स्वप्न पहायला कुठं काय मोठं भांडवलं लागतंयं. जगाच्या बाजारात स्वप्नचं तर विकली जातायंतं. कुणाला चांगल्या शिक्षणाचं, कुणाला चांगल्या जोडीदाराचं, कुणाला टुमदार घराचं, तर कुणाला अलिशान वाहनांचं. हे झालं ज्यांची ऐपत आहे त्यांच्यासाठी परंतू, ज्याच्याकडं पैकाचं नाही त्यानं सपान पाहायचंचं नाही त्यांनी काय करावं. ज्यांच्या झोपडीचं कधीच घर होईना त्यानं काय करावं. ज्याच्या बापजन्मात कधी मोटारसायकलची टूरटूर अंगणात येईनात त्यानं काय करावं. सपान पाहुच नये का? आयुष्यभर चाकरी करत बसावं का ? त्याला कधी झेप घेता येणारचं नाही का? अशाच एका फळविक्रेत्यानं रस्त्यावरच्या स्पोर्ट्स बाईकला किक् दिली. तो निघाला सुस्साट, कसलाही विचार न करता. बिनधास्त सिग्नल तोडत. एकदम स्वार होऊन. पण हे सगळं मनातचं हा….
अहो आपल्या स्वप्नांवर स्वार होऊन तो निघालायं. त्याला थांबवू नका. त्याला जाऊद्यात त्याचं त्याचं. पण दुनिया जालीम आहे म्हणतात ना तेच खरं. उगीच कुणीतरी बावळटपणा करण्यासाठी व्हीडिओ घेत बसलं. व्हीडिओ घेतला ते बरंचं झालं म्हणा पण आपण एखाद्याचा व्हीडिओ शूट करतोय ते त्याच्या नकळत करावं की नाही, पण इथं झालं उलटंचं व्हीडिओ शूट होतोयं म्हटल्यावर आपला बुलेटराजा नाराज झाला. क्षणात बेभान झालेला तो दुचाकीस्वार जागेवर आला. रस्त्यावर आपली दुकानाचा ठेला सोडून आपण हे काय करायला बसलोयं, हे त्याच्या ध्यानी आलं असावं. ज्या प्रेमानं बाईकवर बसला होता ना तितक्याचं परकेपणान तो खाली उतरला. आपल्या ठेल्याकडं निघाला. पुन्हा आपल्या जिंदगीत. जिथं त्याचा संबंध केवळ वास्तवाशी येतो. पुन्हा निघून गेला दुनियेच्या बाजारात जिथं स्वप्न नाही वास्तव विकलं जातं होतं.
व्हीडिओ पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. ती बाईक आणि त्याच्या ठेल्याच्या मध्ये एक अदृश्य सीमारेशा आहे. गरीब श्रीमंतीची… दोन्हीकडं माणसंच राहतात. पण फरक असतो तो स्वप्नपूर्तीचा… एकीकडं मनात आणलं आणि पैसा फेकून घेऊन टाकलं तर दुसरीकडे दोन वेळच्या पोटासाठी दिसभर हिंडून चार पैसे येणार तेव्हा वीतभर पोट भरणार… दोन सेकंदाचा हा क्षण परंतू, हजारो लाखोंच्या डोळ्यात अश्रू तरळून गेला. कधी कधी वाटतं. कुणीतरी दुचाकी कंपनीचा मालक उठावा आणि म्हणावा मी घेऊन देतो. त्याला ती गाडी… मी देतो गिफ्ट पण कधी वाटू लागतंयं की नकोच… अशी कित्येक मंडळी स्वप्नांच्याच इमल्यामुळं वास्तवात काही अधिक करायसाठी झटतायतं. त्यांच्यावर अन्याय होईल. एक दिवस हेही संपेल… एक दिवस स्वप्नही पूर्ण होईल.
बघा व्हिडीओ :