कधीही जा कुठेही जा प्रत्येका गावात एक ना एक असा कलाकार तुम्हाला भेटेलच. ज्याच्याकडे किमान घटकाभर तुम्हाला हसवण्याचा पुरेपूर मसाला असणारच. त्यामुळे आपण अशा रंगीबेरंगी देशात राहतो जिथले कलाकार असले रंग उथळतातच. कलाकारांच्या या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला पोटधरुन हसवलं असेलच. तर हा व्हीडिओही तितक्याच आवडीनं पहाल. आपल्या मराठी भाषेला प्रत्येक गावागावात बहिणी आहेत. तिच्या बोलीभाषा आहेत. त्यामुळं कलाकारंही तितकेच वेगळे दिसतील. अँक्टीगमध्ये कधी करियर केलं नसेल पण कधी कधी त्यांचा अंगातला हा हौशी कलाकार बाहेर येत असतो, तो तुम्हाला अशाप्रकारे खुणावत असतो कि त्याचंही कौतूक व्हावं. आता या पोट्ट्याचंच बघा ना. रोल केलाय इन्स्पेक्टरचा पण अँक्टिंग पिव्वर हवालदारासारखीच आहे. त्यांना कधी ना कधी कला सादर करायची संधी मिळाली की सुरूच होतात. गावाकडचे कार्यक्रम असोत कुणाची हळद असो लग्न असो वा साखरपुडा असो ही मंडळी पुरेपूर मनोरंजनासाठी तयारच असतात.
कधी कधी त्यांच्या आयुष्यात अडचणी येतील पण ते तुम्हाला कधी रुसलेली फुगलेली नाही दिसणार, एकदम फुश्शारक्या मारत अगदी स्वतःच्या मर्जीच्या राजाप्रमाणं सदान् कदा हसत खेळत असतात. त्यांच्या या जगण्याच्या कलेलाही तितकीच दाद द्यायला हवी. असं कुणालाही अँक्टिंगचं खुळ जमत नाही. ते अंगातच असावं लागतंयं. ज्यामुळं अंगातल्या या कीड्याला जगाची दाद मिळू शकतेयं. या पोराची डायलॉग डिलीव्हरी बघून डायरेक्टरच्या कपाळाला घाम फुटला आसल. त्यामुळं असल्या हिरोला डायलॉग लिहून लिहून रायटरच्या पेनाची शाई संपेल म्हणून आजपर्यंत याला कुणी शिनेमात घेतलं नाही. टॅलेंट याच्यात नाही तर याच्या टॅलेंटला वाव देईल, असला पिक्चरच अजून बनलेला नाहीये. त्यामुळंच सगळी गडबड आहे. मग काय करतंयं पोरगं असले छोटो मोठे रोल करुन सगळ्यांना हसवत फिरतंयं. त्याच्या सगळ्या या कारभाराला पाहून पोरं बी खुश होतायंतं. “चला काकू चला लग्नाला चला लग्नाची हवा बँड बाजा लावा. कुत्री घ्या काखंला पोरं बांधा खांबाला, एकीचा शेंबूड तिघींना पुसा जेवाला बसा, कुठ केली धुरपा शेंबुड उरपा, कुठं गेली पारू नवऱ्याला मारू, कुठं गेली धोंडी घुबाड तोंडी, अजरे नाना बजरे नाना घरात नाय दाना फौजदार म्हणाा.”
“माझा नंबर घ्या.तुम्हाला कुणी धरलं पकडलं तर मला फोन लावा. माझा नंबर अठ्ठ्याणव सात दोन बोकड एक साप लागली वाट. कार्ड घरी मोबाईल संग इनकमिंग फ्री आऊटगोईंग टेबलाखाली. बायकोशिवाय मी पण कुणाला भीत नाई रातीच्या सोय म्हणून बायकुला भीतोय. दुसरा नंबरा घ्या नव्याण्णव सतरा दिसन तिथं उतरा. बिन पगारी फुल्ल अधिकारी. परवा माझ्या वरुन ४० गाड्या गेल्यात मी पुलाखाली वरुन गाड्या गेल्या. काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेलतो मार खायला लागल म्हणून परत आलो. काल जम्मू काश्मीरला आ’ग लागली. तीन माशा चार खेकडं फरार आहेत. त्यांचा तपास माझ्याकडं लावलाय. कोंबडीनं मारुती कारला धडक मारली अंड गायब तपास माझ्याकडं. म्हणून इकडं पळून आलोय. कारण जिल्हा तालुक्यात माझा पहिला नंबर हाय मार खायला आपलं मान पान द्यायला. बायकोशिवाय कुणाला भीत नाय डायरेक्रक्ट गोळी घालतो. एक गोळी 15 दिवस अंघोळ बंद. धडकून गोळी मागं येतो ही माझी बंदूक एके 56.गोळी लागली धडकून मागं येती. तुम्हाला कुणी धरलं तर मला सांगा मी आतच असतो. आत म्हणजे ऑफिसातच.” असलं काही बाही बडबडत सुटतो हा अतरंगी कलाकार. त्याच्या पुढं जे काही बोललायं ते आम्हाला बी लिव्हायचं धाडसं होईना, त्यामुळं अशा कलाकारा्ला आणि त्याच्या कलेला सलाम हाय.
बघा व्हिडीओ :