Breaking News
Home / मनोरंजन / हळदीमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

हळदीमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

बघायला गेलं तर आपले मित्रांचे अनेक ग्रुप्स असतात. पण तरीही त्यातला एक ग्रुप मात्र कायम आपल्या जवळचा असतो. गंमतीचा भाग असा की बहुतांश वेळा हा ग्रुप नेमका तीन जणांचा असतो. आपण आणि आपले दोन जिगरी यार यात असतात. अर्थात प्रत्येक गोष्टीप्रमाणे यास अपवाद असतात हे नमूद करायलाच हवं. असो. तर सांगण्याचा मुद्दा काय तर हे अगदी जवळचे सवंगडी असतात. आणि सगळ्यांत जास्त खोडकरपणा ही त्यांच्यातच असतो हे ही मान्य करायला हवं. त्यांची एक इच्छा नेहमी असते. ती म्हणजे आपल्या लग्नात डान्स करण्याची. अशीच काहीशी इच्छा एका मित्राच्या ग्रुपची असावी आणि ती पूर्णही झालेली दिसते. हे म्हणण्याचं कारण आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.

वर उल्लेख केल्याप्रमाणे हा तीन मित्रांचा व्हिडियो असून त्यातील ज्यांचं लग्न असतं ते आपल्याला खुर्चीवर बसलेले दिसून येतात. तसेच सोबत असतात त्यांचे दोन मित्र. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक गाणं सुरू होतं. ज्यांना जुनी गाणी आवडतात त्यांना हे गाणं ऐकून लगेच ‘परींदा’ चित्रपट आठवेल.

यातील ‘सेहरे मैं दुल्हा होगा’ हे गाणं वाजत असतं. पहिली वीस सेकंद फक्त म्युझिक ऐकायला मिळतं. पण त्यावर ही हे दोन्ही मित्र छान अशा स्टेप्स करत नाचत असतात. सहसा डान्सची सुरुवात मस्त झाली की एक मूड बनतो. इथेही तेच होतं. हे दोघेही मस्त नाचतात त्यामुळे मस्त असा मूड बनतो. मग ऐकू येतात ते गाण्याचे बोल. त्या बोलांच्या अनुसार या दोघांचा ही डान्स मग होत जातो. सेहरे मैं दुल्हा होगा, दुल्हन होगी यावर केलेल्या स्टेप्स वरून कळून येतं की या दोघांनी विचार करून डान्स बसवला आहे. कदाचित लग्नाच्या गडबडीत वेळ कमी मिळाला असेल अस काही वेळेस वाटून जातं पण तरीही डान्स स्टेप्स मात्र मस्त असतात. तसेच मध्ये मध्ये भांगडा ही चालतोच. तो ही योग्य वेळी वापरला जातो. तसेच या दोघांचा अगदी फिल्मी अंदाज ही भाव खाऊन जातो. त्यांच्या या अंदाजवर नवरा मुलगा ही फिदा असतो हे कळून येतं. शेवटी शेवटी तर त्यालाही राहवत नाही आणि हे दोघेही नवऱ्या मुलाला डान्स करायला प्रवृत करतात. अगदी काहीच क्षण ह्या तिघांचा डान्स बघता येतो आणि तेवढ्यात व्हिडियो संपतो.

व्हिडियो खरं तर जवळपास सवा पाच मिनिटांचा आहे. पण तरीही नवऱ्या मुलाच्या या दोन्ही मित्रांनी त्यात अशी काही धमाल केली आहे की आपण अगदी मजा घेत घेत हा व्हिडियो बघतो. आपल्या लग्नातही असे काही डान्स आपल्या मित्रांनी केले असतील तर त्याच्या आठवणी जाग्या होतात. किंवा आपल्या मित्राचं लग्न लवकरच होणार असेल तरीही आपण काय धमाल करायची याची कल्पना येते. एकूणच काय तर हा व्हिडियो खूप आनंद देऊन जातो. आपल्या टीमला तर या तिघांची मैत्री आणि यात या दोघांनी केलेला डान्स खूप आवडला. धमाल आली.

आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही आवडला असणारच. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्यास भावला असणार हे नक्की. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमी वैविध्यपूर्ण लेखन करत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता. त्यातूनच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि नवनव्या विषयांवर लिहिण्यास हुरूप येतो. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहो ही सदिच्छा. तेव्हा आपल्या टीमचे लेख वाचत राहा, शेअर करत राहा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.