Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहाणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहाणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

आपल्या मराठी गप्पाच्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले. त्यात प्रामुख्याने गंमतीशीर, हास्यस्फो’ट घडवणाऱ्या व्हिडियोज वर लेख लिहिलेले होते. पण आज मात्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात आसवं आणणाऱ्या एका व्हिडियो विषयी लिहायचं ठरवलं. हा व्हिडियो आहे काव्यधारा या कवी संमेलनाचा. हे कवी संमेलन महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध पावलेले आहे. येथे निमंत्रित कवी येतात आणि आपल्या विविध कविता सादर करतात. अशा या लोकप्रिय संमेलनाच्या पाचव्या वर्षी एका कवीने सादर केलेली कविता हा या व्हिडियो चा केंद्रबिंदू. हे कवीही नावाजलेले कवी आहेत. अनंत विठ्ठल राऊत असं त्यांचं नाव. आपण त्यांना वर्हाडी शैलीतील कवितांसाठी ओळखतो. त्यांच्या कविता आपल्या आयुष्यातील प्रमुख टप्पे, महत्वाच्या व्यक्ती यांविषयी भाष्य करतात. त्यामुळे प्रेम, नातेसंबंध, आई वडील हे प्रामुख्याने त्यांच्या कवितांचे विषय.

बायको पुढे बोलू न शकणाऱ्या नवऱ्याची व्य’था त्यांनी आपल्या कवितेतून अशी काही मांडली की अनेकांनी त्यास पसंती दर्शवली. या कवितेस त्यांच्या यु’ट्युब चॅ’नेल वर ७० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याचप्रमाणे जीवाला जीव लावणाऱ्या मित्रांसाठीही लिहिलेली कविता लोकप्रिय ठरली. ३७ हजारांहून अधिक व्ह्यूज या कवितेला मिळाले. इतक्या जवळच्या नात्यांवर भाष्य करणारा कवी आई वडिलांविषयी कविता करणार नाही, असं होऊच शकत नाही. याचाच प्रत्यय येतो ते काव्यधारा संमेलनाच्या पाचव्या वर्षी आयोजित केलेल्या समारंभात. या समारंभाच्या सुरुवातीस ते आपली कविता सादर करतात. ‘माय-बाप’ असं नाव असलेली ही कविता. कविता सुरू करण्याअगोदर अगदी समर्पक उदाहरणं देऊन कवी अनंत वातावरण निर्मिती करतात. त्यांनी दिलेल्या उपमा आपल्याला अगदी पहिल्याच फटक्यात आपल्याला काळजात भि’डतात. तेव्हाच कळतं यांनी केलेली कविता ही आपल्या मनात कायम घोळत राहणार. त्यात कवी अनंत म्हणतात सुद्धा, ‘ही कविता करताना माझ्या डोळ्यात पाणी आलं, ते पाणी मी तुमच्या डोळ्यांत आणू शकलो तर कविता जिंकली…’

त्यांचं म्हणणं शब्दशः खरं होतं. आपल्या आई-वडिलांवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती ही कविता ऐकताना गहिवरून जाते. कारण या कवितेत जे जे मांडलं आहे ते ते आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या आयुष्यात घडताना पाहिलं असणारचं. तेच शब्दरूपात आपल्या समोर आणताना कवी अनंत एवढ्या तरलतेने मांडतात की नकळतपणे आपल्या डोळ्यांच्या कडा पाणवतात. या कवितेतील प्रत्येक कडव्याविषयी लिहिलं तरी हा लेख कमी पडेल. पण कवितेस वाचण्यापेक्षा ती खुद्द कवीच्या तोंडून ऐकणं कधीही जास्त परिणामकारक ठरतं. कारण त्या कवीची त्या कवितेपाठी असलेली तळमळ आपल्या काळजाला भिडते जे कविता केवळ वाचून होईलच असे नाही. कवी अनंत राऊत यांची कविता ही अशीच. आपलं नेहमीचं जगणं अगदी कुशलतेने शब्दांत मांडणारा हा कवी. शब्दांच्या जंजाळात श्रोत्यांना आणि वाचकांना न अडकवता पण त्या शब्दांचं सौंदर्य अबाधित राहील, हे पाहणारा हा कवी. कवी अनंत यांनी आजतागायत अनेक कवी संमेलनं गाजवली आहेत.

अनेक वेळेस सोशल मीडिया लाईव्ह च्या माध्यमांतून ते आपल्या संपर्कात आले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला काळजाला हात घालतील अशा कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना त्रिवार वंदन. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही एकदा नक्की पाहाल. आणि व्हिडीओ पूर्ण पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांत देखील अ’श्रू जमा झालेले असतील. त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला देखील विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमने लिहिलेले प्रत्येक लेख तुम्ही शेअर करत असता तेव्हा हा लेखही शेअर कराल हा विश्वास आहे. सोबतच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही डोळ्याखालून नक्की घाला आणि शेअरही करा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *