Breaking News
Home / जरा हटके / हाताने अ’पं’ग असलेला हा मुलगा पायाने खेळतो कॅरम, त्याचा खेळ पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल

हाताने अ’पं’ग असलेला हा मुलगा पायाने खेळतो कॅरम, त्याचा खेळ पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल

मराठी गप्पाच्या वाचकांना आता वायरल व्हिडियोज वरील लेख वाचण्याची एवढी सवय झाली आहे की विचारता सोय नाही. आमच्या विविध लेखांना तुम्ही जो उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आमच्या टिमकडून मनःपूर्वक धन्यवाद ! तुम्हाला आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या, तसेच जिद्द शिकवणाऱ्या अनेक व्हिडियोजवरील लेखांचा यांत भरणा आहेच. आज याच मांदियाळीतील हा एक लेख. आपल्या सगळ्यांचा सुट्टीतला एक आवडता खेळ म्हणजे कॅरम. काहींच्या चाळीत, इमारतीत हमखास असणारा हा खेळ. मग मोकळ्या वेळेत अनेक जण हा खेळ खेळतात. काही जण तर इतके तरबेज असतात की ते खेळत असताना बघ्यांची गर्दी जमलीच म्हणून समजा. आमच्या टीमच्या नजरेस अशाच एका खेळाडूचा व्हिडियो नजरेस पडला.

हा खेळाडू हा दि’व्यां’ग असल्याने हा व्हिडीओ पूर्ण बघण्याची उत्सुकता वाढते. बरं यात ठरवून काही केलेलं दिसत नाही. जशा गोष्टी घडतात तशाच त्या दाखवण्यात आल्याने त्यातला खरेपणा भावतो. या व्हिडियो ची सुरुवात होते ती आपल्या समोर बसलेल्या या दि’व्यां’ग मुलाच्या आणि त्याच्या मित्रांच्या दिसण्याने. कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला बसलेला मुलगा एक सोंगटी पॉकेट मध्ये घालवतो. मग स्ट्रायकर हातात घेऊन बराच वेळ अंदाज घेत असतो. तोपर्यंत बाकीचे गप्पांमध्ये रंगलेले असतात. उजव्या बाजूचा मुलगा खेळतो, पण दुसरी सोंगटी काही पॉकेट मध्ये जात नाही. मग वेळ येते ती वर नमूद केलेल्या मुलाची. तो उठतो. आपला उजवा पाय वर घेत त्यातल्या बोटांमध्ये त्याचा स्ट्रायकर पकडतो. आपण हाताने ज्या सहजतेने स्ट्रायकर खेळवू त्या सहजतेने हा मुलगा पायाच्या बोटांनी स्ट्रायकर खेळवत असतो. पहिला नेम आणि सोंगटी त्याच्या समोरच्या पॉकेटमध्ये जाते. उपस्थित खुश होतात. तो कसलेला आणि नावाजलेला खेळाडू आहे, हे कळण्यास वेळ लागत नाही. आपल्या लौकीकास साजेसा असा दुसरा नेमही हा मुलगा लावतो. दुसरी सोंगटी ही पॉकेट मध्ये जाते. मग तिसरी. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा मुलगा कोणाचाही आधार न घेता केवळ एका पायावर उभा राहून आपला तोल सांभाळत हे सगळं करत असतो.

त्यात आजूबाजूला लोकं बोलताहेत, त्याला प्रोत्साहन देत आहेत हे जाणवुनही त्याची एकाग्रता भंग पावत नाही, हे विशेष. आपण मनातल्या मनात त्याच्या या कौशल्याला दाद देत असताना चौथी सोंगटी ही पहिल्या सोंगटीला जाऊन मिळते आणि हा व्हिडियो संपतो. हा व्हिडीओ अवघ्या एका मिनिटाच्या आत संपतो. पण आपल्याला या खेळाडूचं कौतुक मात्र त्यानंतरही वाटत राहातंच. आव्हानं कितीही असली तरीही आपल्याला आवडतात त्या गोष्टी करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, हा संदेश नकळत मिळतो. आपल्या या खेळाडू मित्राला आणि त्याच्या कौशल्याला आमच्या टीमचा मानाचा मुजरा आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्याला हा लेख आवडला असल्यास त्याला शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या वे’बसा’ईटला बु’कमार्क करून होम पेजवर ठेवायला ही विसरू नका. वायरल व्हिडियोज वरील लेख वाचण्यासाठी आमच्या वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शनचाही आपण वापर करू शकता. वायरल असं लिहून स’र्च करा आणि उत्तमोत्तम लेखांचा आनंद घ्या. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *