माणुसकी, भू’तदया हे केवळ शब्दांपुरते उरले आहेत असे शेरे आपण अनेक वेळेस ऐकतो. काही वेळेस दु’र्दैवाने आपणही असाच अनुभव घेतो. पण माणसाचं माणूसपण टिकवून ठेवणाऱ्या या गोष्टी काही लोप पावणाऱ्या नाहीत. त्या कालातीत आहेत. याचाच प्रत्यय आपल्याला एक वायरल व्हिडियो बघून येतो. अवघ्या अर्ध्या मिनिटाचा हा व्हिडीओ, पण यात घडलेली घटना माणसाच्या सहृदयतेचे दर्शन घडवते. व्हिडियोच्या सुरुवातीलाच आपल्याला एक जीप गाडी ज’ळताना दिसत असते. आजूबाजूला काही मुलं येरझाऱ्या घालत असतात. जीप मध्ये काही तरी असावं असं वाटून जातं. तेवढ्यात झाडाची फांदी हातात घेतलेला एक तरुण आडवा पडून गाडीखाली बघतो.
गाडीखाली काही तरी असल्याचं जाणवतं त्याला. तो पर्यंत दुसरा एक तरुण आपल्या हाताला असलेल्या प्लास्टरची पट्टी काढून टाकतो. अगोदरच्या मुलासारखा तोही जमिनीवर आडवा होतो. प्लास्टर असलेला हात पुढे घालत तो काही तरी बाहेर काढतो आणि त्याच्या पाठीमागे ठेवतो. चुकतं चुकतं बघताना लक्षात येतं की ही तर लहान पिल्लं आहेत. कदाचित गाडीखाली निवाऱ्यासाठी गेली असावीत आणि आ’ग लागल्याने त्यांना काही कळलं नसावं. पण ही मुलं मात्र अगदी दे’वदूतासारखी धावून येतात. खासकरून तो प्लास्टर असलेला मुलगा. स्वतःच्या हाताला लागलेलं असूनही अगदी उत्स्फूर्तपणे तो या मदतकार्यात सहभाग घेतो. जवळपास तीन पिल्लांना तो बाहेर काढतो. शेवटी शेवटी तर त्याचा हात दुखायला लागतो हे ही आपल्याला जाणवतं. पण त्याने आणि इतर तरुणांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि धाडस हे कौतुकास्पद आहे. त्यांनी वेळेवर हालचाल केली नसती तर ते मु’के नवजात जीव हकनाक ब’ळी गेले असते. पण शेवटी दे’व तारी त्याला कोण मा’री हेच खरं. या सगळ्या तरुणांचं त्यांच्या प्रसंगावधानाबद्दल आणि धाडसाचे विशेष कौतुक !!!
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. व्हिडीओ पाहून तुम्हांला कसा वाटला ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया देऊन कळवा. आणि ह्या मुक्या प्रा’ण्यांसाठी आपल्या कडून जे जे शक्य आहेत त्या गोष्टी नक्की करा. त्याचप्रमाणे आमच्या टीमने वायरल व्हिडियोज वर अनेक लेख लिहिले. पण मनाला शांती लाभू देणाऱ्या काही वायरल व्हिडियोज पैकी हा व्हिडिओ. त्यावर आमच्या टीमने लिहिलेला हा लेख नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा बरं का ! आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :