स्वतःची हवा करायला कोणाला आवडत नाही सांगा. सगाळ्यांनाच आवडतं. आमच्या टीममध्येही एकेक आहेतच की जबरदस्त हवा करणारे. पण आमच्या टीमचं एक आहे. जेवढं काम झेपतं तेवढंच करतो. जास्त हुशारी करायला जात नाही. कारण तसंही आपल्याकडे म्हणतातच ना, अति केली की माती होतेच. आणि त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
पण अस असलं तरी कधी कधी गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे आपण मस्करीत मस्करीत एखादी गोष्ट करायला जातो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. सुदैवाने त्यात काही त्रास झाला नाही तर बेहत्तर. नाही तर मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. त्यात जर आपण एखादी गोष्ट, आग वा एखाद्या ज्वलनशील पदार्थांच्या बाबतीत करत असू तर चार हात लांबच राहिलेलं बरं. कारण आगीशी खेळ कधी अंगाशी येईल ते सांगता येत नाही. आता आज आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना.
हा व्हिडियो तसा जुना आहे. पण त्यातून मिळणारा धडा आजही, कालही आणि उद्याही लागू पडणारा आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला काही जण एका गच्चीत उभे असलेले दिसून येतात. त्यातील एक जण एका कुटुंबातील मुख्य माणूस आणि बाकीचे त्या घरातील सहाय्यक असल्याचे दिसून येतं. त्यातील जो मुख्य माणूस आहे त्याच्या हातात दोन फटाक्यांमधील रॉकेट्स असतात. आपण त्यांना रामबाण ही म्हणतो. आता हा फटका आपण एखाद्या बाटलीत लावून उडवतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तसेच त्यामागच कारण ही अगदी स्पष्ट आहे. पण इथे मात्र जरा, ‘हवा’ करावी असा हेतू असावा. कॅमेऱ्यामागून येत असलेल्या आवाजाने सगळ्या दिल्या जात असलेल्या सुचना कळत असतात. तसेच दोन्ही सहायक हातात कडीपेटी धरून वात जळवायचा प्रयत्न करत असतात. दोघांचा ही एकाच वेळी वात जाळण्याचा प्रयत्न असतो. तो यशस्वी ही होतो. पण आता अस झालं की रॉकेट्स पटकन सोडून द्यायला हवेत. पण ज्याच्या हातात ते असतात त्यांच्या हातातून ते पटकन सुटत नाहीत. अचानक सुटले आणि कुठे भलतीकडे गेले म्हणून सोडले जात नाहित की अचानक मिळालेल्या झटक्याने काही कळत नाही हे एक कोडंच राहतं.
पण जेव्हा हे दोन्ही रॉकेट्स पेट घेतात तेव्हा मात्र आपल्याला भीती वाटल्यावाचून राहत नाही. हे वाचून किंवा तो व्हिडियो बघून काही जण म्हणतील, की हे तर सोप्पं आहे. पण मंडळी, आपण सगळेच जण जाणतो की हे योग्य नाही. एरवी लवंगी, भुईचक्र लावून फेकताना निदान काहीसा वेळ मिळतो. अर्थात ते ही अयोग्यच. पण हे तर त्याहूनही धोकादायक आहे. ते कसं हे समजायला आपण सगळेच सुज्ञ आहात तेव्हा वेगळे सांगणे न लगे. पण यातून अधोरेखित होणारी एकच गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती म्हणजे – हवा करणं मजेसाठी ठीक वाटत असलं तरी आपला जीव महत्वाचा ! कारण सर सलामत तो पगडी पचास हे आपण जाणतोच. या लेखाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना, फटाके आणि अन्य अग्नी सदृश्य गोष्टी, निगुतीने हाताळाव्यात हे सांगायचा आमच्या टीमचा उद्देश आहे. तसेच हा व्हिडियो सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेला आहे याची कृपया आपण नोंद घ्यावी ही विनंती. बाकी आपण सुज्ञ आहात. तेव्हा स्वतःची काळजी घ्या.
बरं, तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :