कोळी गीतं आणि कोळी नृत्य असं म्हंटलं की काही गोष्टी प्रामुख्याने आठवतात. त्या म्हणजे कोळी गीतं आणि नृत्य सादर करताना आपसूक खळाळून वाहणारा उत्साह आणि मिळणारा निखळ आनंद. कोळी गीतं ऐकून त्यावर आपले पाय थिरकू नयेत, असं वाटणारे कोणी असतील असं वाटत नाही. इतकी सकारात्मक आणि प्रसन्न ऊर्जा या गीतांत असते. जर कोणाची हळद असेल आणि तीही कोळीवड्यात तर मग काय धमाल, अशीच आपली प्रतिक्रिया असते. कारण त्यात जेवण खाणं तर तगडं असणारच आणि सोबत असणार कोळी गीतांची मेजवानी. या अशाच एका मस्त हळदीच्या कार्यक्रमाचा काही अंश आमच्या टीमच्या बघण्यात एका वायरल व्हिडियो मार्फत आला. आता वायरल व्हिडियो म्हंटल्यावर आमची टीम लेख लिहिल्या शिवाय थांबते होय. मग काय घ्या आनंद आजच्या या लेखाचा.
हा व्हिडियो आहे तळवली कोळीवाडा, नवी मुंबई येथील. या व्हिडियोत आपल्याला कोळीवाड्यातील ताई, माई, काकू, मावश्या, आज्या, चिमुकल्या आणि खुद्द नवरदेव कोळीगीतांवर थिरकताना दिसतात. हळदी समारंभ म्हणजे उत्साह आलाच. या उत्साहात भर पडते तीन गाण्यांवरच्या नृत्यांची. या व्हिडियोची सुरुवात होते ती एकविरा दे’वीच्या गीताने. एकविरा दे’वी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान. तिला नमन करणारं गीत हे कोळीवाड्यातील शुभ कार्यात असतंच. या गाण्यावर नृत्य सादर करताना, उपस्थित महिला वर्ग अगदी उत्तमरीतीने सादरीकरण करतो. यात त्यांचं विशेष कौतुक करावा असा भाग म्हणजे त्यांनी समूह नृत्याची केलेली उत्तम तयारी. या तयारीमुळे या चमू मधला एकसंधपणा दिसून येतो. त्यांनी सादर केलेल्या स्टेप्स कोणा निष्णात कोरिओग्राफरने ठरवल्या सारख्या सुरेख असतात. काही वेळाने मग दुसरं गाणं सुरू होतं. पहिल्या नृत्याच्या वेळी दोन दोन च्या गटांचं रूपांतर वेगवेगळ्या फॉर्मेशन मध्ये झालेलं असतं. पण कॅमेऱ्यात सगळ्या जणी दिसतील याची खबरदारीही घेतलेली असते. या चमूचं नृत्य सुरू होतं.
गाण्याचं संगीत आपल्यालाही थिरकायला लावतं. गाणं असतं, “वेसावची पारो नेसली गो, नेसली गो नवा सारा’. आपण ज्याला ऑल टाइम फेवरीट गाणं म्हणू असं हे गाणं. आपणही कधी या गाण्यावर नृत्य केलं असेल त्यांच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या होतात. यावेळीही उत्तम समूह नृत्य सादर करत सगळा चमू उपस्थितांचं आणि आपलं मन जिंकतात. गाण्याच्या सुरुवातीस तर टाळ्या शिट्या सुद्धा वाजतात. लागोपाठ केलेल्या दोन उत्तम डान्स नंतर तिसरं गाणं दमदार व्हावं अशी आपली अपेक्षा असते आणि हा चमू आपल्याला नि’राश करत नाही. उलट आधीच्या चमूत अजून खूप जणं सामील होतात. खुद्द नवरदेव सुद्धा या चमूत सामील झालेले दिसून येतात. मग काय अजून बहार येते. या गाण्याच्या वेळेस दोन गट एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. गाणं सुरू होतं आणि नवरदेव आणि बाकीची मंडळी थिरकायला लागतात. छोट्याश्या जागेचा कल्पक वापर करत कोरिओग्राफी केलेली समजून येते. कोरिओग्राफर च्या कल्पकतेचं कौतुकही वाटतं. खुद्द नवरदेव नृत्य करताना आघाडी घेताना दिसतात. त्यामुळे बाकीचे नवरदेवाप्रमाणे स्टेप्स करताहेत हे लक्षात येतं.
एवढ्या उत्साही वातावरणाचा नकळत परिणाम आपल्यावरही होतोच. आपल्यालाही नकळत प्रसन्न वाटायला लागतंच आणि काही वेळात या सात मिनिटांच्या या व्हिडियोची सांगता होताना दिसून येते. सात मिनिटांत आपलं मन अगदी प्रसन्न झालेलं आपल्याला जाणवतं. आधी म्हंटल्याप्रमाणे कोळी गीतांत आणि नृत्यांत अशी काही सकारात्मक ऊर्जा असते की आपलं मन प्रफुल्लित होतंच. आपलं मन प्रफुल्लित करणाऱ्या या नृत्यातील सहभागी मंडळींना आणि त्यांच्या कोरिओग्राफरला त्यांच्या कल्पकतेसाठी मानाचा मुजरा. तसेच ज्यांनी हा व्हिडियो रे’कॉर्ड केला त्यांनाही धन्यवाद आणि या हळदीच्या कार्यक्रमात अजून जा’न ओतणाऱ्या नवरदेवास आणि त्याच्या नववधुस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
आपल्याला अशाच प्रफुल्लित करणाऱ्या व्हिडियोज वरील आमच्या टीमचे लेख वाचायचे असल्यास आमच्या वे’बसा’ईटवर असलेला स’र्च ऑप्शन वापरा. त्यात वायरल असं लिहून स’र्च केल्यास आपल्याला विविध वायरल व्हिडियोज वरील तेवढेच वायरल झालेले लेख वाचायला मिळतील. आपला आमच्या प्रति असलेला स्नेह असाच वाढू द्या. धन्यवाद !
बघा व्हिडीओ :