Breaking News
Home / बॉलीवुड / स्वतःपेक्षा १८ वर्ष मोठया क्रिकेटपटूची वेडी होती माधुरी दीक्षित, बोलली होती तो माझ्या स्वप्नात

स्वतःपेक्षा १८ वर्ष मोठया क्रिकेटपटूची वेडी होती माधुरी दीक्षित, बोलली होती तो माझ्या स्वप्नात

भारतीय क्रिकेट संघातील माजी धडाकेबाज फलंदाज सुनील गावसकर ह्यांनी क्रिकेटविश्वात अनेक विक्रम केले आहेत. गावस्कर ह्यांनी १२५ कसोटी आणि १०८ एकदिवसीय सामने खेळले. गावस्कर एक खूपच उत्कृष्ट फलंदाज तर होतेच परंतु क्रिकेटशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से सुद्धा खूप मनोरंजक आहेत. ह्यापैकींच एक किस्सा, तो सुद्धा आहे जेव्हा माधुरी दीक्षित सुनील गावस्कर ह्यांच्यावर फिदा झाली होती. ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः माधुरी दीक्षितने एका मुलाखतीदरम्यान केला होता.

गावस्करचे स्वप्ने पाहायची माधुरी
जेव्हा माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर सुपरस्टार बनली होती, तेव्हा तिचे चाहते दिवसरात्र तिची स्वप्न पाहायचे. माधुरी प्रत्येकाच्या हृदयात होती, परंतु त्या दिवसांत कोणी असा सुद्धा व्यक्ती होता जो माधुरीच्या हृदयात होता. तो व्यक्ती म्हणजेच भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाज सुनील गावस्कर. एका मुलाखतीमध्ये माधुरीने आपल्या ह्या वेडेपणाचा खुलासा केला होता. माधुरीने सांगितले होते कि – मी गावस्करची स्वप्ने पाहायची. माधुरी त्या दिवसांत केवळ २५ वर्षांची होती आणि सुनील गावस्कर तिच्यापेक्षा जवळजवळ १८ वर्षांनी मोठे होते. भारतीय क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर ह्यांचे खूप मोठे नाव होते. स्वतः माधुरी सुध्या त्यांच्या पर्सनॅलिटीची चाहती होती. खरंतर ज्यावेळी माधुरी गावस्कर ह्यांचे स्वप्ने पाहायचे तोपर्यंत गावस्कर ह्यांचे लग्न झाले होते. त्यांनी क्रिकेटविश्वातून सन्यास घेतला होता. गावस्कर ह्यांनी आपल्या एका फॅन सोबत डेट केल्यानंतर लग्न केले होते.

दोन वर्षांअगोदर झाली होती भेट
योगायोगाची गोष्ट अशी कि २०१८ आयपीएल दरम्यान माधुरी आणि सुनील गावस्कर ह्यांची भेट झाली होती. माधुरीने आपल्या ऑफिशिअल अकाउंटवर सुनील गावस्कर ह्यांच्यासोबत फोटो शेअर केला होता. हा फोटो माधुरीच्या ५१ व्या जन्मदिनी आयपीएलच्या प्री मॅच शो एक्स्ट्रा इनिंग्ज दरम्यान घेतला गेला होता. ह्या फोटोला फॅन्स ने खूप पसंत केले होते. क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते नेहमी असंच काहीसं राहिलं आहे. अगोदरपासूनच आतापर्यंत बॉलिवूड अभिनेत्री भारतीय क्रिकेटपटुंवर वेड्या झालेल्या आहेत. तर काही स्टार क्रिकेटपटू सुद्धा ह्या अभिनेत्रींच्या अदांवर क्लीन बोल्ड झालेले आहेत. ह्यामध्ये ‘पतौडी-शर्मिला टागोर’ पासून ‘अनुष्का-विराट’ पर्यंत अनेक नावे समाविष्ट आहेत.

क्रिकेटचे बॉलिवूडशी जुने नाते
बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्स ह्यामध्ये अनेक अश्या जोड्या होत्या ज्या खूप चर्चेत आल्या परंतु त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. सुनील गावस्करवर क्रश असलेली माधुरी क्रिकेटपटू अजय जडेजाला खूप पसंत करत होती. दोघांमधील अफेअर्सचे किस्से खूप चर्चेत होते. हि गोष्ट समोर आली कि माधुरीच्या सांगण्यावरून प्रोड्युसर अजय जडेजाला चित्रपटांत घेण्यासाठी प्लॅन करत होते. त्यानंतर अजयने खेळावर लक्ष देणे गरजेचे समजले आणि चित्रपटांचा विचार सोडून दिला. तर मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे माधुरीने अजय सोबत दुरावा केला. ह्याशिवाय माधुरीचे नाव संजय दत्त आणि अनिल कपूर ह्यांच्यासोबत सुद्दा जोडले होते, परंतु कोणतेच नाते जास्त वेळपर्यंत चालले नाही. त्यानंतर माधुरीने डॉक्टर श्री राम नेने ह्यांच्यासोबत १९९९ मध्ये लग्न केले आणि आता ती आपले पती आणि मुलांसोबत खूप चांगले आयुष्य जगत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *