Breaking News
Home / बॉलीवुड / हा मराठी अभिनेता साकारणार तानाजी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका

हा मराठी अभिनेता साकारणार तानाजी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका

इतिहासाच्या पानांवर ‘तानाजी मालुसरे’ हे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेलेले आहे. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांच्यासोबत स्वराज्य स्थापनेपासूनच्या अनेक महत्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती होय. स्वराज्यासाठी आई जिजाऊंच्या इच्छेसाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंवर सोपवली होती. ज्यावेळी तानाजींना हि जबाबदारी माहिती पडली त्यावेळी ते त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी करत होते. स्वराज्यासाठी त्यांनी मुलाच्या लग्नाची ती तयारी अर्धवट सोडून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी ते निघाले. तेव्हापासून ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ हि ओळ इतिहासात अमर झाले. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या अश्या ह्या नरवीर तानाजींच्या जीवनावर लवकरच ‘तानाजी’ हा चित्रपट येत आहे. ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर अजय देवगण असून, ओम राऊत चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

अजय देवगणने आपल्या आगामी ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर दोन महिन्याअगोदरच शेअर केले होते. ह्या पोस्टर मध्ये अजय देवगण स्वतः तानाजी मालुसरेंची भूमिका निभावत आहे. तसेच चित्रपटात मुख्य व्हिलनची भूमिका सैफ अली खान निभावत आहे. सैफ अली खान ह्या चित्रपटात राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड ह्यांची भूमिका निभावत आहे. जेव्हापासून हे पोस्टर रिलीज झाले तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. ह्या चित्रपटाच्या नावाच्या स्पेल्लिंग वरून सुद्धा सोशिअल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु चित्रपटातील संबंधित सूत्रांकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर नंतर हा वाद मिटला. जेव्हापासून ह्या चित्रपटाची चर्चा होती तेव्हापासून ह्या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार ह्याची अनेकांना उत्सुकता होती. परंतु कालच ह्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले. त्या पोस्टर मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारत आहे, ह्याचा खुलासा झाला.

‘तानाजी’ चित्रपटात बॉलिवूडमध्ये आपल्या चांगल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अजय देवगणने सोशिअल मीडियावर शिवाजी महाराजांचा हा पोस्टर शेअर करत त्याखाली ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ असे कॅप्शन लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या ह्या लूकमध्ये डोक्यावर जीरेटोप, टोकदार दाढी, गळ्यात मोत्यांची माळ असा राजेशाही थाटातील लूक पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे महाराज घोड्यावर स्वर झालेलेही दिसत आहेत. शरद केळकर ह्याने रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे त्याने ‘हलचल’, ‘रामलीला’, ‘मोहेंजोदडो’, ‘बादशाहो’, ‘हाऊसफुल ४’ ह्यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलेले आहे. ‘तानाजी’ चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे १५० कोटी रुपये असून ‘ओमकारा’ चित्रपटानंतर अजय देवगण आणि सैफ अली खान हि जोडी तब्बल १३ वर्षानंतर एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *