धूम चित्रपटाला बाइकर्सने काही डोक्यावर घेतले, त्यानंतर भारतात ऑन रोड स्टंटबाजी प्रसिद्ध झाली. शेंबड्या पोरांपासून ते कॉलेज कुमारापर्यंत प्रत्येकाला आपली स्पोर्ट्स बाईक असावी, त्यावर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपणही स्टंटबाजी करावी, असाच काहीसा रोख प्रत्येकाचा असतोय. कधी भरधाव वेगात तर कधी रस्त्यात वाकडी तिकडी बाईक चालवणं म्हणजे त्यांचं फॅड. पण आपले पांडू हवालदार हे अशा स्टंटमॅन बाइकर्सचे सर्वात पहिले दुश्मन ठरतात.परंतु, आपले ट्राफिक पोलीस बंधू नियमानुसार वागायला लावतात. या पोरांना रस्त्यावरती धांगडधिंगा घालायचा असतो; यात सगळ्यात कधीकधी रस्ते अपघा’तत जीव जाणे हे सगळे प्रकार उघडकीस येतात. मात्र तरीही काहींना स्टंटबाजी हवीहवीशी वाटते. आपला जीव सांभाळून स्टंट केला तर काहीही हरकत नाही. पण आपल्यामुळे आपण इतरांचे जीव धोक्यात घालून जर स्टंटबाजी करणार असून तर ते मात्र धोकादायकच आहे.
या व्हिडिओमध्ये सगळ्या स्टंटमॅनचा बाप कसा रस्त्यावरती रांगडा गडी स्वतःला समजून बाईक चालवतोय, हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की स्टंटबाजी काही येड्या गबाळ्याचा खेळ नाही. रस्त्यावरच्या रोजच्या रहदारीतही अशा प्रकारे न अडखळता एका चाकावर गाडी चालवण्याचं कसब या स्टंटमॅनला कसं जमलं असेल, त्यासाठी किती सराव केला असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. पण एका चाकावर मोटार सायकल चालवायची म्हणजे भारी डोकं लागतं. बॅलन्सही सांभाळावा लागतो. आपला तोल गेला तर आपल्या सोबत जी काही मंडळी रस्त्यावरती आहे, आपण त्यांनाही संकटात घालून बसतो; पण या पोरांनी सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपली कलाकारी कॅमेऱ्यात कैद केली. भले टिकटोकवर किंवा instagram वर ह्या भाऊंचे व्हिडिओमुळे फॅन्स तयार होतील. पण काही लोक त्याला शिव्याही घालत असतील. तरीही भाऊ चर्चेचा विषय मात्र ठरला आहे हे नक्की! या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्टंट मॅनला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही मुलांनी त्याच्या या स्टंटबाजीला चमत्कार मानत सुरक्षित रित्या स्टंट करावे असा सल्ला दिला आहे. तर या सगळ्या कौशल्याचा वापर योग्य ठिकाणी केला असता तर त्याला चांगला फायदा झाला असता, अशी चिंता आहे! त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली जाते. दुसरीकडे काही लोकांनी तर तुम्ही असले व्हिडिओ दाखवून मुलांना स्टंटबाजी करण्यासाठी प्रवृत्त करत आहात, असा जाब विचारला आहे. काही लोकांनी स्टंटमॅनला शिव्याही दिल्या आहेत. याची जागा लवकरच हॉस्पिटलमध्ये बेडवर असणार आहे, अशा शब्दात त्याच समाचारही घेतला आहे. स्टंटबाजी किंवा असे साहसी खेळ करण्यासाठी सार्वजनिक रस्ते कितपत योग्य आहेत, काहींनी प्रश्न यानिमित्ताने विचारले. जी नवीन पिढी नुकतीच कॉलेज किंवा शाळेमध्ये दाखल झालेली असते, त्यांनी जर अशा प्रकारच्या स्टंटबाजांकडून चुकीचा संदेश घेतला आणि अपघात सदृश्य स्थिती आली तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न विचारला जात आहे. स्टंटबाजांना कौतुका पेक्षा जास्तच टिकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे त्याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. भारतात अशा प्रकारे खुल्या रस्त्यावरती स्टंटबाजी करणे हा कायद्याने गुन्हा आहे, याबद्दल पोलिसांकडून कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
बघा व्हिडीओ :