Breaking News
Home / जरा हटके / हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा ह्या माणसाला सलाम कराल, बघा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा ह्या माणसाला सलाम कराल, बघा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज म्हणजे गंमत जंमत असं सहसा समीकरण आपल्या डोक्यात अगदी ठरलेलं असतं. पण प्रत्येक वेळी तसंच असायला पाहिजे, असं काही नाही ना. होय, पण तुम्ही म्हणाल की आज कसं काय हे सुचतंय? तर उत्तर आहे आमच्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका पंजाबी काकांचा. पंजाबी माणसं ही प्रेमळ, दिलदार म्हणून ओळखली जातात. तसेच परोपकार करण्याची त्यांची वृत्तीसुदधा प्रशंसनीय. या व्हिडियोतील हे काका म्हणजे याचं मूर्तिमंत उदाहरण. कारण हे काका काय करतात, तर वाटसरूंना पाणी देण्याचं काम करतात. आपल्या भारतीय समाजात अगदी श’त्रुलाही पाण्यासाठी नाही म्हणू नये, असं शिकवलं जातं. इथे हे काका तर वाटसरूंना मदत करताना दिसतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा पार्श्वभूमीला एक बस उभी असते. तर एका ऍक्टिवा स्कुटर वर दोन पाण्याचे गडू ठेऊन, हे काका या बसमधील प्रवाशांना पाणी पुरवत असतात.

एका प्रवाशाची पाण्याची बाटली भरून देतात. मग गाडी सुटते. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामागील एक व्यक्ती बस स्टॉप वर उभं राहून टिपत असतात. तेवढ्यात त्यांच्या बाजूला असलेले तीन तरुण आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी जातात. हे काकासुद्धा अगदी त्वरेने त्यांना पाणी भरून देतात. हे तरुण पून्हा आपल्या जागी येऊन पाणी पीत असताना सिग्नल सुटतो आणि वर्दळ पुन्हा वाढते. यावेळी हे काका पाण्याचा पेला भरून घेतात आणि समोरून येणाऱ्या बसला दाखवतात. बस ही थांबते. त्यांचं हे सत्कार्य अजून बघायला मिळेल असं वाटत असतं, पण दुर्दैव असं की हा व्हिडियो अगदी त्याच क्षणी संपतो. पण एक चांगली बाब म्हणजे या सव्वा मिनिटांच्या व्हिडियोतून आपल्याला या काकांच्या कार्याला पाहता येतं, निरीक्षण करता येतं आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे प्रेरणा घेता येते. कारण आपण नेहमीच ऐकतो आणि विश्वास ही ठेवतो की प्रत्येकाची समाजाप्रति बांधिलकी असते. पण ही बांधिलकी जपायची कशी हे कसं कळणार.

पण या काकांचा हा व्हिडियो पाहून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा निदान एक मार्ग तरी सापडला असं आपण नक्की म्हणू शकतो. बरं त्यासाठी गुंतवणूक फार मोठी हवी का? तर तसंही नाही. अगदी कमी गुंतवणुकीत हे करता येतं. अगदी साध्या कृतीतून आपल्या पुढे सामाजिक कार्याचं उत्तम उदाहरण सादर करणाऱ्या या काकांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा.

आपल्याला काकांचं कार्य स्पृहणीय वाटलं असेल तर हा लेख नक्की शेअर करा. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हा लेख पोहोचूद्या. त्याचप्रमाणे एक विनंती. काकांचं हे कार्य पाहून आपल्याला ही काही करावंसं वाटत असेल तरी, क’रोना काळातील नियमांचं पालन करूनच आणि तशी परवानगी असेल तरच काम करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आणि हो, आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेख वाचायला विसरू नका. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.