाटनं संसाराला सुरूवात झाली. पुढे काय होतं ते पुढचा भाग आहे. पण गाण्याच्या या तालावर दोघानी धरलेला ठेका मात्र गावभर व्हायरल झाला. बेस्ट कपल म्हणून हे जोडपं भाव खाऊन गेलंयं. असं झिंगाट होऊन जगावं. लोकांनी लक्षात ठेवावं की तुमच्या आयुष्यातील हे असे क्षण कायम अवीस्मरणीय करावेत, असा या सगळ्यांचा कल असायला हवा. पॉझिटीव्हली गोष्टी घ्यायला हव्या, या कपलच्या सारखं डान्स करण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात, प्रत्येकाला ते जमतं असं नाही. पण त्यांनी करुन दाखवलंयं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *