तुम्ही मार्क जुकरबर्ग आणि अंबानी सारख्या लोकांचं नाव ऐकलं असेलचं. तसेच प्रत्तेक वर्षी फोर्ब्स सारखी मोठी संस्था एक यादी काढते. ज्यात यांच नाव सर्वात वरती असते. परंतु आपाल्याला माहिती आहे का, या दुनियेत एक व्यक्ती असा होता जो इतिहातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जातो. सन 1280 – 1337 मध्ये देश माली आणि त्याच्या पेक्षाही खुप श्रीमंत! इतिहासातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची ओळख ‘मनी’ मैकजीन’ ने केली आहे. ‘मनसा मूसा प्रथम’ बद्दल एक ओळख ही पण आहे की, तो टिंबकटू चा राजा होता. मूसा ने मालीच्या राज्यावर त्यावेळी राज्य केलं होतं, जेव्हा तो खनिज पदार्थ खास करून सोन्याच्या मोठ्या गोदामा चा मालक होता.
हा तो जमाना होता जेव्हा संपूर्ण दुनियेत सोन्याची खुप मागणी होती. त्याचा खरं नाव मूसा किटा प्रथम होत. पण गादीवर बसल्या नंतर त्याला मनसा या नावाने संबोधिले जाऊ लागले. मनसा ह्या शब्दाचा अर्थ राजा असा होतो. पश्चिम आफ्रिकेतील माहिती नुसार मूसा चं राज्य एवढ मोठं होतं की, त्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. आजचे मॉरीटानीया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना, फासो, माली, नाइझर चाड आणि नाइजीरीया हे त्याकाळी मूसा च्या राज्याचा एक भाग होते. मनसा मूसाने आपल्या कारकीर्दीत अनेक मशिदीही बांधल्या, ज्यातील काही आजही उभ्या आहेत.
मनसा मूसा च्या मालमत्तेचा हिशोब करणे वेळे नुसार कठीण आहे. तरी पण एका अंदाजानुसार मनसा मूसा जवळ 4,00,000 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी मालमत्ता होती. भारतीय अनुमाना नुसार अडीज लाख करोड रुपये एवढी असावी. मनसा मूसा जवळ जेफ बेजोस पेक्षा खुप जास्त मालमत्ता होती. जर मुद्रांचा हिशोब जोडला नाही, तर जेफ बेजोस च्या जवळ इतिहासातील जिवंत व्यक्ती मध्ये सर्वात जास्त पैसा आहे. मनी मैगजीन मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन च्या इतिहासाचे प्राध्यापक रुडोल्फ वेयर सांगतात, ‘ही इतिहासातील सगळ्यात श्रीमंत माणसाची गोष्ट आहे .जेव्हा आपल्या जवळ एवढी मालमत्ता असेल कि, तिचा अंदाज लावणे कठीण होऊन जाईल. तेव्हा समजा की तुम्ही खूप श्रीमंत आहात.’