पावसाळा म्हंटलं की अनेक गोष्टी आठवतात. मग पहिल्या पावसात भिजणं असो, गरम गरम भजी खाणं असो वा विविध धबधब्याच्या ठिकाणी जाऊन घेतलेला आनंद असो. त्यातही लहानपणी केलेल्या धमाल मस्तीची तर बातच न्यारी. त्या वयातल्या मस्तीला तर सीमाच नसते. त्यातही मुलं अतरंगी असतील तर बघायलाच नको. आज या सगळ्यांची आठवण व्हावी याचं कारण पावसाळा जोमात आहेच आणि त्यातही आपल्या टीमने नुकताच पाहिलेला व्हिडियो हे सुदधा एक कारण आहे.
हा व्हिडियो आहे एका वस्तीतला. या वस्तीत लहान मुलांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्याचं जाणवतं. या व्हिडियोत आपल्याला विटांची घरं दिसतात. मुंबई, पुण्यात राहणाऱ्यांना कळत नकळत आपल्या गावच्या घरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा या वस्तीत जवळपास १०-१५ मुलं खेळत असतात. त्यातली काही बसलेली असतात तर काही पावसात भिजत असतात. पण यात एक अतिशय अतरंगी पोरगं असतं. व्हिडियोच्या सुरुवातीपासूनच हा काही तरी मजा करणार हे कळत असतं. त्याच्या हातात एक टायर असतो.
व्हिडियो सूरु झाल्यापासून काहीच सेकंदात हे पोरगं यात बसतं. कसा काय मावतो त्यात देव जाणे. पण मग खरी मजा सुरू होते. टायरमध्ये हा मुलगा बसतो आणि थेट गडगडत पुढे जायला लागतो. ते खेळत असलेल्या रस्त्यावर काहीसा उतार असल्याने त्याच्या टायरलाही वेग मिळतो. आपणही अवाक होऊन बघत असतो. आपल्यापैकी ज्यांनी हे कारनामे केलेले आहेत ते मात्र हसत हसत आपल्या आठवणी जाग्या करत असतात. पण आपल्याला वाटत असेल की गंमत फक्त एवढीच आहे, तर तसं नाहीये. ही केवळ अर्धवट गंमत आहे. कारण हा मुलगा काही मीटर अंतरावर जातो. अजून खाली गडगडत जाऊ नये म्हणून पाय बाहेर काढतो. आपल्याला वाटतं थांबण्यासाठी असं करत असेल. पण कसलं काय. हा गडी आपल्या पायांनी ही एकचाकी ‘गाडी’ चालवत चालवत पुन्हा उतार चढून येत असतो. ते ही अगदी वेगाने. एवढं गंमतीदार दृश्य असतं की हसून हसून आपण लोटपोट होतो. तिथे उपस्थित असलेले लहान प्रेक्षकही याचा आनंद घेत असतात. त्यांच्या तर आनंदाला पारावर उरलेला नसतो.
आपल्या मित्राकडून होणारे हे अतरंगी वर्तन त्यांना आनंद देत असते. नवीन काही तरी पाहायला मिळालं म्हणून ती सगळी चिल्ली पिल्ली मजेत असतात. आपणही या व्हिडियोची मजा घेतोच. व्हिडियो संपल्यावर आपण स्वतःशीच हसत असतो. जर मित्रांसोबत बघत असू तर आपसूक जुन्या आठवणी जाग्या होतात. असो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्यालाही आवडला असेल. सोबत केवळ एक सूचना आहे. या मुलाने केलेला हा खेळ चुकीच्या पद्धतीने केला गेल्यास दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या गोष्टीची मजा जरूर घ्या पण आपल्या आजूबाजूच्या लहान किंवा मोठ्या मुलांना हे असं काही करण्यास प्रोत्साहन मात्र देऊ नका.
बाकी, आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. कारण आपली टीम लिहीत असलेले लेख दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रमाणात शेअर होत आहेत. तसेच कमेंट्स मधून सुद्धा आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आपल्या टीम पर्यंत पोहोचत असतात. या प्रतिक्रिया आणि लेख शेअर करण्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या या दोन बाबींमुळे आपल्या टीमला नवनवीन विषय शोधून त्यावर लेख लिहिण्यास प्रोत्साहन मिळतं. तेव्हा आपला हा पाठिंबा असाच कायम ठेवा. लोभ कायम असावा, धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :