Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील ह्या शेंगदाणे विकणाऱ्या तरुणाला सलाम कराल, अश्रू आल्याशिवाय राहणार नाही

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील ह्या शेंगदाणे विकणाऱ्या तरुणाला सलाम कराल, अश्रू आल्याशिवाय राहणार नाही

हा व्हीडिओ नीट पहा. समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा पहा. एक हडकुळं पोरगं येतं. शेंगदाण्याची पुडी घ्यायला धावत धावत दुडूदुडू येतो. चणेवाल्याच्या हातातून एखादी ट्रॉफी मिळवल्याच्या आनंदात ती पुडी उचलतं आणि निघूनही जातं. अवघ्या काही सेकंदाचा हा क्षण पण तुम्हाला बरंचं काही शिकवून जाईल. मनाची श्रीमंती काय असते, ते यातून दिसून जाईल. चार शेंगदाणे विकून काही विक्रेता मोठा होत नसतोयं, आणि त्याचे शेंगदाणे फूकट खाल्ले म्हणून खाणाऱ्यावर कुठलं कर्ज लादणारं नसतंय, पण रस्त्यावर उपाशीपोटी फिरणाऱ्या या पोराच्या पोटातली आ’ग जर शांत होणार असेल ना तर मग त्यामुळे जर स्वतःच्या खिश्यातुन काही दयावे लागले ना तरी काही हरकत नाही. कारण अशाच भूकेल्यांच्या भूकेमध्ये परमेश्वर असतो, असं म्हणतात. या सगळ्यात एक गोष्ट टचकन डोळ्यात पाणी आणून जाते, ती म्हणजे व्हीडिओमध्ये घडलेला हा अवघ्या काही सेकंदाचा क्षण.

एरव्ही कुणावरही एका रुपयाच्या उधारीची मेहरबानी न करणारा शेंगदाणे विक्रेता या छोट्या बाळाला दुरुन हाक मारतो. आपल्या हाताने गरमागरम शेंगदाण्याची पुडी बनवायला लागतो. पोरगं ते खाऊन खाऊन असं खाणार तरी किती. पण त्याला बालमनामध्ये एक भूक असते. स्टॉल्स, दुकानं पाहण्याची आणि तिथल्या गोष्टी मिळवण्याची. आपण अशा गोष्टी बालपणातच अनुभवल्या होत्या. जर काही दुकानातलं मिळालं नाही ना तर लोटांगण घालून रडणारी आपली पीढी. त्या पोराचं तसं कुणीच नसेल कदाचित. आई-बाप दिवसभर कामाला, रात्री भाकर आणली तर खायला मिळणार, त्याला दिवसभर असाच हिंडत बागडत राहण्यासाठी सोडला जाणार, या सगळ्यात त्याला कुणी खायला दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही, अशीच गत. प्रत्येकाच्या नशिबी उंडगणं बागडण्याचं बालपण येत नाही. काही बालपण अशीही असतात. पण मनाची श्रीमंत असलेली पण परिस्थितीनं गरीब असलेली माणसांची कमीही देवानं या जगात ठेवली नाही. जिथं गरीबी आणली तिथं माणूसकीही तितकीच दिली. या सगळ्याच्या बाबतीत त्या माणसानं मनं जिंकली. या भूकेलेल्या मुलाला बोलावून घेतलं. अचानक त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना एवढा झाला होता. मान वर करत हिंडत बागडत हो येऊ लागला. जसा एखादा पुरस्कार मिळाल्यावर सिनेस्टार धावत जातो, तशा आवेशात हा मुलगा जाऊन पोहोचला होता.

त्या शेंगदाण्याच्या पुडीत होते फक्त चार शेंगदाणे पण त्याच्या या सगळ्या अविर्भावात अवघं बालपण त्या पुडीत बांधून दिलंयं की काय, अशी स्थिती त्याची झाली होती. पुडी घ्यायला ते एवढूसं पोरगं असं धावंत आलं जसं की त्याला मोठं यशाची पावतीच मिळणार होती. सहाजिकच दिवसभर पोटाला काही खायला नाही. भर दुपारच्या उनात उपाशी फिर फिरायचं. कुणी काय खायला दिलं तर खायचं नाही तर उपाशी रहायचं असली गत होणाऱया मुलाकडून आणखी काय अपेक्षा ठेवायची. या मुलाच्या चेहऱ्या वरच्या आनंदात देव दिसेल. तुम्ही कुणाला काय देता याचा हिशोब तोच ठेवत असतो. त्याच्या या सगळ्या हिशोबांवरच तर मानवता, माणूसकी जिवंत आहे. माणसाचं मन मोठं असलं की सगळं काही होतं, असं म्हणतात. ते काही उगाच नाही. चणे शेंगणारे विकणारा माणूस कधी काही दान धर्म करू शकतो का आयुष्यात? त्याला कधी चार धाम यात्रा करून पुण्य कमवायचा मौका मिळणार का? त्यामुळं त्यानं देव जवळच शोधला. त्या भूकेलेल्या जीवाला तृप्त करून चार शेंगदाणे दिले म्हणजे मोठं पुण्य कर्म केलं असं नाही, पण त्याने ज्या वेळेला दिले ते पोरगं जसं बागडत बागडत आलं तेव्हाचा तो क्षण आहे ना… त्यासाठी एकदा सलाम..

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.